डाळींबाची यशस्वी लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


डाळींबाचे मूळ स्थान इराण समजले जाते. त्याची लागवड स्पेन, इजिप्त, अफगाणिस्थान, पाकिस्तान, ब्रम्हादेश, चीन, जपान, रशिया, अमेरिका आणि भारत या देशामध्ये केली जाते. अफगाणिस्थानातील कंदाहार हे डाळींबाचे आगर आहे. भारतामध्ये डाळींबाची लागवड १०,००० हेक्टर क्षेत्राहून अधिक असून लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो.

महाराष्ट्रामधील अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये डाळींबाच्या लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार व राहूरी हा भाग डाळींब लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांत डाळींबाची लागवड झपाट्याने वाढतच आहे. ज्या भागात पाण्याचा तुटवडा आहे. तेथे हलक्या जमिनीत व कमी पाण्यावर तग धरणारी आणि जिथे इतर फळे व्यापारीदृष्ट्या फायदेशीर ठरत नाहीत, तेथे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. यामुळे या फळझाडाचे महत्व वाढत आहे.

डाळींबाच्या १०० ग्रॅम खाद्यभागात पाणी ७८.० %, प्रथिने १.६० %, स्निग्ध पदार्थ, ०.४० %, खनिज द्रव्ये ०.७%, तंतुमय पदार्थ ५.१%, पिष्टमय पदार्थ (शर्करा ) १४.६ %, चुना ०.०१%, स्फुरद ०.०७%, लोह ०.३%, उष्मांक ६४ कॅलरी, रीबोफ्लेवीन १०० मी. ग्रॅ. असते.

डाळींबाचे औषधी उपयोग - डाळींबाच्या झाडांची उपयुक्त अंगे म्हणजे साल ( खोडाची ), पाने ( विशेषत : कोवळी ), फुल, फळाची साल, बीज इ. होत. डाळींब आंबट - तुरट असूनही पित्त वाढवित नाही, जेवणात डाळींबाचे सुके दाणे वापरल्यास भोजन रुचकर होते.

डाळिंबाच्या झाडाची साल - सालीचे चूर्ण एरंड तेलाबरोबर घेतल्यास आतड्यातील कृमी नष्ट होतात. 'टेपवर्म' प्रकारात उत्कृष्ट ठरते. डाळींबाची ओली साल वाटून घेतल्यान त्याचा रस नाकात घातल्यास नाकातील राक्तास्त्राव थांबतो. जुलाब होते असल्यास डाळींबसाल उपयुक्त ठरते. तोंडाला पाणी सुटणे, थुंकी सुटणे, कफ पडणे या अवस्थेत सालीचे चूर्ण हिरड्यांना, जिभेला चोळल्यास वा मधासह चाटून खाल्ल्यास फायदा होतो.

डाळींबाची पाने - डोळे आल्यास पापण्यांवर पानांचा लेप लावावा, आग, टोचणी कमी होते. जास्त घामाने शरीरास दुर्गंधी येत असल्यास आंघोळीपूर्वी पानांचा रस सर्वांगास चोळावा त्यामुळे घाम कमी होऊन (येऊन ) त्वचा सतेज व रोगविरहीत राहते. पानांची चटणी वाटून सर्वांगास मसाज केल्यास थुलथुलीत अंगे बर्‍याच अंशी घट्ट होतात.

डाळींब फूल - 'गुलनार ' किंवा ' अनारकली ' नावाने मोसमात येणार्‍या या फुलांचे चूर्ण करावे. जुलाबाचा त्रास असल्यास चूर्ण जेवणाबरोबर घ्यावे. क्षय रोग्यास थुंकीतून रक्त पडत असल्यास हे चूर्ण शिंगाडा पिठात एकत्र करून द्यावे. अडुळसा पानात रस मिसळल्यास उत्तम. स्त्री रुग्णांना ' पांढरे ' जाते. या विकारात त्यांनी हे चूर्ण भीमसेनी कापूराबरोबर जेवणापूर्वी घ्यावे. स्त्री रुग्णांतील योनिशैथिल्य जाऊन नैसर्गिक व श्रेष्ठ अत्यानंद मिळतो. नाकातून रक्त येत असल्यास हे चूर्ण तपकिरी प्रमाणे ओढावे किंवा दूर्वांच्या मुळयांसह रस नाकात घालावा. जखमेतून येणारे रक्त थांबविण्यासाठी हे चूर्ण जखमेवर पसरावे.

फळाची साल - कृमी रोगात विशेष फलदायी ठरते. वस्त्रगाळ चूर्ण, दंतमंजन म्हणून वापरल्यास दात स्वच्छ होतात. हिरड्या घट्ट व गुलाबी होतात. हिरड्यातून येणारा पू कमी होतो. हे चूर्ण बाळकडू औषधातही वापरता येते. ताज्या सालीच्या बाटलेल्या चूर्णात हळद टाकून गुळण्या केल्यास घसा लाल होणे, दुखणे कमी होते. टॉंन्सिलवरही उपयुक्त ठरते. लहान मुलांत गुदद्वार बाहेर येण्याची समस्या असेल तर ही साल उपयुक्त ठरते. वारंवार चिकट संडास होणे, आव पडणे यावर जेवणानंतर चूर्ण घेतल्यास उपयुक्त ठरते. वारंवार शौचातून रक्त पडत असल्यास चूर्ण घ्यावे. डाळींब सालीचे वाळवून चूर्ण मधातून चाटविल्यास लहान मुलांना खोकल्यावर गुण येतो. पित्त विकारांमध्ये उपयुक्त.

डाळींब फळाचा रस - तृप्ती देतो, पित्तनाशक, क्षुधावर्धक असल्याने भूक वाढते व पचन व्यवस्थित होते. बलादायक व सप्तधातूवर्धक आहे. ह्दयरोगांवर गुणकारी औषध. पोटाची जळजळ, आंबट ढेकर, लघवीची आग होणे हे सर्व विकार कमी होतात. अनियमित जेवण, मद्यसेवन, चमचमीत मांसाहार याने पित्ताचा जळजळीतपणा वाढतो. तो आटोक्यात आणण्याचे काम डाळींब रसाने होते. तापाचे प्रमाण वाढल्यास तहान लागते व लघवी जळजळीत होते. फळांच रस थोड्या - थोड्या वेळाने दिल्यास उपयुक्त ठरतो. उष्णतेच्या विकारांत उपयुक्त. गर्भवती स्त्रियांचा उलट्यांचा त्रास डाळींब रसाने आटोक्यात राहतो व अशक्तपणाही येत नाही. उचकी लागणार्‍या रुग्णांना डाळींब रस व वेलची पूड मिश्रण चाटवावे व नंतर सूतशेखर मात्रा चाटवावी उचकी थांबते. डोळ्यावर ताण पडून डोळे दुखणे, पाणी येणे यासाठी डाळींबाचा रस डोळ्यात घालावा.

डाळींब बीज - डाळींब बियांचे चूर्ण गरम पाण्यासह घेतल्यास जुलाब होणे, आव पडणे या तक्रारी कमी होतात.

डाळींबाच्या मुळ्या - कृमी किंवा जंतावर डाळींबाच्या मुळ्यांचा काढा प्यायला द्यावा.

डाळींबाची लागवड -

हवामान - डाळींबाच्या झाडांची वाढ व उत्पादन क्षमता समशीतोष्ण व कोरड्या हवामान उत्तम होते. चांगल्या प्रतिची फळे मिळण्यासाठी, फळांची वाढ होते असताना हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमी असणे आवश्यक आहे. दमट हवामानात फळांवर रोग व किडीच प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. तसेच फळे तडकण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच महाराष्ट्रातील कमी पावसाच्या भागात जेथे ओलीताची सोय आहे. अशा ठिकाणी हे पीक हमखास चांगल्या प्रकारे येते.

जमीन - डाळींबाचे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत येते. भारी जमिनीत झाडांची वाढ भरपूर होते, मात्र फळांना चांगला रंग येत नाही. अत्यंत हलक्या, मुरमाड जमिनीत फळांना चांगला रंग येतो, परंतु उत्पादन थोडे कमी होते. पाण्याचा अनियमित पुरवठा झाल्यास फळे उकलण्याचे प्रमाण वाढते. म्हणून मध्यम प्रकारची व उत्तम निचर्‍याची जमीन या फळझाडासाठी निवडावी. चुनखडीच्या व विम्लयुक्त जमिनीत लागवड करणे शक्यतो टाळावे.

जाती :

१) गणेश : डाळींबाच्या अनेक जाती असल्या तरी डॉ. चिमा यांच्या प्रयत्नाने फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे येथे विकसीत झालेली गणेश ही जात सर्वोत्तम आहे. या जातीची फळे आकाराने मध्यम असून बिया मऊ असतात. दाण्यांचा रंग फिकट गुलाबी असून चव गोड असते.

२) जी -१३७ : ही जात गणेश जातीतून निवड पद्धतीने महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केली आहे. ह्या जातीत आतील दाणे मऊ आहेत व रंग गणेशपेक्षा किंचित गडद आहे. दाण्यांचा आकार गणेशपेक्षा मोठा आहे. गोडीसुद्धा गणेशपेक्षा सरस आहे.

३) मृदुला : ही जात गणेश व गुल - ए -शाह रेड या जातींच्या संकरीत पिढीपासून निवड पद्धतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. या जातीची फळे आकाराने मध्यम (३०० -३५० ग्रॅम ) असून फळांचा रंग व दाण्यांचा रंग गडद लाल असतो. बी अतिशय मऊ असून दाण्यांचा आकार मोठा आहे. फळांची गोडी गणेश जातीच्या फळांसारखीच आहे. फळांचा पृष्ठभाग गडद लाल आणि चमकदार असतो.

४) फुले आरक्ता : ही जात गणेश व गुल-ए-शाह रेड जातीच्या संकरित पिढीपासून निवड पद्धतीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने प्रसारीत केली आहे. फळांचा आकार मोठा, दाणे गोड, टपोरे, मृदु आणि आकर्षक तसेच फळांची साल चमकदार आणि गडद लाल रंगाची आहे.

५) भगवा : डाळींब बागांच्या केलेल्या सखोल सर्व्हेक्षणापासून भगवा ( शेंदरी, अष्टगंधा, केसरी, मस्तानी, जय महाराष्ट्र आणि रेड डायना ) वाण अधिक उत्पादनक्षम असून फळांमध्ये गुणवत्तेचे अपेक्षित घटक असल्याचे आढळून आले आहे. या वाणाची फळे १८० -१९० दिवसांमध्ये परिपक्व होतात. मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वेळापत्रकाप्रमाणे वापर केल्यास ३० ते ४० दिवस लवकर पक्व होऊन काढणीस येतात. फळांचा आकार मोठा, गोड टपोरे आणि आकर्षक दाणे, तसेच चमकदार, आकर्षक, केशरी रंगाची जाड साल असलेली फळे दूरवरच्या बाजारपेठांसाठी उपयुक्त आहेत. इतर वाणांच्या तुलनेत हा वाण फळांवरील काळ्या ठिपक्या रोगांसाठी तसेच फुलकिडीस कमी बळी पडणारा आहे. या सर्व बाबींमुळे भगवा वाणाची महाराष्ट्रातील डाळींब उत्पादन घेणार्‍या भागांमध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे.

अभिवृद्धी - डाळींबाची अभिवृद्धी बियांपासून, फांद्यापासून छाटकलमे करून तसेच गुटीकलमाद्वारे केली जाते. मात्र बियापासून रोपे तयार करून लावलेल्या झाडांची पुढे वाढ व्यवस्थित होत नाही. फळे लागण्यास अधिक काळ लागतो. शिवाय फळांच्या गुणवत्तेत बराच फरक पडतो.

कलमापासून बाग लावल्यास झाडांची वाढ एकसारखी होत असते. तसेच फळे लवकर लागत असून फळांची गुणवत्ता एकसारखी राहते. उत्तम, दर्जेदार, भरपूर आणि नियमित फळे देणार्‍या मातृवृक्षापासून गुटी व छाट कलमे तयार करावीत. गुटी कलमे तयार करण्यासाठी झाडावरच शेंड्याकडील ३० ते ४५ सेंमी लांबीच्या पेन्सिलाच्या जाडीच्या आकाराच्या ४ ते ६ महिने वयाच्या फांद्या निवडाव्यात. पावसाळ्याच्या सुरूवातीस या फांद्यावरील २ सेंमी लांबीची गोलाकार साल काढून त्यावर जर्मिनेटरच्या द्रावणात (१०० मिली + १० लि. पाणी ) भिजविलेले शेवाळ (मॉस) बांधावयास दुरूवत केल्यास १ ते १।। महिन्यात मुळे फुटून गुटी कलमे तयार होतात. छाट कलमांपासून अभिवृद्धी करावयाची असल्यास निरोगी, जातिवंत बागेतून छाट कलमे करण्यासाठी फांद्या निवडाव्यात. अशा बागेतील चांगली फळे देणार्‍याच झाडांची निवड करावी. झाडाच्या खोडाभोवती असणारी फूट कलमासाठी अगदी योग्य समजावी. छाटकलमे तयार करताना पेन्सिलच्या जाडीच्या परिपक्व काड्या निवडाव्यात. फांदीच्या तळाचा जुना भाग व शेंड्याकडील कोवळा भाग छाटून टाकून मधला भाग कलमासाठी वापरावा. छाट कलमाची लांबी २० ते २५ सें. मी. असावी व त्यावर किमान ४ ते ६ डोळे असावेत. त्यावरील सर्व पाने डोळ्यांना इजा न होता काढून टाकावीत. कलमाच्या तळाचा छाट डोळ्यांच्या किंचीत खाली सालीस इजा न करता घ्यावा. वरील छाट, १० लि. पाण्यात १०० मिली जर्मिनेटर घेऊन या द्रावणात २४ तास बुडवून लावल्यास छाट कलमांना मुळ्या लवकर व अधिक फुटतात.

खड्डे भरणे - एकरी १/२ किलो प्रोटेक्टंट २५ लिटर पाण्यामध्ये मिसळून निवळी तयार करावी. निम्मी खड्डे भरतांना व निम्मी जमिनीवर पसरावी. खड्ड्यामध्ये पालापाचोळा टाकावा. चांगले कुजलेले शेणखत २० किलो आणि कल्पतरू सेंद्रिय खत खालील प्रमाणात देऊन खड्डे भरून घ्यावेत.

नवीन लागवड - लागवडीसाठी २ -३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमिन तयार करावी. ६० x ६० x ६० सें. मी. आकाराचे खड्डे घ्यावेत. हलक्या जमिन्ति ३ x ३ मितर, मध्यम जमिनीत ४ x ४ मीटर भारी जमिनीत ५ x ५ मीटर, अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी अनुक्रमे ११००, ६२५, ४०० झाडे बसतात. सर्वसाधारणपाने औरस चौरस पद्धतीने लागवड करतात.

कल्पतरू खत देण्याचे प्रमाण, वेळ व पद्धत :

खड्डा भरण्याच्या वेळेस रोपास २५० ग्रॅम कल्परारू सेंद्रिय खत टाकावे. नंतर २५० ते ५०० ग्रॅम खत प्रत्येक झाडास बांगडी पद्धतीने बहार धरतेवेळी आणि पुन्हा २ महिन्यांनी ५०० ग्रॅम खत प्रत्येक झाडास बांगडी पद्धतीने शक्यतो बाफश्यावर द्यावे. खत दिल्यानंतर पाणी देणे आवश्यक आहे.

डाळींबाची झाडे लहान असताना घ्यावयाची काळजी :

डाळींब झाडाचे लवकर दर्जेदार उत्पादन घेण्याकरीता झाडाच्या मुख्य खोडावरून झाडाच्या वेगवेगळ्या दिशेला ३ ते ४ शाखांची फूट निघणे गरजेचे असते. ही फूट निघाल्याने झाडांची मर होत नाही. तसेच जून महिन्यात लागवड केलेल्या डाळींबाला पहिल्या आणि दुसर्‍या वर्षीचा जेथे उन्हाळ्यात पाण्याची सोय आहे, अशा ठिकाणी आंबे बहार धरता येतो. तसेच जर उन्हाळ्यात पाण्याची सोय नसेल तर दोन वर्षानंतर मृग बहार धरावा. मात्र या अवस्थेत प्रतिकुल परिस्थिती (पाऊस अत्यंत कमी, कडाक्याची थंडी, धुके) असल्यामुळे झाडांचे उत्पादन घेण्यास अडचणी निर्माण होतात. तथापि, हे सर्व साध्य करण्यासाठी नवीन लागवडीच्या झाडांची जोमदार वाढ करून घेण्याकरीता सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा फवारणी व आळवणीतील वापर खालीलप्रमाणे करावा.

१) पहिली फवारणी - (लागवडीनंतर १५ ते २१ दिवसांनी ) :

जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी - (लागवडीनंतर १ ते १।। महिन्यांनी) :

जर्मिनेटर ४०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ राईपनर १५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ३०० मिली. + ११५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी - ( लागवडीनंतर २ ते २।। महिन्यांनी ) :

जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ६०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ७५० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + १५० ते २०० लि.पाणी.

आळवणी : १) पहिली आळवणी : ( पहिल्या फवारणीनंतर आठवड्याने ) -

जर्मिनेटर ६०० मिली.+ थ्राईवर ६०० मिली. + प्रिझम ६०० मिलीचे २०० लि. पाण्यामध्ये द्रावण तयार करून प्रत्येक रोपास २५० ते ३०० मिली द्रावण झाडाच्या शेंड्यावरून मुळापर्यंत सोडणे.

२) दुसरी आळवणी :

( दुसर्‍या फवारणीनंतर आठवड्याने ) - वरील प्रमाणेच करणे. टीप :

ड्रीपची सोय असल्यास आळवणी ड्रीपद्वारे दिले तरी चालते. त्याकरिता २०० लि. पाण्यासाठी १ लि. जर्मिनेटरचा वापर करावा, म्हणजे त्याने रोपांच्या पांढर्‍या मुळीचा जारवा जोमाने वाढून रोपांची वाढ होण्यास मदत होत. यापुढील वापर आमच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार करावा.

पाणी -

आंबे बहारासाठी १५ डिसेंबर ते १५ जानेवारीपर्यंत पहिले पाणी द्यावे. पुणे विभागात मार्चनंतर पहिले पाणी देतात. नंतर फळे तयार होईपर्यंत भारी जमिनीत ८ -१० दिवसांनी व हलक्या जमिनीत ५ -६ दिवसांनी नियमित पाणी द्यावे. बहार धरण्यापूर्वी अडीच ते तीन महिने पाणी तोडावे. पाण्याची कमतरता असल्यास मृग बहार धरावा. हा बहार धरण्यापूर्वी मार्चमध्ये बागेचे पाणी तोडावे. मी महिन्याच्या सुरुवातीस पहिले पाणी द्यावे. नंतर आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यामध्ये (नोव्हेंबर ते मार्च) शक्यतो पाणी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत द्यावे. मार्च ते मे (उन्हाळ्यात) या काळात पाणी सकाळी ९ वाजण्यापूर्वीच द्यावे.

हंगामावर आंतरपिके -

खरीप - वांगी, मिरची, घेवडा, भुईमूग.

रब्बी - कोबी, फुलकोबी, नवलकोल, वाटाणा.

उन्हाळी - भेंडी, गावर, घासगवत (नगर जिल्ह्यात)

बहार धरल्यानंतर डाळींबाच्या बागेस निर्यातक्षम, दर्जेदार अधिक उत्पादनासाठी खालीलप्रमाणे डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच वापर करावा.

फवारणी :

१) पहिली फवारणी : छाटणी झाल्यानंतर ४ ते ५ दिवसांनी - पहिले पाणी दिल्यानंतर २ ते ३ दिवसांनी प्रिझम ५०० मिली. + जर्मिनेटर १ लि.+ थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + २०० ते २५० लि.पाणी.

* दुसरी आळवणी : बहार धरल्यानंतर ८ दिवसांनी जर्मिनेटर १ लि. + २०० ते २५० लि. पाणी .

२) दुसरी फवारणी : पहिल्या फवारणीनंतर १२ ते १३ दिवसांनी ( नवीन पालवी पिवळसरतांबूस रंगाची असताना) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम किंवा किटकनाशक + २०० ते २५० लि. पाणी.

३) तिसरी फवारणी : वरील फवारणीनंतर १० दिवसांनी ( २२ ते २४ व दिवस - चौकी तयार होत असताना) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + बुरशीनाशक + २०० ते २५० लि. पाणी .

४ ) चौथी फवारणी : वरील फवारणीनंतर १५ दिवसांनी ( ३५ ते ४० वा दिवस - कळी निघते वेळी) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ते ७५० ग्रॅम + बुरशीनाशक + २०० ते २५० लि. पाणी .

तिसरी आळवणी : (फुल साईज सेटिंग - ५० वा दिवस ) जर्मिनेटर १ लि. + २०० ते २५० लि. पाणी.

५) पाचवी फवारणी : (गाठ सेटिंग अवस्था - फळे लिंबाच्या आकाराची झाल्यावर ) थ्राईवर १ लि + क्रॉंपशाईनर १ लि. + प्रिझम ५०० मिली + न्युट्राटोन १ लि. + १ किलो प्रोटेक्टंट + बुरशीनाशक + २०० ते २५० लि. पाणी.

६ ) सहावी फवारणी : (९० ते १०० दिवसांनी ) थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर १ लि. + न्युट्राटोन १ लि. + १ किलो प्रोटेक्टंट + बुरशीनाशक + २०० ते २५० लि. पाणी.

किंग साईज, सुपर साईज मालाचे तोडे चालू असेपर्यंत थ्राईवर , क्रॉंपशाईनरसोबत न्युट्राटोन, राईपनर प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून दर १५ दिवसांनी फवारणी करावी.

वेगवेगळ्या भागातील हवामान व हंगामात सर्व तंत्रज्ञान आमच्या 'कृषी विज्ञान' केंद्रावरील तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावे.

काढणी :

फलधारणेपासून फळे तयार होण्यास जातीपरत्वे १३५ ते १७० दिवस लागतात. मृग बहाराची फळे ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये तयार होतात. आंबे बहाराची फळे मे च्या दुसर्‍या आठवड्यापासून विकण्यास तयार होतात. जून, जुलैमध्ये माल खूप निघतो. हंगाम १५ ऑगस्टपर्यंत चालतो. आंबे बहराची फुले जानेवारी - फेब्रुवारीमध्ये येतात. फळे एकदम येत नसल्यामुळे ६ ते ८ वेळेस तोडणी करावी लागते. डाळींबाच्या चांगल्या फळांना मार्केटमध्ये फेब्रुवारी ते मार्च (द्राक्षाअगोदर) तसेच १५ जुलै ते १५ ऑगस्टमध्ये (कारण या काळात मार्केटमध्ये दुसरी फळे नसतात म्हणून) मागणी असते. परंतु अशा फळांची काढणी अगोदर (फळ पक्व होण्यापूर्वी ) १ महिन्यामध्ये १५दिवसाच्या अंतराने २ वेळा क्रॉंपशाईनर, राईपनर व न्युट्राटोन फवारले असता फळांना गर्द सफरचंदासारखा लाल कलर येउन अधिक पैसे कमविता येतात. समजा उशीर होत असेल तर ३ -४ महिने अगोदर नियोजन करावे लागेल. किंगसाईजच्या डाळींबाकरिता क्रॉप - शाईनरचे प्रमाण वाढविल्यास फळांना शाईनिंग येईल. राईपनर वापरताना दक्षता घ्यावी, कारण राईपनर वापरल्यानंतर ८ दिवसातच फळ पूर्ण लालबुंद सफरचंदासारखे होते. निर्यातीकरिता मार्केटची डिमांड, बोटीची वाहतूक, क्वारन्टाईन अॅक्त (Quarantine Act) खरेदी करणारे निर्यातदार या सर्वांची साखळी अगोदर बांधून सज्ज राहणे. त्या दृष्टीने वेळापत्रक आखणे, असे केल्यास तारांबळ उडणार नाही.

उत्पादन :

कलमांपासून दीड ते दोन वर्षात उत्पादन सुरू होते, तर रोपांपासून अडीच ते तीन वर्ष उत्पादनास लागतात.

पहिला बहार - ६० ते ८० फळे ( १५ ते २५ किलो)

दुसरा बहार - ८० ते १०० फळे (२५ ते ३० किलो )

तिसरा बहार - १०० ते १५० फळे (३० ते ५० किलो)

झाडांची संपूर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजे ५ ते ६ व्या वर्षापासून प्रत्येक झाडापासून २०० ते ३०० फळे मिळतात. १५ वर्षापर्यंत चांगले पीक येऊ शकते.

पुणे मार्केटसाठी मध्यम प्रतीची (५०० ते ७५० ग्रॅम वजनाची ) तर कलकत्ता मार्केटसाठी ३०० ते ४०० ग्रॅम वजनाची आणि दिल्ली मार्केटसाठी ७५० -१५०० ग्रॅम वजनाची डाळींब फळे चांगल्या भावाने विकली जातात.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्प्तामृताच्या नियमित योग्य प्रमाणात फवारण्या केल्यास फळे जाड सालीची मोठ्या आकाराची, आकर्षक रंगाची होऊन मार्केटमध्ये हमखास चांगला भाव मिळतो.