लिंबू - मल्हार

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


महाराष्ट्रा राज्यात ज्या अनेक फळझाडांची लागवड केली जाते त्यामध्ये लिंबूवर्गीय फळझाडांच्या फार मोठा वाटा आहे. लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीस भारतात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये मोसंबी, संत्रा व कागदी लिंबू यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील हवामान लिंबूवर्गीय फळझाडाच्या लागवडीस पोषक असल्यामुळे कागदी लिंबू लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढत असून सध्या ४०,००० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र कागदी लिंबूच्या लागवडीखाली आहे. प्रामुख्याने अहमदनगर, जळगाव, सोलापूर व अकोला जिल्ह्यात कागदी लिंबाची लागवड मोठ्या प्रमाणात आढळते. त्या खालोखाल पुणे, यवतमाळ,, नाशिक, सांगली, नागपूर, धुळे व बीड यांचा क्रम लागतो. कोकणात कागदी लिंबूची लागवड आढळून येत नाही. कारण दमट हवामानात कँकर तसेच मूळकुज रोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळतो.

सर्वसाधारणपणे शेतकर्‍यांना लिंबू उत्पादनामध्ये खैर्‍या ( सिट्रस कँकर ) रोगाची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यासाठी लेमन आणि लाइम यांचा संकर करण्याबाबत संशोधन व्हावे. कारण लेमन (ईडलिंबू) हे फळ उत्तर भारतातील असून त्याची साल जाड असते. आम्लता ३ ते ५ % व फळ मोठय आकाराचे असून हे खैर्‍या रोगासाठी प्रतिकारक्षम आहे. लाईम (लिंबू) हे फळ दक्षिण भारतातील असून त्याची साल पातळ असते,आम्लता ७ ते ८% व आकार मध्यम स्वरूपाचा असून खैर्‍या रोगास बळी पडते. तेव्हा या दोधांच्या संकरातून कँकर रोगमुक्त जाती निर्माण झाल्या पाहिजेत, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. तसेच हस्त बहाराच्या लिंबाना उन्हाळ्यात भरपूर मागणी असते, तेव्हा या बहाराचे अधिक उत्पादन मिळेल या दृष्टीने लिंबू उत्पादक संघाकडून, विद्यापीठातून संशोधन व्हायला पाहिजे अशी मागणी आहे.

वरील समस्या ह्या शेतकर्‍यांना सततच भेडसावत आहेत. तेव्हा यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने प्रदीर्घ संशोधनातून मल्हार लिंबाचा शोध लावला आहे.

लिंबू -मल्हार मानवाच्या आरोग्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची देणगी

आता मल्हार लिंबाविषयी आपण पाहू, लिंबाचे असे महत्त्व लक्षात आल्यास लिंबावर गेली ४ -५ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी संशोधन केंद्रावर संशोधन चालू होते. कागदी लिंबावर अनेक प्रयोग करून ४ थ्या वर्षी लिंबाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फळे आणली आणि लिंबाचे विविध उपयोग आणि आरोग्याच्या विविध तक्रारीवर २५ ते ३० जणांना हे लिंबू दिले आणि त्यांच्या निरिक्षणांचा अभ्यास केला तर खालील निष्कर्ष मिळाली.

ज्याला अपचन होत होते व करपट ढेकर येत होती त्याला २ लिंबे दिली. ती आदल्या दिवशी पाण्यातून प्याले तर दुसर्‍या दिवशी अपचनाचा त्रास कमी झाला व सकाळी सरबत न पिता थकवा दूर होऊन उत्साह आला.

1) दुसर्‍या एका व्यक्तिला अॅसिडीटी होती, त्यावर लिंबू दिले तर त्याची अॅसिडीटी कमी होऊन गोळ्या घेणे थांबले.

2)तिसर्‍या व्यक्तिला सर्दीवर आहारातून लिंबू दिले, तर त्याची सर्दी कमी झाली.

3) हाडी ताप आणि कडकीच्या व्याधीवर एकाला हे लिंबू दिले तर कडकी कमी झाली.

4) उष्णतेच त्रास किंवा लघवीच्या त्रासावर लिंबाचा रस दिला तर उष्णतेचा त्रास कमी होतो. कोरड पडत नाही, सारखी तहान लागत नाही, तसेच आहारातून 'सी' जीवनसत्व मिळाल्याने त्याचा थकवा कमी होऊन काम करण्यासाठी इच्छा वाढते.

5) देशाच्या अनेक भागामध्ये गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच महाराष्ट्रातील खानदेश, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी जास्त उष्णतेने तापमान ४० ते ४८ डी. से. सहज होते. तेथे उष्णतेने डोळे लाल होऊन जळजळ होणे. डोळ्यांची आग होणे आणि कालांतराने हे सत्र असेच राहिले तर दृष्टी दोष होणे अशा अनके लोकांना या लिंबाच्या सेवानाने डोळे लाल होणे, जळजळ, आगआग, चुरचुर करणे थांबून उष्माघात कमी झाल्याचे निरिक्षणातून आढळले. व्यक्ती शाकाहारी असो वा मांसाहारी या लिंबाच्या रसाला एक वेगळाच स्वाद (Aroma) असल्याने, एक वेगळीच चव असल्याने आम्ही निवड पद्धतीने मल्हार लिंबाची (R&D) जात विकसित केली व जगातील शेतकर्‍यांसमोर खुली केली आहे.

या लिंबाचे फल ४० ग्रॅम पासून ७० ग्रॅमपर्यंत असून मोठे फळ पिवळे गोल, पातळ सालीचे असून त्यापासून अर्धा कप रस मिळतो. उन्हाळ्यात एरवी जे लोक चहा घेत नाहीत, त्यांना अमृत (Nectar) आहे. हे लिंबू ५ ते ६ वेळा जरी गोल पिळले तरी रस निघतच राहतो. तसेच ज्याप्रमाणे मोसंबीचा रस (ज्युसर नसताना १९७० साली) काचेच्या मशीनमधून काढताना साल गोल फिरते त्याप्रमाणे या लिंबाची साल हातात गोल फिरते आणि संपूर्ण रस यातून निघतो. अशा लिंबापासून सरबत करताना संपूर्ण रस निघाल्यानंतर सालीतील जे तेल आहे ते अनेक विकारात उपयुक्त असून ते रसातून ताबडतोब पोटात घेतल्यावर त्याने स्मरणशक्ती वाढते, अशा अनुभव अनेक लोकांनी घेतला आहे.

बियापासून ही जात विकसीत केल्याने वरील फायदे आपल्या लक्षात येतीलच, परंतु संत्रावर्गीय फळांचे नियोजन जमिनीचा प्रकार, हवामान, व्यवस्थापन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर, झाडावरील एकून फळांची संख्या, हिरवळीच्या खतांचा व सेंद्रिय खतांचा वापर, पोटॅश, सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर अशा असंख्य कारणामुळे एकाच झाडावर काही फळे मोठी निपजतात. मोठ्या फळांचे सरासरी वजन ५० ते ६० ग्रॅम, तर लहान फळे १६ ते २४ ग्रॅम वजनाची भरतात. दोन्हीच्या रसाच्या चवीत काहीच फरक नसतो. लहान फळातही रसाचे प्रमाण जादा असल्याने ही फळे अधिक काळ टिकतात. एरवी इतर वाणांमध्ये कोलेट्रीटीकम बुरशीच्या प्रादुर्भावाने तसेच देवी रोगाच्या (अॅन्थ्रॅकनोज) पादुर्भावाने फळांवर डाग पडतात. अशी फळे लवकर खराब होतात. विक्रेत अशा फळांना काटा लागला आहे असे संबोधतात. मात्र फळांवर बुरशीजन्य रोगाची लागण झालेली असते. 'मल्हार' लिंबू अशा अनके किडी व रोगास प्रतिकारक आहे.

याच लिंबाच्या संशोधन प्रकल्पास (Dr.BTRF & I) प्रा. डॉ. विठ्ठल एस. अनंतातमुला यांनी गेल्यावर्षी ८/७/११ रोजी भेट देऊन कामाचे कौतुक करून सदिच्छा दिल्या. (संदर्भासाठी कव्हरवर फोटो दिला आहे.)

तोडणीनंतर १५ ते २० दिवस फळ धरात राहिल्याने सालीवर बाहेरून डाग पडल्याचे दिसले तरी ते फेकून न देता ते कापले असता त्याच्या रसाच्या चवीत काहीही बदल न झाल्याचे आढळते. त्याची चव ताज्या लिंबासारखीच असते.

कु. गौरी रामचंद्र बारमुख यांनी या मल्हार लिंबावर संशोधन करून सरांच्या मार्गदर्शनाने २०१० मध्ये बायोकेमिस्ट्रीत M.Sc. पदवी मिळवली.

लिंबाचे औषधी उपयोग : लिंबामध्ये लोह व 'क' जीवनसत्वाचे प्रमाण भरपूर असते.काविळ झाल्यास लिंबू कापून त्यावर खायचा सोडा टाकून पहाते चोखावा. लिंबू व मध याचा एकत्रित रस घेतल्यास मेद (Fat) व कोलेस्ट्रोल कमी होतो. मुरडा कमी होण्यासाठी लिंबाचा रस गरम करून त्यात सैंधव, खडीसाखर टाकून घ्यावा. लिंबाच्या रसामध्ये हळद टाकून वाफेवर ठेवून घेतले तर बद्धकोष्टता, कडकी कमी होते. पित्त, दाह थांबण्यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये एका लिंबाचा रस पिळून त्यात थोडी साखर टाकून घ्यावा. लिंबाचा रस डोक्याला चोळला असता डोक्यातील कोंडा कमी होतो. दातातून रक्त आल्यास लिंबाचा रस हिरड्यांवर घासावा. लिंबाचा रस रुचकर, पचनशक्ती वाढविणारा तसेच त्याचारोग यासाठी त्याचा वापर केला जातो. लिंबाचा रस, आले व मिरीची पूड टाकून घेतल्यास पोटाच्या तक्रारी थांबतात. लहान मुलांना दूध पचत नसल्यास अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस पाजावा. साखर व लिंबाचा रस डोक्यावर घासल्यास उवा जातात. लिंबाचा रस पाण्यात घालून अंग धुतल्यास काय सुधारते. लिंबाचे काप करून त्यावर सुंठ, सौंधव टाकून गरम करून चोखाल्यास अजीर्णाची ओकारी थांबते.

लिंबू हे कष्टाळू, मेहनती आणि अल्पभूधारक पाण्याची बर्‍यापैकी उपलब्ध असलेले हे अॅस्कॉरबीक अॅसिड असणारे उत्कृष्ट असे पैसे मिळवून देणारे फळपीक आहे. एरवी सर्वसाधारणपणे ४० रू. शेकडा थंडी किंवा आषाढ महिन्यात जाणारे किंवा ४०० ते ५०० लिंबाला ७५ ते १०० रू. भाव मिळणारे हेच लिंबू मार्च ते मे - जून या काळात ४०० लिंबाची गोणी ५०० रू.पासोन १५०० रुपयाला जाते. मोठ्या मेट्रो सिटीमध्ये ४ ते ५ रू. ला १ लिंबू याप्रमाणे किरकोळ विक्री होते. मालेगाव, इचलकरंजी, धुळे, जळगाव, नाशिक, छिंदवाडा, रायपूर, अलाहाबाद, सुरत, अहमदाबाद, रांची जिथे सामान्य माणसांची क्रयशक्ती आणि उत्पन्न मध्यम आहे. तेथे लिंबाच्या किंमती ह्या मध्यम स्वरूपाच्या असतात.

लिंबाचे प्रक्रिया पदार्थ : लिंबापासून सायट्रीक अॅसिड मिळते. लिंबाचे तेलामध्ये सिट्राल, लिमोनिन, लिनालॉन, लिनाईल अॅसिटेट, टर्पेनॉल, सायमील इ. पदार्थ मिळून ते पदार्थास सुगंध व स्वाद आणण्यासाठी वापरतात.

सालीपासून, पानांपासून, छाटलेल्या फांद्यापासून लेमन ऑईल निघते ते फार महाग असून ह्यापासून तयार केलेल्या कॅल्शिअम सायाट्रेट, लाईम ऑईलला परदेशात मोठी मागणी आहे. लिंबाच्या बियांपासून जे तेल निघते ते साबण उद्योगामध्ये कापडांना रंग देण्यात वापरतात. लिंबापासून पेक्टिक अॅसीड, सायट्रेट औषधी आहे. लिंबू तसेच खाल्ल्यास त्यातील तेलाने स्मरणशक्ती वाढते असे एका ठिकाणी वाचण्यात आले आहे. त्याचे प्रयोग करून निरीक्षणे आमचेकडे पाठवावीत.

लिंबू लागवडीसाठी वापरावयाची जमीन : याला मुरमाड, मध्यम चुनखडीची (५ -७% CaCo3) जमीन चालते. ज्या जमिनीत बरबडा नावाचे गवत येते ज्याचा वापर अत्यंत गरीब लोक, धरणावर काम करणारे मजूर कर्नाटक, आंध्रप्रदेश अशा दक्षिण भारतातील लोक पालेभाजी म्हणून करतात ते राणी कलरचे फुल असणारे गवत (तण) येते ती वरकस जमिनही लिंबास चालते.

खड्डा व अंतर : लिंबू लागवडीसाठी १५' x १५' वर २' x २' x २' चा खड्डा घेऊन तेथे काडीकचरा, शेतातील पालापाचोळा, १० ग्रॅम प्रोटेक्टंट, पाव किलो कल्पतरू खत द्यावे आणि खड्डा भरून घ्यावा. खडकाळ जमीन आहे तेथे वरीलप्रमाणे खड्डा भरल्यावर धरणातील गाळाची माती टाकून खड्डे भरून घ्यावेत. नंतर ९" ते १' उंचीची मल्हार लिंबाची रोपे पिशवी फाडून मधोमध लावून टाचेने ४ ही बाजूने माती दाबून घ्यावी. नंतर १ लि. जर्मिनेटर, ५०० मिली प्रिझम आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १०० लि. पाणी असे द्रावण तयार करून १०० ते २५० मिली द्रावण रोपाच्या सभोवार आळवणी करावे. म्हणजे रोपे जगतात. पांढरीमुळी वाढून रोपे वाढीस लागतील.

लागवड जून - जुलैला करावी, तथापि लागवड वर्षभरही करता येते. हिवाळ्यातील लागवडीस वाढ कमी होते, तर उन्हाळ्यातील लागवडीस पाणी अधिक लागते. २ ते ३ महिन्याला कल्पतरू खताचा वापर करावा व सप्तामृत, हार्मोनी खालील वेळापत्रकाप्रमाणे वापरावे.

झाडांच्या जोमदार वाढीसाठी पहिले ३ - ४ वर्ष दरवर्षी खालीलप्रमाणे फवारणी करावी.

१) पहिली फवारणी : ( जून - जुलैमध्ये ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम १०० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : ( सप्टेंबर - ऑक्टोबरमध्ये ) : जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ हार्मोनी १५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( डिसेंबर - जानेवारीमध्ये ) : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

जेथे दुय्यम अन्नद्रव्ये कमी असतील तेथे डाय अमोनियम फॉस्फेट, म्युरिट ऑफ पोटॅश अथवा सिंगल सुपर फॉस्फेट हे १५ -१५ दिवसांनी किंवा १ महिन्याने जून ते ऑक्टोबर या कालावधीत ३ वेळा द्यावे. पाणी कमी असल्यास ठिबकचा वापर करावा, म्हणजे पाण्याची बचत होऊन झाडाची वाढ चांगली होते.

रासायनिक खताला पर्याय म्हणून गांडूळ कंपोस्ट हिरवळीच्या खतांचा वापर करावा. चुनखडी, खारवट जमिनीत ताग किंवा धैंच्याचे पीक घेऊन ते फुलोर्‍यात येतानाचा गाडावे. गाडल्यानंतर २ ते ३ वेळा ४ -४ दिवसाला पाणी द्यावे, म्हणजे महिन्याभरात ते लवकर कुजून जाते. खत दिल्यानंतर आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या २ -३ फवारण्य घेतल्यानंतर झाडाच्या वाढीबरोबरच त्याला जमिनीलगत घुमारे फुटतात ते सिकेटरने छाटावेत. झाडाला छात्रीसारखा आकार द्यावा, खोड मोठे होईपर्यंत २ ते ३ फुट उंच खोड मोकळे राहील असे पहावे.

आंतरपीक : सुरुवातीची २ वर्षे यामध्ये विविध भाजीपाला भेंडी, गवार, टोमॅटो, वांगी, वेलवर्गीयमध्ये काकडी, टरबुज, खरबूज,डांगर भोपळा तसेच कडधान्यामध्ये उडीद, मूग करावे. तूर करू नये. करायची झाल्यास २ ओळी लिंबाच्या मधोमध कराव्यात. पहिले २ वर्षे शेवग्यासारखे आंतरपीक घेऊन यापासून दीड ते दोन लाख रू. मिळून ते या लिंबासाठी वापरता येईल. हा प्रयोग एवढा प्रचलित नाही, तेव्हा याची निरीक्षणे टिपावीत. शक्यतो कीड व रोगाला बळी पडणारी आंतरपिके करू नयेत.

आले, हळद, मका, बटाटा, रताळी हि अन्नद्रव्ये जास्त घेणारी पिके करू नयेत. उन्हाळी पालेभाज्या कराव्यात.

छाटणी : छाटणी करताना झाडाच्या घेराच्या खालील भागात आर्द्रता आणि उष्णता निर्माण झाल्यास्ने खालील भागातील फांद्यांना बहार जास्त लागत असतो त्याकरीता खालील फांद्या जादा न छाटता बाहेरून थोड्याथोड्याच छाटाव्यात.

बहार धरणे : लिंबू लागवडीनंतर ४ ते ५ वर्षांनी फळे लागतात. साधारणपणे मृग (जून), हस्त (ऑक्टोबर ) व आंबे (फेब्रुवारी) बहार धरतात. परंतु हस्त बहार धरल्यास मार्च ते जूनमध्ये फळे (लिंबू) मार्केटमध्ये येऊन बाजारभाव अधिक सापडतात.त्यासाठी उन्हाळ्यात पाण्याची उत्तम सोय असावी लागते.

हस्तबहार धरण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी यशस्वी : हस्त बहार घेतेळेस सप्टेंबरमध्ये अती पावसामुळे फळे लागत नाहीत. लागलेली फळे सापडतात. एप्रिल - मे मध्ये फळे लागतात, परंतु गुंडीगळ होते. ती थांबविण्यासाठी किंवा होऊ नये म्हणून अगोदरच सप्तामृत औषधांची फवारणी (५०० मिली + १०० लि. पाणी ) करावी. हस्त नक्षत्राच्या अगोदर सप्तामृताची फवारणी घेतल्याने फुल लागेल. तसेच त्याने हस्ताचा अती पाऊस झाल्यावरही फुल सडणार नाही. कल्पतरू चार वर्षाच्यावरील झाडास १ ते २ किलो दोन वेळा विभागून एकदा जून - जुलै व नंतर सप्टेंबरमध्ये द्यावे.

फुल येण्यासाठी ३ ते ४ महिन्यांची जून काडी असावी लागते. या पिकला बारमाही ओलीत असल्यामुळे फेब्रुवारी, जुलै व ऑक्टोबर या महिन्यांत अनुक्रमे ४८, ३५ व १७% बहार येतो. जानेवारी व जुलै फुलोर्‍याची फळे अनुक्रमे जुलै व डिसेंबरमध्ये पावसाळी व हिवाळी हवामानात तयार होत असल्याने यावेळी फळांना भाव कमी मिळतो. ऑक्टोबर फुलोऱ्याची फळे उन्हाळ्यात तयार होतात. त्यावेळेस फळांचे प्रमाण कमी असते, भाव अधिक मिळतात. त्यामुळे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्याने उत्पादनानात वाढ होऊन दर्जाही सुधारतो.

हस्त बहार व्यवस्थापनासाठी ऑगस्ट - सप्टेंबर या महिन्यात पावसामुळे ताण देणे शक्य होत नसल्याने याकाळात सायकोसील किंवा लिहोसिन (सी.सी.सी. ) हे संजीवक १००० पी. पी.एम. तीव्रतेचे फवारावे आणि नंतर बहाराची फूट निघण्यासाठी प्रिझम ५०० मिली + जर्मिनेटर ५०० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी करवी. बहार फुटल्यानंतर पुढे दिल्याप्रमाणे फवारण्या नियमित वेळेवर घ्याव्यात, म्हणजे हस्तबहाराचा माल उन्हाळ्यात चालू होऊन अधिक उत्पादन व अधिक भाव मिळविता येतो.

१) पहिली फवारणी : ( बहार फुटीसाठी ) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : ( गुंडी हरभर्‍याएवढी झाल्यावर ) : थ्राईवर ५०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन २५० मिली + हार्मोनी २५० मिली. + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : ( फळे सुपारीच्या आकाराची झाल्यावर ) : थ्राईवर ७५० मिली ते १ लि. + क्रॉंपशाईनर ५०० मिली ते १ लि. + राईपनर ७५० मिली + प्रोटेक्टंट ५०० ते ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली + हार्मोनी ३५० ते ४०० मिली. + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी (फळे बारीक कैरीएवढी झाल्यावर ) : थ्राईवर १ ते १ । लि. + क्रॉंपशाईनर १।।लि. + राईपनर १ लि. + प्रोटेक्टंट दिड किलो + न्युट्राटोन १।। लि. + हार्मोनी ५०० मिली. + २५० लि.पाणी.

प्रिझममुळे थंडीतही शेंडा व्यवस्थित चालतो, फूट निघतो, फुटवा वाढतो तर न्युट्राटोन वापरल्याने लिंबू आकराने मोठे, पिवळे धमक, रसाळ तयार होते.

किडी :पाने पोखरणारी अळी : कोवळ्या पानात शिरून आतील मगज खाते, पानांवर वेडेवाकडे पट्टे दिसतात. पाने चुरगळल्यासारखी होऊन झाडाची वाढ खुंटते.

२) पांढरी माशी : पानातील रस शोषून घेतल्याने पाने निस्तेज होऊन वाळतात, काळी बुरशी पडते.

३) कोळी कीड : पाने व फळांवर फिक्कट, पिवळे खड्डे दिसून, फळे विद्रुप दिसतात.

४) याशिवाय मावा, पिठ्या ढेकूण इ. किडींचाही प्रादुर्भाव लिंबावर होतो.

वरील सर्व किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी वेळोवेळी सप्तामृतातील प्रोटेक्टंटची फवारणी 'कृषी विज्ञान' केंद्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करावी.

रोग :

१) कँकर / खैर्‍या : हा रोग झान्थोमोनास या अणूजीवतंतूमुळे होतो. हा रोग फार संसर्गजन्य असून पावसाळी हवामान व अधिक आर्द्रता असल्यास झपाट्याने पसरतो. सुरुवातीला पानांना टाचणीच्या टोकाएवढे लहान, गोल, गर्द हिरवे व पाणीयुक्त ठिपके पृष्ठभागावर दिसतात. हे ठिपके तांबूस रंगाचे खरबरीत होऊन पानांच्या दोन्ही बाजूस दिसतात. ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाचे वलय तयार होऊन कालांतराने ते नाहीसे होते. पुढे हे ठिपके फांद्यावर वाढतात आणि झाड देवीचे व्रण ग्रासल्यासारखे दिसते. परिणामी शेंड्याकडील फांद्या मरतात. तसेच झाडे खुरटल्यासारखी दिसतात. फळांवर टिपक्यांची वाढ झाल्यास फळे तडकतात व अशा फळांना बाजारात मागणी नसते. रोपवाटिकेतील रोपांना या रोगाचा संसर्ग झाल्यास रोपांमध्ये पाने पोखरणार्‍या अळीने पोखरलेल्या मार्गाद्वारे हा रोग वेगाने पसरतो.

२) टिस्टेझा : या रोगाची लागवड झाल्यावर झाडाची नवीन फूट पुर्णपणे किंवा अपुर्ण अवस्थेत दाबून राहते. झाडावरील पाने निस्तेज आणि शिरा पिवळसर किंवा पांढरट होतात. पाने लांब दिशेने परंतु आतील बाजूने कुरळे होतात. नवीन पालवीचे पोषण नीट न झाल्यामुळे पानगळ होते. हा रोग ओळखण्यासाठी पाने सुर्यप्रकाशात बधितल्याने त्यामधील शिरा पोकळ झाल्यासारख्या दिसतात. झाडाच्या खोडाच्या किंवा मोठ्या फांदीच्या सालीखालील भागावर सुईने टोकरल्यासारखी खोल व्रण (स्टेम पिटर्स) दिसतात.

३) मुळकुज व डिंक्या : हा रोग फायटोप्थोरा या बुरशीमुळे होतो. सुरुवातीस मुळकुजीची लागण होऊन तंतुमय मुळे कुजतात. कालांतराने ही कूज मोठ्या मुळांपर्यंत जाऊन खोडावर पायकूज होते. खोडाच्या सालीवर ओलसर ठिपके दिसतात व त्या ठिकाणी उभ्या चिर पडून त्यामधून पातळ डिंक बाहेर पडतो. असा भाग तांबट तपकिरी दिसतो व या भागावरील पेशी मरून ठसूळ होतात. अशा झाडातील पाने निस्तेज होऊन शेंड्याकडील पाने पिवळी पडतात व पानगळ होते. झाडामध्ये अन्नद्रव्याचे अभिसरण मंदावल्यामुळे अकाली बहर येऊन फळे अपक्क स्थितीत गळून पडतात.

४) शेंडेमर : जुन्या व दुर्लक्षीत बागेत बुरशीच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या फांद्या वरून खाली वाळत येतात. या रोगाचा प्रसार दुय्यम माध्यमातून होतो. जसे तंतुमय मुळाजवळ अतितीव्र क्षारांचे अधिक प्रमाण. अन्नद्रव्यांची कमतरता, इतर किडी व बुरशीमुळे फांद्यांना व मुळांना झालेली इजा, जमिनीत जास्त काळ पाणी साचणे इ. कारणाने कोलेटोटायकम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे नवीन व पक्क फांद्या वरूनखाली वाळण्यास सुरुवात होते. नंतर ही मर बुंध्यापर्यंत जाते आणि त्यामुळे डायबॅकची लक्षणे दिसतात.

नियंत्रण : बागेत वारंवार हलकी चाळणी करावी, त्यामुळे अन्नद्रव्याचे चांगले शोषण होऊन झाड जोमदार वाढते. पावसाळयापुर्वी आणि नंतर रोगग्रस्त फांद्या छाटून त्याठिकाणी बोर्डोपेस्ट लावावी.

जर्मीनेटर ३० मिली + कार्बेन्डॅझीम १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम १०.लि पाण्यात मिसळून २ -३ वेळा फवारावे.

लिंबातील प्रमुख समस्या, विकृती :

पाने पिवळी पडणे लाईम इंड्यूस्ड आयर्न क्लोरॅसिस (LIIC) : लिंबाच्या झाडाच्या दक्षिणेकडील भाग हा कायम रोगट दिसतो. पाने पिवळी पडतात. LIIC चा प्रादुर्भाव होतो. पानांवर गुंडाळी येते. फुले व फळे कमी लागतात.

पानगळ : ह्यामध्ये पाने बशी व कपासारखी, विळ्याच्या आकारासारखी कातरलेली दिसतात.पानांवर डाग,फोड दिसतात.ताम्र (Cu) चे प्रमाण कमी झाले तर पानगळ झपाट्याने होते.(ज्यावेळेस सेंद्रिय पदार्थ, प्रेसमडचे प्रमाण अधिक होते. त्यावेळेस C:N Ratio वाढतो व झपाट्याने पानगळ होते. )

वरील सर्व प्रकारच्या किडी, रोग व विकृतीपासून सरंक्षण व दर्जेदार फळे मिळविण्यासाठी सुरूवातीपासून सप्तामृत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा. कँकर (फळावरील डाग), डागबॅक (शेंडे सुकणे), गमॉसिस ( Gummosis) च्या नियंत्रणासाठी १० ते १२ लि. पाण्यामध्ये प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + मोरचूद ५०० ग्रॅम + चुना २५० ग्रॅम + गेरू (काव) २५० ग्रॅमची पेस्ट करून कुंच्याने खोडस ३ ते ४ फुटापर्यंत १५ दिवस ते १ महिन्याच्या अंतराने लावावी.

काढणी व उत्पादन : साधारण लागवडीनंतर चौथ्या वर्षापासून फळे सुरू होतात. एका झाडापासून ५० ते १०० ग्रॅम वजनाची ४०० ते ५०० फळे मिळतात. ५ ते ७ वर्षाच्या एका झादापासोन २ ते ३ हजार फळे मिळून एकरी कमीत कमी खर्च जाऊन ४० ते ६० हजार रुपये मिळतात. ४०० लिंबाच्या पिशवीस ५०० ते १५०० रुपयांपर्यंत भाव मिळतो.