प्रतिकूल परिस्थिती भारतीय शेतकऱ्यास इष्टापत्ती नव्हे तर वरदानच !


प्रा. डॉ. वि.सु. बावसकर

दुष्काळ हा निसर्गनिर्मित की, मानवनिर्मित या वादात न जाता त्याचा इष्टापत्ती म्हणूनच स्विकार करणे म्हणजे स्थिर झालेल्या मेंदूला चालना देणे होय.

व्यवसाय कोणताही असो, जेव्हा तो स्थिरावतो तेव्हा त्याला 'स्थिरावणे' म्हणत नाही तर त्याला डबक्यात साठलेल्या पाण्याला वास येऊन मच्छर होतात तशी अवस्था त्याच्या विचारशक्तीची, व्यवसायाची होते. भाकरी का करपली, घोडा का अडला, आंबा का नासला, खाण्याचे विड्याचे पान का सडले - 'न फिरविल्याने' ही व्यवहारी म्हण सर्वश्रुत सर्वसिद्ध आहे. म्हणून इस्राईलच्या 'कायमच्या' इष्टापत्तीमुळे (प्रतिकूल हवामान, प्रतिकूल राजकीय परिस्थिती, वर्षाचा बाराही महिने आणि दिवसाचे चोवीस तास कायम अशांतता यामुळे) येथील जनता कायमचा सजक आणि सतर्क आहे. त्यामुळे ते राष्ट्रा प्रगती पथावर आहे. अनेक प्रतिकूल परिस्थितीचे पैलू ते कायम झेलत असतात. तसेच महाराष्ट्राची 'ही' इष्टापत्ती ठरत असतानाचा शेवटच्या ४ महिन्यामध्ये घेतलेला सुधारणांचा वेग हा काहीसा भ्रामक अधिक असला तरी मागील संपादकीयामध्ये आम्ही लिहील्याप्रमाणे महाराष्ट्रात उत्तम व देशात चांगली परिस्थिती निर्माण झाली. याला कारण सजीवांचा निर्माता हा तोच 'जगन्नायक' आहे. तो जगन्नायक निसर्ग घडवितो, माणूस निसर्ग घडवू शकत नाही. परंतु हल्लीच्या अतिक्रमणामुळे सिमेंटच्या जंगलात हिरवळ ओयासिस शिधावी लागते. मानव फक्त निसर्गाचे रक्षण, संवर्धन करू शकतो, निर्मिती नव्हे!

महाराष्ट्रातील पावसाची सुरुवात उत्तम राहिली आहे. उत्तर भारतात जरी पाऊस ज्यादा झाला असला तरी अनावृष्टीपेक्षा अतिवृष्टी कधीही परवडली. परंतु ज्या दुष्काळाने देशाला व महाराष्ट्राला धडा शिकविला तेथे अति पाण्यावर ऊस, केळी, आले, हळद ही पिके मोकाट पाण्यावर करू नयेत. त्यातल्या त्यात डाळींबासारखे पीक जे काटक व कमी पाण्यावर अधिक उष्णतेस साथ देणारे व भावाच्या बाबतीत शेवगा व भेंडीच्या बरोबरीने द्राक्षापेक्षा अधिक उत्पादन कमी नाशवंत, अधिक गुणवंत आणि डाळींबाचे सेवन विविध प्रकारे करणारे कनिष्ट मध्यमवर्गीय ते उच्चवर्गीय आरोग्यविषयी दक्ष असणाऱ्या जगभरातील अब्जावधी लोकांना डाळींब सेवनाने तृप्त केले आणि समृद्ध आरोग्य दिले. त्यामुळे या पिकाचे जरी क्षेत्र वाढले तरी भाव चढत्या कमानीकडे राहिले. ही अवस्था गेल्या ५ वर्षापासून आपण पाहतो आहोत. म्हणून राजस्थानसारख्या वाळवंट मय (वालुकामय) प्रदेशामध्ये तेथील शेतकऱ्यांना (संदर्भ - कृषी विज्ञान जुलै २०१३ पान नं. १३) प्रेरणा मिळून बिहार, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही डाळींबाचे पीक बाळसे धरू लागले आहे. डाळींबाच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना साऱ्या जगभर मागणी आहे आणि प्रक्रियायुक्त डाळींबाच्या मुल्यवर्धनामध्ये लघुउद्योग व कारखानदार यांना प्रचंड वाव आहे. त्यामुळे आज जरी डाळींब ६० ते १०० रू. किलो असले तरी समजदार माणूस हा जंगफूड म्हणजे पिझ्झा, पास्ता आणि कोक घेऊन आरोग्य बिघडवून त्याच्या आहारी जाऊन ओबेसिटी (बडप्पन), हृदयविकार, ब्लडप्रेशर व कालांतराने मतीमंद होणे यापासून तो सुरक्षित राहून बहुआयामी सर्वांचे किंवा अधिक सुटसुटीत बोलायचे झाले तर गरिबांचे केळ म्हणून फळ ओळखले जाते, त्यापेक्षाही निसर्गाने निर्माण केलेल्या मानवनिर्मित ग्लोबल वार्मिंगच्या प्रतिकूल परिस्थितीवर आव्हानात्मक टाळी देऊन कर्नाटक, सोलापूरपासून सटाणा (नाशिक) पर्यंत डाळींब या पिकाची तेल्यारोगाने थोडी दयनीय अवस्था झाली. हा तेल्या रोग निर्माण व्हायला मानवानेच हातभार लावला आहे. कारण डाळींब हे मुळातच उष्ण व कोरड्या हवामानात येणारे पीक आहे. याला आर्दता (Microclimate) अजिबात चालत नाही. त्यामुळे डाळींब कोकण, हिमाचल प्रदेश, चेरापुंजी अशा अति आर्द्रतायुक्त भागात येत नाही. मानवाने या पिकाची लागवड ज्यादा उत्पादनाच्या हव्यासापोटी शिफारशी (१५' x १५') पेक्षा अतिशय जवळ कमी क्षेत्रात ज्यादा झाडे लावल्याने बागांमध्ये आर्द्रता निर्माण होऊन या तेल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला व वाढला. यासाठी विद्यापीठांनी, शास्त्रज्ञांनी डाळींबाची लागवड ही १५' x १५' वरचा करावी, यापेक्षा कमी अंतरावर डाळींब लावू नये असे मानदंड (परिमाण ) तयार केलेत. बागा स्वच्छ, हवेशीर, मोकळा सुर्यप्रकाश थेट झाडांना मिळेल अशा स्वच्छ ठेवाव्यात. म्हणजे डाळींब बागा तेल्यामुक्त राहतील.

तीळ, कडधान्य, गळीतधान्य या क्षेत्रावर अतिक्रमण न करता डाळींब पीक हे राजाधिष्टीत विराजमन झाले.

प्रसंगी लोकांनी या पिकाला जगण्यासाठी मल्चिंग, उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी कापड, साड्या, फेटे बांधणे असे अनेक प्रयत्न केले.

नैसर्गिकरित्या 'मृग' ७ जूनला येतो हे मान्सूनने सिद्ध करून दाखविले. म्हणून दुष्काळाची वावटळ आली, संत्रा मोसंबिसारख्या पिकांच्या बाग होरपळून निघाल्या तशी डाळींब क्षेत्रात इतकी दैन्यावस्था झाली नाही. ती द्राक्षातल्या काहीशा अनिश्चिततेवर मात करून द्राक्ष शेतीला आपली सवत न करता द्राक्षाची लहान बहीण म्हणून फळबाग शेतीचे बूज राखले आणि शेती समृद्धीला चांगले दिवस येतील हे शेतकऱ्यांच्या अथक प्रयत्नातून सिद्ध झाले.

अशी जर परिस्थिती परत उद्भवली तर ज्याप्रमाणे आम्ही राजस्थानमध्ये डाळींबाचा प्रयोग यशस्वी केला( पान नं. १३), तशी इतर राज्यातही याची लागवड यशस्वी करून डाळींबाखालील क्षेत्र वाढविता येईल.

या डाळींबात कमी पाण्यावर येणाऱ्या अक्षय्य तृतीया व पितृपंधरावड्याच्या ८ दिवस अगोदर व नंतर ८ दिवसापर्यंत मेथी, कोथिंबीर ह्या पालेभाज्या लावल्या तर या पालेभाज्यांपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना एकरी ५० हजारापासून १ लाख रू. मिळतात. (संदर्भ - ५ एकरात २ हंगामात डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कोथिंबीरीपासून ५ ते ६ लाख रू. उत्पन्न श्री. विवेक कोलते, मो. ९६६५९२५०३७ कृषी विज्ञान, मे २०१२, पण नं. १६) म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर केला तर प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी त्यावर मात करता आली व येते. म्हणूनच 'तुम्हीच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने प्रतिकूल, परिस्थितीवर मात करून भारतात प्रति 'इस्राईल' घडविले' असे गौरवोद्गार श्री. दिलीप देशमुख (पहूर, ता. जामनेर, जि. जळगाव) यांचा केळीचा बाग बधून ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डॉ. जेपधा गेटस यांनी काढले. कारण दुष्काळ पडला तरी शेतकरी या प्रेरणेतून त्यावर मात करतील. गरज ही शोधाची जननी आहे. म्हणून इष्टापत्ती आली तरी आपण डगमगू नये. हे महाराष्ट्राने व देशाने सिद्ध केले आहे. जशी परिस्थिती येते तसे त्यावर शेतकऱ्यांनी शासनाने, शास्त्रज्ञांनी वेळेवर मार्ग काढावेत. 'बैल गेला आणि झोपा केला' किंवा 'साप गेल्यावर भुई धोपटल्यासारखे' करू नये.

वेळेवर पाऊस पडून निसर्गाने 'इष्ट' केले पण 'आपत्ती' जागेवरच राहिली. जर वेळीच उपाययोजना केली गेली असती तर उन्हाळ्यातच धरणे, तलाव भरले असते. अनेक ठिकाणी पाण्याबरोबर पैशाची गळती होत नाही तर पैशाबरोबर पाण्याची गळती होत आहे. यासाठी बुद्धी, विकासाची, विचारांची, नियोजनांची, वेळेवर झटपट होकारार्थी निर्णय घेणे अनू कृती करण्याची गरज आहे. यासाठी दूरदृष्टी ठेवली पाहिजे. जसे झोपी गेलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करता येत नाही. अशी अवस्था यामध्ये होऊ नये. नाही तर रोगापेक्षा उपचार महाग ठरतो म्हणून मानवनिर्मित रोग (अडचणी, संकटे) घडवून आणू नयेत.

प्रत्येक परिस्थितीवर आपण विचार केला, कृती केली आणि त्यावर शेतकऱ्यांनी कशी मात करावी यावर प्रयोगातून आपण सर्वांनी सिद्ध केले आहे. प्रत्यके ठिकाणी जिल्हा, राज्य किंवा देश असो, तेथे कृषी विज्ञानचे संपादकीयमधून केलेल्या मार्गदर्शनाची दखल घेतली जात आहे. गाव, जिल्हा, राज्य व देश पातळीवर कोणी काय निर्णय घ्यावेत याचे प्रयोग आणि कृती करून त्यांना दिशा दाखवून दिली आहे. फाटलेल्या धरतीवर पावसाने हिरवा गालीच्या निर्माण करतो त्याप्रमणे आपल्या सहकार्याने सारे घडले आहे. यातून शेतकऱ्यांना आशेचे, समृद्धीचे घुमारे फुटले आहेत. म्हणजे प्रामाणिक प्रयत्नातून यश उशीरा जरी मिळाले तरी होकारार्थी निर्णय व यामधून निर्माण होणारी फळे रसाळ, गोमटीच मिळतात. दुष्काळाने धरती फाटली लोकांना संकटात टाकले तरी लोक डगमगले नाहीत. तसे या तंत्रज्ञानाने परिस्थिती जरी बिकट असली तरी यश संपादीत केले. हे जिल्हा, राज्य, देश यांना मार्गदर्शक ठरत आहेत. याहून अधिक काय सांगावे. फक्त कृती करत राहावे. हीच या मान्सूनच्या शकुनावरील आशावाद !

Related Articles
more...