६४ गुंठे क्षेत्र ३५ टन 'ए-वन' कांदा

श्री. अंबादास बहीरनाथ आघाव,
मु.पो. भेंडा खुर्द, ता. नेवासा, जि. अहमदनगर.
मो. ९५०३५४२३९५



आम्ही २७ नोव्हेंबर २०१५ ला ६३ गुंठे हलक्या प्रतीच्या जमिनीत गावरान कांद्याची लागवड केली. कांदा लागवड केल्यानंतर २० ते २५ दिवसांनी पाण्यावाटे या कांद्याला जर्मिनेटर १ लि. + कॉपरऑक्सीक्लोराईड १ किलो/एकरी याप्रमाणे सोडले. त्यामुळे जमिनीतील बुरशी नाहीशी होऊन पांढरी मुळी झपाट्याने वाढली. तसेच पातीचा शेंडा वाढ होऊन प्लॉट टवटवीत दिसू लागला. हा पहिलाच वापर यशस्वी झाल्याने पुढील फवारण्या करण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे नारायणगाव शाखेतून ५ - ५ लि. सप्तामृत औषधे घेऊन गेलो.

या कांद्यास पहिल्या खुरपणीच्या वेळी १०:२६:२६ खताची २ पोती आणि पोटॅश २ पोती असा डोस दिला आणि पाणी दिल्यानंतर लगेच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. + २५० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे कांद्याची पात सरळ होऊन चकाकी येऊ लागली. या काळात थंडी असल्या कारणाने १२ ते १३ दिवसांच्या अंताने पाणी देत होतो. वरील फवारणी नंतर पुन्हा १० - १० दिवसांनी २ वेळा जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे फवारले. त्यामुळे पात हिरवीगार, सतेज होऊन ४५ दिवसात पात गुडघ्याच्या वर वाढली तसेच करपा रोग शेवटपर्यंत आला नाही. त्यानंतर २ महिन्याचा कांदा झाल्यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर आणि न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे ८ - ८ दिवसांनी २ वेळा फवारणी केली, त्यामुळे कांद्याची पात कंबरेला लागून कांदा पोसण्यास सुरुवात झाली. ३ महिन्याचा कांदा असताना पात कंबरेला लागत होती. पातीतील अन्नरसाचा कांदा पोषणासाठी उपयोग व्हावा म्हणून पाणी तोडतेवेळेस ०:५२:३४ आणि न्युट्राटोन व राईपनर १० - १० दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारले. त्यामुळे पात झिरो झाली व कांद्याची काढणी एप्रिल २०१६ च्या पहिल्या आठवड्यात केली असता एकसारखा वजनदार डबल पत्तीचा आकर्षक चमक असलेला कांदा मिळाला. आमच्या भागात मुळा डॅमचे पाणी आहे. येथे दरवर्षी गावरान कांद्याचे पीक घेतले जाते. आमच्या भेंडा गावात यावर्षी जवळपास २५० ते ३०० एकरावर गावरान कांद्याचे पीक घेतले गेले होते. तर संपुर्ण गावात आपला एक नंबरचा प्लॉट होता. दरवर्षी आम्ही कांद्याचे पीक घेतो, मात्र एवढा दर्जेदार प्लॉट कधी आला नव्हता. यापुर्वी जास्तीत जास्त एकरी १३ टनापर्यंत कांद्याचे उत्पादन मिळाले होते. मात्र यावर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पहिल्याच प्रयोगात ६३ गुंठ्यामध्ये ३५ टन दर्जेदार कांदा उत्पादन मिळाले आहे.

मार्च - एप्रिलमध्ये सर्वांचाच कांदा निघत असल्याने बाजारभार पडतात, त्यामुळे आम्ही दरवर्षी हा कांदा जाळीच्या कणग्यांमध्ये दिवाळीपर्यंत साठवितो. त्यानंतर मार्केटमधील भाव वाढल्यावर थोडा - थोडा विक्रीस काढतो. तेव्हा चालूवर्षी देखील हा कांदा लोखंडी जाळीच्या कणग्यांमध्ये साठविला आहे. १२ गेजच्या तारेची १२.५ फुट लांब आणि ६ फुट रुंद जाळीच्या गोल कणग्या करून त्यामध्ये हा कांदा साठवितो. शेडमध्ये तळाला मुरूम अथवा वाळूचा थर देऊन त्यावर ह्या कणग्यांमधील कांद्याला सर्व बाजुने हवा मिळत असल्याने कांदा खराब होत नाही. कांदा साठवणीच्या चाळीपेक्षा यामध्ये कांदा जास्त दिवस टिकतो. एका कणगीमध्ये १००० ते १२०० किलो कांदा मावतो. अशा यावर्षी ३५ कणग्या भरल्या आहेत. विक्रीवेळी कांदा पुर्ण वाळल्याने काही अंशी वजन जरी घटले तरी सरासरी एका कणगीमधील कांदा १ टन भरतोच. अशा ३५ कणग्या म्हणजे ६३ गुंठ्यातून आम्हाला ३५ टन हे विक्रमी उत्पादन प्रथमच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मिळाले आहे. त्यामुळे पुढेही डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरणार आहे.