अति पावसामध्ये पिकांचे सुयोग्य नियोजन व व्यवस्थापन!
प्रा. डॉ. वि.सु. बावसकर
                                गेल्या ४० वर्षात एवढा विस्तृत एकसारखा पाऊस कधी झाला नाही. असा गेल्या दोन महिन्यात
                                पाऊस पडला. यामध्ये खते, निविष्ठा जमविण्यात शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. याचा ताण एकंदरीत
                                सर्व वितरण संस्था, विविध सहकारी संस्था, कृषी सेवा केंद्र यांवर पडला. पावसाच्या भुतोना
                                भविष्यती ७२ च्या दुष्काळापेक्षा भयंकर दुष्काळाला शेतकरी व सर्वजण २ वर्ष सामोरे गेल्याने
                                निसर्गाने प्रसन्न होऊन यंदा भरपूर पाऊस दिला. याचे प्रमाण जरी अधिक झाले असले
                                तरी उत्तर भारतातील प्रचंड वाहणाऱ्या नद्यांना जसा अलोट पूर आला तशी परिस्थिती महाराष्ट्रात नसली तरी विदर्भात सतत पाऊस होऊन येथील जमिनीची धारणाशक्ती
                                अधिक असून पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस कडधान्य - तूर, उडीद, मूग यांची पांढरी मुळी
                                मुकी झाल्याने पाने पिवळी पडून वाढ खुंटली व काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव होण्यात
                                सुरुवात झाली आहे. अगोदरच्या ठिबकच्या लागणीच्या कापसास ज्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले
                                त्यांचा कापूस हा भरपूर फुटवा होऊन फुलपात्यात आहे, कैऱ्या लागलेल्या आहेत, तर सोयाबीन
                                इतरांचे जरी पिवळे पडून रोगट झाले असले तरी ज्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले त्यांचे
                                सोयाबीन पोटरीबरोबर आले असून त्याला फुल आणि शेंगा लागलेल्या आहेत. थोडा किडीचा जेथे
                                प्रादुर्भाव आहे तेथे प्रोटेक्टंट, हार्मोनी, स्प्लेंडर काम करेल. ज्या ठिकाणी पांढरी
                                मुळी थांबलेली आहे, शेंडा थांबलेला आहे तेथे जर्मिनेटर सोबत प्रिझमची आळवणी करावी,
                                म्हणजे पिकत सुधारणा होईल. ज्याठिकाणी पिकाजवल गवत आले आहे. तेथे चालता
                                चालता मजूराकडून अलगद पीक  न दुखावता उपटून मुळे आकाशाकडे उलटी
                                करून ती जीव धरणार नाही असे पहावे.
                                
शेणखताची उपलब्धता नसताना खताचे नियोजन
                                
सध्याच्या परिस्थिती अपरिमित विपूल असे सर्वदूर गवत झाले आहे, ते गवत अधिक ओली मुळे खुरपणी करणे शक्य होत नाही तेथे गवत मजुरांकडून (विशेषता गड्यांकडून) उपटून काढावे, द्विदल गवताचे सोटमूळ असल्याने सहज उपटले जाते. एकदल तणाची मुळे तृण व पसरलेली असल्याने थोडे काळजीपुर्वक उपटावे. ढिग १० x ६ x २ फुटाचे करून त्यात गांडूळ सोडावेत. नंतर त्यावर काढलेले गवत उलटे करून टाकून त्यावर कल्पतरू टाकावे. कल्पतरूला उष्णता असल्याने ते गवत मरून जाते व लवकर कुजू लागते. अशाप्रकारे १ -१ फुटाचे गवताचे व थोडे कल्पतरू टाकून थर करावेत. असे तीन थर केल्यावर त्यावर शेणखत टाकून झाकून टाकवे. आता हवेत आर्द्रता आहे, जमीन ओली आहे. १ किलो उपयुक्त गांडूळ सोडावेत आणि खड्ड्यात १ किलो डाळीचे पीठ, १ किलो गुळ याचे बादलीभर द्रावण करून खड्ड्यावर सड्यासारखे शिंपडावे. खताच्या खड्ड्यावर पालेभाज्या निवडल्यानंतर मेथीच्या काड्या, कांद्याची टरफळे तसेच गव्हाचा कोंडा गांडुळांना खाद्य म्हणून टाकवे. गवत जर कोरडे कोरडे असले तर ते लवकर कुजण्यासाठी त्यावर पाणी टाकावे. अशा रितीने ३ ते ४ महिन्यात उत्तम प्रतिचे खत तयार होते. असेच प्रयोग करत राहिले तर १ टन सेंद्रिय - गांडूळ खत निर्माण करता येईल आणि हे पिकाची भूक भागवेल. महागड्या रासायनिक खतापासून आपली जमीन मुक्त होऊन आपणास उत्कृष्ट अन्न - धान्य, फळे, फुले, भाजीपाला मिळेल.
                                
अति पावसात शेवग्याचे व्यवस्थापन
                                
गेल्यावर्षी बऱ्यापैकी 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड झाली आणि त्यापासून दुष्काळी परिस्थितीत लोकांना चांगले पैसे मिळू लागले. मुख्य पिकापेक्षा दुय्यम पीक शेवगा हे नंतर मुख्य पीक गेल्यामुळे हेच मुख्य पीक झाले. या संदर्भातील मुलाखती कृषी विज्ञानमध्ये आल्याने त्या वेळोवेळी सर्वांना प्रेरणादायक ठरल्या आहेत. विदर्भ व मराठवाड्यात सर्वसाधारण पावसाची परिस्थिती असताना तर काही भागात दुष्काळी परिस्थतीत कोरडवाहू कापसात 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड केली तर निरीक्षणातून असे दुष्टीक्षेपात आले की, कापसापेक्षा शेवग्याचे उत्पन्न अधिक आले आणि कापसाना सर्व खर्च शेवग्यातून नुसता निघाला नाही तर दुष्काळी परिस्थितीत जेथे कापसाचे फक्त १ - २ क्विंटल उत्पादन मिळाले तेथे शेवग्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न दिले. मे - जूनमध्ये लावलेला शेवगा डिसेंबरमध्ये चालू होऊन मार्चपर्यंत उत्पन्न मिळाले. नंतर - त्या शेतकऱ्यांनी कापसाबरोबर शेवगाही काढला. कारण पुढे शेवगा ठेऊन पुढीलवर्षी कापूस लावता येत नाही. म्हणून दरवर्षी शेवगा व कापूस लावू लागले आणि कापूस मुख्य पीक असून ते दुय्यम पीक झाले आणि शेवगा दुय्यम पीक होते ते मुख्य पीक झाले. डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत कापसाबरोबर शेवग्यालाही फवारले गेले. अशा प्रकारे मिश्र पिकाचे प्रयोग करणे गरजेचे आहे. असे प्रयोग शास्त्रज्ञ, प्रशासकीय अधिकारी, नियोजनकर्ते, नेत्यांना, स्वयंसेवी संस्थांना, शेतकऱ्यांना प्रेरणादायक व मार्गदर्शक ठरतील. वर्षभर येणारी अनेक पिके आहेत. उदा. दुष्काळी परिस्थितीत पुरंदर तालुक्यांतील विवेक कोलते या तरून शेतकऱ्याने वांग्यातून २ एकरातून ६ लाख मिळविले. (संदर्भ - कृषी विज्ञान, ऑग़स्ट २०१३, पान नं. २९) असे अनेक प्रयोग करता येतील. गवार गम मुख्यपिकाबरोबर कंपाऊंडवर दुधीभोपळा, कारले घ्यावे. विंग कमांडर श्री. आकरे यांनी विदर्भात डाळींबामध्ये सोयाबीन घेतले आहे. तात्पर्य म्हणजे दुष्काळी परिस्थितीत नुसते एकच पीक सलग ठोक न करता मिश्रपीक पद्धती अवलंबावी, म्हणजे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. सरकारला पॅकेज देण्याची व शेतकऱ्यांना घेण्याची गरज राहणार नाही.
                                
हल्लीच्या परिस्थतीत शेवग्याची लागवड भरपूर होत आहे. शेवग्याच्या रोपाची काडी नाजूक असते. २ महिन्यापासून पाऊस सतत चालूच आहे आणि हवेतील आर्द्रताही ८० - ९०% आहे. अशावेळी वाहतूकीत अथवा लागवड करताना वाऱ्याने ती काडी वाकते आणि लागवड झाल्यावरसुद्धा पाऊस सततच आहे. अशा आवस्थेत रोपे कोलमडतात. 'कॉलररॉट' येतो.'कॉलररॉट' म्हणजे जमिनीलगत जेथे खोड टेकले आहे तेथे गळ पडते. कॉलर रॉट होऊन खोड तुटून पडते. जसे टोमॅटो, वांगी, मिरची, कोबीवर्गीय पिकांत घडते तसे. (संदर्भ : कृषी विज्ञान, फेब्रुवारी २०१२ मधील टोमॅटोच्या लेखातील पान नं. १२ -१३ वरील कॉलर रॉटचे कारण, लक्षणे व उपायांचा तक्ता पहावा.) तेव्हा प्रतिबंधात्मक व प्रभावी व उपाया म्हणून जर्मिनेटर, प्रिझम आणि कार्बेनडेझीमची आळवणी दर २ दिवसांनी रोपे ताठ होईपर्यंत करावी व सप्तामृताची फवारणी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी विज्ञान केंद्र वा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधून प्रत्यक्ष रोपाची अवस्था प्लॉटवर दाखवून फवारणी करावी.
                                
जून २०१३ मध्ये लावलेल्या शेवग्याची अधिक पावसाने पानझड झाली आहे. ज्याठिकाणी फांद्या आहेत त्या डोळ्याच्यावर पाव ते अर्धा इंच सोडून वरून कात्रीने कापायच्या आहेत. जमीन हलकी असेल तर झाडाच्या दक्षिणेकडील १ फूट शेंडा कृषी विज्ञान केंद्रामध्ये नेऊन त्याचा केस पेपर तयार करून तंत्रज्ञान सल्ल्यानुसार वापरावे. म्हणजे आता पाऊस उघडत असून छाटणी, खुरपणी, खत भरणे, आळवणी करणे सोपे जाईल. सामान्य प्रतिकुल परिस्थितीत जर्मिनेटरची आळवणी व कल्पतरू आणि १०:२६:२६ हे दोन्ही ५० - ५० ग्रॅम बांगडी पद्धतीने देणे आणि असामान्य प्रतिकूल परिस्थितीत जर्मिनेटर १ लि. सोबत प्रिझम अर्धा लिटरची आळवणी व सप्तामृताबरोबर हार्मोनी व स्प्लेंडरची फवारणी करावी. म्हणजे १ ते १।। महिन्यात नवीन फूट येऊन भाद्रपद महिन्यात उघडीप मिळाल्यावर वाफसा आल्यानंतर फूल निघेल. नंतर एक महिन्याने वरील डोस पुन्हा द्यावा व फवारणी दर १५ दिवसाला करावी. म्हणजे दिवाळीपर्यंत फुले येतील आणि जानेवारीपासून शेंगा चालू होतील. त्या थेट मार्च ते मे पर्यंत चालतील. याला नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या कराव्यात, म्हणजे जून महिन्यात या पिकाची झालेली झीज भरून निघेल. यामध्ये रब्बीत जवस, मोहरी, सोयाबीन यांचे आंतरपीक घ्यावे. याची निरीक्षणे, आलेले अनुभव फोटोसह कृषी विज्ञान केंद्राकडे पाठवावेत.
                                
मागील वर्षी ज्यांनी शेवग्याचे पीक घेतले त्यांची खोडे मनगट, दंडासारखी झाली आहेत. अति पावसाने त्याची पानझड झाली आहे. त्याच्या मुख्य १ ते २ फांद्या ठेवून करवतीने २ ते ३ फुटावरून सरळ छाटाव्यात. त्यावर जर्मिनेटरच्या द्रावणात शेणाचा गोळा करून लावावा. याला पाव ते अर्धा किलो कल्पतरू देऊन सप्तामृत दर १५ दिवसाला फवारावे. खत, पाणी, छाटणी, याचे नियोजन सांभाळले तर डिसेंबरपासून याला शेंगा येऊ लागतील. हा बहार जुनपर्यंत चालेल. मे - जून २०१४ मध्ये पावसाच्या अगोदर पुन्हा करंगळीच्या आकाराच्या फांद्या सिकेटरने कापायच्या आहेत. म्हणजे जुलै २०१४ मध्ये फुले लागून ऑक्टोबर २०१४ मध्ये पुन्हा शेंगा चालू होतील. अशा रितीने आपल्याला अतिवृष्टी व अनावृष्टी या अभूतपुर्व प्रतिकूल परिस्थितीत शेतीचे व्यवहारी नियोजन अनुभवता येईल.