विद्यापीठाच्या शिफारशीनुसार केलेल्या रासायनिक औषधांमुळे २२ - २३ डझन माल डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने ८० ते ९० डझन आंबे प्रत्येक झाडावर

श्री. सुशिल अरुणकुमार कडीकर,
मु. पो. चौल, ता. अलिबाग, जि. रायगड.
फोन नं. (०२१४१) २४१२३६


शेती : वलके, ता. मुरूड, जि. रायगड.

आमच्याकडे ५ - ६ वर्षापुर्वी लावलेल्या हापूस आंब्याची ३८ झाडे आहेत आणि इतर वाणांची ४७ झाडे नवीन १ - २ वर्षातील आहेत. तर या दोन्ही अवस्थेतील आंब्याच्या झाडांना प्रथमच चालू वर्षी नोव्हेंबर २००९ अखेरपासून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर सरांच्या सल्ल्यानुसार केला.

मोठ्या (बहाराच्या) झाडांना सुरुवातीला कल्पतरू सेंद्रिय खत ५०० - ५०० ग्रॅम प्रत्येक झाडास देऊन सप्तामृताची फवारणी चालू केली. त्याने बहार चांगला लागला. नंतर आलेल्या मोहोराचे संरक्षणासाठी सप्तामृताच्या दर महिन्याला २ फवारण्य केल्या असता मावा, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव पुर्णता आटोक्यात होता. नंतर कैऱ्या धरल्यावर त्या पोसण्यासाठी सप्तामृताच्या २० ते २५ दिवसाच्या अंतराने तीन फवारण्य केल्या. अशा एकूण ६ फवारण्यावर आंबा आला.

गेल्यावर्षी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार रासायनिक औषधांचा वापर केला होता. तर २२ - २३ डझन माल प्रत्येक झाडापासून मिळला होता. त्या ठिकाणी चालू वर्षी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने ८० ते ९० डझन माल प्रत्येक झाडापासून मिळाला. सर्व फळे मोठी ३०० ते ४०० ग्रॅम वजनाची मिळाली. तसेच फळे चकाकणारी असल्याने आम्ही सर्व कुटुंबीय चकीत झाले.

स्थानिक मार्केटला ३०० ते ३५० रू. डझन भाव
भाव ७५ ते ८० रू. डझन झाले तरी
आमचा माल २०० रू ./ डझनने विकला जातो


एप्रिल २०१० अखेरीस माल काढणीस सुरुवात केली. माझो वय झाल्याने आणि मुलगा नोकरी करीत असल्याने आम्हाला मुंबई मार्केट करणे शक्य नव्हते. त्यामुळे स्थानिक ठिकाणीच विक्री केली. सुरुवातीला ३०० ते ३५० रू./ डझन भाव घेतला. नंतर (सध्या) भाव ढासळले आहेत. ७५ - ८० रू./ डझन भाव चालू आहे. तरी आम्ही २०० रू./ डझनाच्या खाली माल देत नाही. गिऱ्हाईकाला सुरुवातीलाच सांगतो अगोदर माल बधा आणि मग पैसे द्या. स्थानिक गिऱ्हाईक माल नेते. माल अजून शिल्लक आहे, पण भाव तोडणार नाही. वाटल्यास प्रक्रिया करून विक्री करू, असे ठरविले आहे.

नवीन बागेलाही या तंत्रज्ञानाचा वापर केला तर कलामांच्या वाढीत आश्चर्यकारक बदल दिसला. पाने हिरवीगार, टवटवीत झाली आहेत. जणू खराब पाने, फांद्या, छाटणी करून काढल्यासारखी बाग हिरवीगार दिसत आहे.