जिद्द, शोध आणि बोध - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सर्व रेकॉर्ड तोडून सर्व सुखे हात जोडून उभी, म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी भारतीय शेतीचा कल्पवृक्ष

श्री. सुरेश ज्ञानू कासार,
मु.पो. चोरूची, ता. कवठे महांकाळ, जि. सांगली.
मोबा. ९९७५९१२२८१, ९६७३६२३९५


आमच्याकडे एकूण २४ एकर हलकी (मुरमाड), मध्यम आणि भारी अशा तिन्ही प्रकारची जमिन आहे. पूर्वी आम्ही ऊस घेत होतो. मात्र नंतर पाणी कमी पडल्याने डाळींब बागेकडे वळलो. ४ एकरमध्ये १७ वर्षापुर्वी गणेश डाळींब १५' x १५' वर लावला. रान एकदम खडकाळ असल्याने ३' x ३' चे खड्डे घेऊन चांगली पोयटा माती, शेणखत, पालापाचोळा यांनी खड्डे भरून रोपे लावली. त्यावेळी संगोल्याहून गणेश ३ रू. व भगवा ५ रू. प्रमाणे गुटी कलमे आणली होती.

भगवा डाळींबाची २००० कलमे २ - ३ टप्प्यात ८ एकरमध्ये लावली आहेत. सर्व बागांचे उत्पादन चालू झाले आहे.

माल चालू असताना दुसऱ्या बहाराची कळी

आम्ही ऑगस्टचा (हस्त) बहार धरतो. या बहाराचा माल जानेवारीत चालू होतो. परत जानेवारीत चालू मालावरती डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फुलकळी लागून डबल बहार मिळतो. पहिल्या ऑगस्टच्या बहाराचा जानेवारीत चालू झालेला माल मे पर्यंत चालतो. नंतर पुन्हा ऑगस्टमध्ये दुसरा बहार धरतो, असे साधारण बहाराचे नियोजन असते. ऑगस्टचा बहार धरण्याचे कारण आमचा भाग दुष्काळी असल्याने इतर बहाराच्यावेळी पाणी पुरवठा कमी पडतो. मात्र ये बहारामध्ये गेली ४ - ५ वर्षापुर्वीपर्यंत आम्हाला दुसरीच समस्या उद्दभवली ती म्हणजे या ऑगस्टच्या बहारामध्ये पावसाचा हंगाम असल्याने धुमारे (शेंडावाढ) सतत निघत असल्यामुळे फुलकळी लागण्यात बरीच अडचण येत असे. यावर अनेक प्रकारची औषधे वापरत होतो. यामध्ये खर्च वाढत असे, मात्र त्यापटीत फरक जाणवत नव्हता.

गेली ४ - ५ वर्षापुर्वी किसान 'कृषी प्रदर्शन' मोशी येथे भेट देत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलवरून कृषी विज्ञानचे विविध अंक घेऊन ते वाचल्यानंतर आम्ही डाळींबासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो. तेव्हापासून आमची भरभराट झाली.

१५० टनापैकी ८०% माल एक्सप्रोर्ट

या तंत्रज्ञानाने दरवर्षी माल एक्सपोर्ट होतो. गणेश आणि भगवा या ३००० झाडांपासून जवळपास १५० टन उत्पादन काढतो. त्यातील ८०% माल एक्सपोर्ट होतो. गणेशचे फळ १ ते सव्वा किलो एवढे भरते, तर भगवा ४०० ते ६०० पासून ७५० ग्रॅम वजनाची फळे असतात. मुन्ना फ्रुट, वाशी, नवी मुंबई यांच्याकडे विक्रीस पाठवितो. त्यांचा दुबईला स्वत:चा गाळा आहे. तेथे ते एक्स्पोर्ट करतात. चालूवर्षी १३० रू. किलो भगव्यास एक्सपोर्टचा भाव मिळाला, तर गणेशला ६५ रू. किलो भाव मिळाला. २० % माल मध्यम परंतु डाग असलेला किंवा लहानसे छिद्र पडलेला पुणे, मुंबईला स्थानिक विकतो. तेथे या मालाचेही चांगले पैसे होतात. या बदला मालातील भगव्याला ७० रू. तर गणेशला ४० रू. किलो भाव मिळतो. असा हा दुय्यम माल आज (१५/६/१०) पुणे मार्केटला के. डी. चौधरी यांच्याकडे आणला होता. तेथे ६५ ते ७० रू. किलो भाव मिळाला.

दुष्काळी भागात अत्यंत कमी पाण्यावर
चांगले उत्पादन


डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे आम्ही अत्यंत कमी पाण्यावर, दुष्काळी भागात अतिशय चांगल्याप्रकारे उत्पादन घेण्यात गेली ४ - ५ वर्षापासून यशस्वी होत आहोत. बहार धरतेवेळी रासायनिक खते देऊन जर्मिनेटर ठिबकवाटे मुळाला सोडतो. त्याने पांढरीमुळीची संख्या वाढून तिची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे झाडांना दिलेले खत, जमिनीतील अन्नघटक झाडास पुरविले जातात.

थ्राईवर,क्रॉंपशाईनर फवारण्यांमुळे
तेल्याचा प्रादुर्भाव कमी व आटोक्यात


नंतर थ्राईवर - क्रॉंपशाईनरच्या फवारण्यांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. सकाळी निस्तेज बागेवर यांची फवारणी घेतली असता संध्याकाळी (४ नंतर) झाडांना तरतरी येते. पाने हिरवीगार, टवटवीत आणि कडक दिसू लागतात. तसेच थ्राईवरचा आम्हाला दुसरा अनुभव असा मिळाला की, पावसाळ्यातील या बहाराला ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये एरवी शेंडा वाढ (धुमारे) अतिशय मोठ्या प्रमाणात निघत राहतात. त्यामुळे फळधारणा होत नाही.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे फळधारणा,
मोठी कळी व फळांची संख्या दुप्पट ते अडीचपट
तरीही फळांचे वजन ४ ते ५ पट


या ठिकाणी थ्राईवरचा स्प्रे घेतल्याने शेंडावाढ जागेवर थांबवते. लाल शेंडा लगेच काळा होऊन कडी पक्व बनते. त्यामुळे फुलकळीचे प्रमाण वाढते. फळधारणा चांगली होते. फुलकळी आंगठ्यासारखी जाड निधाल्याने फळ चांगले पोसते. नंतर थ्राईवर - क्रॉंपशाईनरचे गाठ सेटिंग होईपर्यंत २ स्प्रे घेतो. गाठ सेटिंग झाल्यावर थ्राईवर, क्रॉंपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोनचा १।। ते २ मिली /लि. याप्रमाणे वापर सुरू करतो. पुढे फळे संत्र्याच्या आकाराची झाल्यावर फक्त राईपनर आणि न्युट्राटोनच्या फवारण्य घेतो. पुर्वी जी २०० ते २५० फळे धरत त्यांचे पोषण होत नव्हते. तेथे आता तेवढी फळे धरूनही त्यांचे पोषण उत्तम होते. गणेशचे ८०० ते १२०० ग्रॅम तर भगव्याचे ४०० ते ६०० पर्यंत वजन मिळते. शिवाय फळांना (सालीला व आतील दाण्यांना) आकर्षक, चमक, रंग येतो. त्यामुळे आमचा ८०% माल गेली ३ - ४ वर्षापासून एक्स्पोर्ट होतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे सर्व वहाने दाराशी

या तंत्रज्ञानाच्या वापराने सर्व वाहने, यांत्रिक अवजारे घेतली. जेव्हा १० लाखाचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा केली, तेव्हा या तंत्रज्ञानाने २० लाख रू. उत्पन्न मिळाले. जेथे २० लाखाची अपेक्षा केली तेथे ३० - ४०, ५० लाखापर्यंत वर्षाला उत्पन्न मिळाले. आमच्याकडे या उत्पन्नाच्या जोरावर ४०७ टेम्पो, महिंद्र मॅक्स जीप, ट्रॅक्टर, तेंकर, पॉवर टिलर अशी सर्व अत्याधुनिक अवजारे यंत्रसामुग्री दारात आहे.

सर्व बालेला ठिबक केली आहे. बहार धरते वेळी सुरुवातीला १ ते १।। तास ठिबक चालवतो. एका ड्रीपरामधून एका तासाला १४ लि. पाणी पडते, असे २ ड्रीपर एका झाडाला असतात. म्हणजे या कालावधीत एका झाडास (१४ लिटर x १।। तास x २ ड्रीपर) ४२ लि. पाणी पडते. हे पाणी देत असताना झाडाचा शेंडा फुटू द्यायचा नाही. शेंडा फुटताना दिसला तर पाणी कमी द्यायचे किंवा ठिबकमधून पाणी दिले तर अंतर वाढवायचे. ही दक्षता फळे सेटिंग होईपर्यंत घ्यायची. नंतर पुढे पुढे हे प्रमाण वाढवत मालाला कलर येतेवेळी फळे संत्र्याएवढी झाल्यावर ५ -५ तास ठिबक दररोज चालवतो. कारण झाडावर २०० ते २५० फळे धरलेली असतात. म्हणजे रोज १४० लि. पर्यंत पाणी झाडास देतो. झाडे उन्हातही हिरवीगार, ताजीतवानी ठेवतो. त्यामुळे फळांचे पोषण होऊन त्यांना रंग व चमक अधिक उठावदार दिसते.

ऐन आंब्याच्या मोसमातही १३० रू. किलो दर

चालूवर्षीचा माल ऐन आंब्याच्या सिझनमध्ये येऊनही डाळींबाची क्वालिटी या तंत्रज्ञानाने एवढी जबरदस्त मिळाली की, एरवी जो आंबा मार्केटला आल्यावर इतर फळांचे भाव ढासळतात, तेथे यावर्षी आम्हाला १३० रू. किलोपर्यंत भाव मिळाला. एका बहाराला सप्तामृत औषधांच्या ५ - ६ फवारण्या नेहमी घेत असतो. प्रति लिटर पाण्यासाठी १।। मिलीपासून सुरुवात करून फळे मोठी झाली म्हणजे ४ ते ५ मिली प्रमाण घेतो. गणेशची झाडे जुनी असून खोडे मोठी असल्याने कळी सेटिंग झाल्यावर सप्टेंबर -ऑक्टोबरमध्ये कोंबड खत ४ -५ किलो टाकतो. यामध्ये भाताचे तूस अजिबात नसते.

१२ नगाच्या बॉक्समध्ये बसतात दाटीने फक्त ८ फळे

चालू वर्षीतर नेहमी एवढी (२०० - २५०) फळे धरली. मात्र योग्य नियोजनाने सप्तामृत वेळोवेळी फवारणीने फळांचे पोषण जबरदस्त होऊन झाडांवर लोड एवढा वाढला की, झाडांना बांबूच्या डेंग्या दिल्या होत्या, त्याही मोडत होत्या. मुन्ना फ्रुटचे एक्सपोर्टचे बॉक्स भरणारे भैय्ये लोक आम्हाला सांगत, "गणेश डाळींबाच्या १२ नगाच्या बॉक्समध्ये तुमची ८ फळेही बसत नाहीत." एवढी मोठी फळे मिळाली.

शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही,
पण आमच्या सुना नोटा मोजायचे काम करतात!


शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाही. अशी सर्वत्र परिस्थिती आहे. मात्र डाळींबातून आमची ही झालेली भरभराट यामुळे आम्ही गरिबांच्या मुली केल्यात. त्यांच्या वडिलांना वाटायचे यांचे नुसत्या शेतीवार कसे भागते, पण जेव्हा आम्ही डाळींबाच्या बागेचे पैसे घेऊन येतो व सुना ते पैसे मोजतात, तेव्हा वडिलांना खात्री होऊन समाधान वाटते.
ही सुख-समृद्धी आम्हाला केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दिली. तो शेतकऱ्यांचा खरा कल्पवृक्षच आहे!