संपुर्ण रोगग्रस्त पपईची झाडे ९ दिवसात सुधारली १२०० केशर आंब्यासही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी

श्री. दिवाकर माधवराव सराफ, मु. पो. लोहगाव, ता. जि. परभणी,
फोन. (०२४५२) २२०३२१


तैवान ७८६ पपईची लागवड सात एकरमध्ये ८' x ८' वर १६ जुलै २००७ रोजी केली. जमीन मध्यम ते भारी असून पाणी पाटाने देतो. या पपईला लागवडीच्या वेळी रासायनिक खते शेणखतासह दिली होती. २॥ महिन्याची पपई २॥ फुट उंचीची झाल्यावर २- ३ झाडांनी शेंड्याकडील पाने आकसू लागली. रोगाचे निदान होण्यापुर्वीच २- ३ दिवसात त्याचे प्रमाण झपाट्याने वाढून १५ - २० झाडे निस्तेज दिसू लागली. गावातील लोक म्हणाले ही रोगट झाडे उपटून नष्ट करा.

या अवस्थेत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, पुणे येथे सरांना फोन करून परिस्थिती चा आढावा दिला, त्यावर सरांनी सप्तामृत औषधांचा पपईला प्रतिकुल परिस्थितीत कसा उपयोग होतो ते सांगितले. मी सप्तामृत औषधे माझ्याकडे असलेल्या २८ एकर क्षेत्रातील आंबा, मोसंबी, सिताफळ, केळी , अंजीर, चिंच या फळबागेला वाढीसाठी वापरत होतोच. त्यामुळे या औषधांचा रिझल्टही माहित होता.

गेल्यावर्षी या मोठ्या क्षेत्रासाठी २- २ लिटर सप्तामृत घेऊन गेलो होतो. त्यातील औषध शिल्लक असल्याने सरांशी पपईसंदर्भात फोनवर बोलणे झाल्याप्रमाणे लागलीच सप्तामृत औषधांची ३ दिवसांच्या अंतराने तीन वेळा रोगग्रस्त झाडांवर दाट फवारणी घेतली. तसेच इतर क्षेत्रावरही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून एक फवारणी त्यावरही घेतली. ३ - ३ दिवसांनी ३ फवारण्या केल्यावर ९ व्या दिवशी पाने पुर्ण १०० % रुंद टवटवीत झाल्याने आढळले. त्यामुळे रोगग्रस्त झाडे उपटून टाकण्याचा संबंधच आला नाही. नंतर १० दिवसांनी एक आणि १५ दिवसांनी एक अशा २ फवारण्या घेतल्या. सध्या झाडे ६ फूट उंचीची झाली असून फुलकळी व लहान - लहान फलेही लागली आहेत.

केशर आंब्याची १२०० झाडे ५ वर्षापुर्वीची आहेत. त्याचा आता आंबेबहार धरला आहे. त्याची मोहोर गळ होऊ नये. तसेच फळांचे पोषण चांगले होण्यासाठी फळे काढणीपर्यंत फवारणीसाठी सप्तामृत औषधे ५ - ५ लि. आणि कल्पतरू सेंद्रिय खत एक तन घेऊन जात आहे. यातीलच पपईलाही वापरणार आहे.