पॉलीहाऊसपेक्षा ओपन फिल्डमधील स्टॅटिसचा दर्जा अधिक, भाव जादा! (DLM - डिस्ट्रीक्ट लेव्हल मॉडेल)

श्री. वसंत रामचंद्र लोणारे,
मु. पो. भोसे, ता. खेड, जि. पुणे.
फोन नं.(०२१३५) २०२१८५, मोबा. ९०११४९९५१६


मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर १९८५ सालापासून सातत्याने करीत आहे. माझ्याकडे विहीर बागायती क्षेत्र ५ एकर आहे. त्यामध्ये अॅस्टर, झेंडू, ग्लॅडीओलस, स्टॅटिस, गुलछडी ही फुले तसेच कांदा, बटाटा, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, दुधी तसेच पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर ही पिके घेत असतो.

८५ साली आमच्या भागात पाण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून पाहुण्यांकडे (नाशिकला) एक एकर स्टॅटिस, एक एकर अॅस्टर आणि १ एकर झेंडू लावला होता. याला पूर्ण डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले होते. त्यामुळे फुलांचे उत्पादन चांगल आले. बाजारभावही चागले मिळाले. पैसेही झाले. त्याकाळी तीन एकरात खर्च वजा जात दीड लाख रू. झाले होते. शेती पाहुण्यांची असल्याने त्यांनी अर्धोलीतील ७५ हजार रू. रोख दिले होते. त्या पैशातून मग गावी नदीवरून लिफ्ट तसेच विहिरीचे काम करून बागायती क्षेत्र वाढविले.

यामधील स्टॅटिसच्या बाबतीत असा अनुभव आहे की, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फुलांना दांडा दीड फुटाचा मिळाला. त्यावेळी नाशिक मार्केटला आपली फुले चालू होण्यापुर्वीपासूनच पॉलिहाऊसमधील स्टॅटिसची फुले येत होती. त्यांच्या फुलांचा दांडा आखुड असायचा. त्यांना ३ रू. गड्डीस भाव मिळत असे. मात्र आपणास ४ ते ५ रू. भाव मिळू लागला. त्यांचा पॉलिहाऊसमधील माल असूनही आमच्या मालाशी (ओपन प्लॉटमधील असून ही) तुलना करू शकत नसे. त्यामुळे अगोदर त्यांचा माल घेणारे गिऱ्हाईक आमच्या मालाकडे आपोआपच वळाले. त्यामुळे पॉलिहाऊसमध्ये उत्पादन घेणारे श्री. छेडा यांनी आपला माल पाहिल्यावर "तुचे पॉलिहाऊस कोठे आहे व त्याला काय वापरता," असे विचारेले. तेव्हा त्यांना सांगितले आमचे पॉलिहाऊस वगैरे काही नाही. आमचा ओपन प्लॉटमध्ये स्टॅटिस आहे. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले व कोणाचे तंत्रज्ञान वापरता, यासाठी ते प्लॉट पाहण्यासाठी शेतावर आले. त्यांनी प्लॉट पाहिल्यानंतर डॉ. बावसकर तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली व त्यांनाही चागले रिझल्ट मिळत असल्याचे आम्हाला कळविले.

हे मॉडेल DLM (District Level Model) असून ते SLM (State Level Model) च्या वाटचालीवर आहे. तेव्हा श्री. लोणारे यांना सरांनी कृषी विज्ञानचे अंक तसेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे विविध विशेषांक भेट दिले.