प्रतिकुल परिस्थितीत ७८६ चे उत्पन्न दर्जेदार व भावही चांगला
                                श्री. विलास श्रीपतराव मंडलिक,
 आर. के. नगर, करवीर, जि. कोल्हापूर. 
मोबा. ९६५७२१५११६
                            
                            
                                ऑक्टोबर २०१० मध्ये आम्ही तैवान पपईची ४०० रोपे १० रू. प्रमाणे आणली आणि त्याची लागवड
                                ८' x ८' वर केली. जमीन खडकाळ असून पाणी बोअरचे देतो. लागवडीच्या वेळेस रोपांची मुळे
                                जर्मिनेटर २५० मिली + १५ लि. पाणी या प्रमाणातील द्रवारणात १० ते १५ मिनिटे बुडवून
                                नंतर लागवड केली. त्यानंतर ४ - ५ महिन्याची झाडे झाल्यानंतर फुलकळी लागली. तेव्हा डॉ.बावसकर
                                टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत औषधांची फवारणी केली. त्यावेळी ऐन उन्हाळा (मार्च महिना)
                                असूनही फुलकळीची गळ न होता फलधारणा चांगली झाली. नंतर १ महिन्याच्या अंतराने सप्तामृताच्या
                                २ फवारण्या केल्या, त्यामुळे
                                प्रत्येक झाडावर १०० च्या आसपास फळे लागली होती. ही पपई जून २०११ मध्ये चालू झाली.
                                फळाचे वजन १ ते १॥ किलोहून अधिक भरत होते. फळाला शाईनिंग असल्याने मार्केटमध्ये मागणी
                                भरपूर आहे. पी.एल. कंपनी पुणे यांच्या गाळ्यावर माल आणत होतो. तर ७ - ८ रुपये/किलो
                                भाव मिळत होता. जून - जुलै महिन्यात पाऊस झाल्याने झाडे निस्तेज दिसू लागली. लहान असणारी
                                फळे पोसण्यास अडचण निर्माण झाली. त्यानंतर मोरे यांच्या सांगण्यावरून थ्राईवर १ लि.,
                                क्रॉंपशाईनर १ लि., राईपनर १ लि., न्युट्राटोन १ लि., प्रोटेक्टंट अर्धा किलो,
                                प्रिझम ५०० मिली याप्रमाणे घेऊन त्याची २०० लि. पाण्यातून फवारणी केली त्यामुळे ८ दिवसात
                                बाग पुन्हा पुर्ववत होऊन फळे पोसण्यास सुरुवात, झाली, त्यामुळे आठवड्याला माल निघू
                                लागला.