हळदीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर फायदेशीर

श्री. प्रदीप बाळासाहेब पिसाळ, मु. पो. ओझर्डे, ता. वाई, जि. सातार.
फोन नं. (०२१६७) २६८०७१


हळदीचे बेणे (गड्डे) सांगलीहून १२ क्विंटल आणले होते. त्यावेळी १२०० रू. क्विंटल भावाने गड्डे मिळाले. जमीन भारी काळी निचऱ्याची आहे. २॥ फुटाची सारी काढून एक फुट अंतरावर सरीच्या दोन्ही बाजूने लागवड केली. लागवड २५ मे २००३ ला केली. लागवडीपुर्वी शेणखत ९ ट्रोली एकरी टाकले होते. विहीरीचे पाणी १२ दिवसांचे अंतराने देतो. लागवडीनंतर २ महिन्यांनी चळी मारून कल्पतरू खात एकरी १० किलोच्या ४ बॅगा टाकल्या. त्यामुळे जमिन भुसभुशीत होऊन पांढरी मुळी वाढते.

लागवडीनंतर ४ महिन्यांनी भर लावताना परत ५० किलो कल्पतरू खत दिले. कल्पतरू फणी पोसण्यास मदत होते. १० जानेवारीला पुर्ण पाल्याची कापणी करतो. नंतर १ महिन्याने खांदणी करतो. साधारण ८॥ महिन्यात हळद काढणीला येते.

१२ वर्षापासून मी शेती करीत आहे. आमचे मुख्य पीक हळद आणि ऊस आहे. हळद दरवर्षी करतो. दरवर्षी २० क्विंटल उत्पादन वाळलेल्या हळदीचे निघाले. काढणी कुदळीने खांदुन करतो. एका गड्ड्यापासून साधारण दीड किलो ओली हळद निघते.

काढणी झाल्यानंतर कायलीमध्ये शिजवून घेतो. मोकळ्या रानात सारे पडून ते दातळाने ओढून घेऊन त्यामध्ये शिजवलेले गड्डे (हळकुंड) आंथरुण ८ ते १० दिवस सुकवितो . नंतर बायांकडून वेचून घेऊन त्यावर ड्रम पॉलिश करतो. गावातच मशिन आहे. २५ रू. पोत्याप्रमाणे पॉलिश करून मिळते. पॉलिश केल्यानंतर पोते ९० किलो वजनाचे भरते. त्यानंतर वाई, सांगली मार्केटला पाठवितो. ३॥ ते ४ हजार रू. क्विंटल भाव मिळतो. एकरी ९०,००० रू. उत्पन्न मिळाले. शिवाय गड्डा जो लावलेला असतो तो कला कोच्या (सोऱ्या) तयार होतो. त्याच्यापासून कुंकू तयार होते. मुळच्या गड्ड्यापासून नवीन ३ गड्डे तयार होतात. ते पुढील वर्षाच्या लागवडीसाठी उपयोगी येतात. त्यामुळे पुढील लागवडीच्या लागणाऱ्या बेण्याचा खर्च वाचतो.

या एका एकरापासून बेणे एवढे निघाले की, सव्वा एकराची लागण चालू वर्षी करून, म्हणजेच १३ ते १४ क्विंटल बेणे वापरून ७ क्विंटल गड्डा १४००० रू. दराने विकला. त्यामुळे बेणे जादा मिळून उत्पादनात ५ क्विंटल ने वाढ झाल्याने यावर्षी सव्वा एकराला कल्पतरू खत वापरणार आहे. हे पीक रोगाला फारसे बळी पडत नाही. फक्त दिवाळीच्या वेळी थंडीत करपा पडण्याचा संभव असतो. आणि त्याच्याअगोदर हळद लागू नये म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या या अवस्थेत दोन फवारण्या करत असतो.