'आले' न लागता आले

श्री. विलास जयवंत शिंदे (पैलवान), मु. पो. बोरगाव, ता. वाळवा, जि. सांगली.


१८ मे २००० रोजी वीस गुंठे क्षेत्रावर आले पिकाची लागण केली होती. बेणेप्रक्रियेसाठी जर्मिनेटर एक लिटर + प्रोटेक्टंट २०० ग्रॅम + १०० लिटर पाणी या प्रमाणात मिश्रण तयार करून त्यामध्ये बेणे भिजवून काढून लागण केली असता बेणे २० - २२ दिवसात १०० % उगवले. इतर वेळी ३५ ते ४० दिवस लागतात. जर्मिनेटरच्या बेणेप्रक्रियेमुळे रोपांची वाढ चालू झाली.

रोपांच्या जोमदार वाढीसाठी उगवणीनंतर पंधरा दिवसांनी जर्मिनेटर ५०० मीली + थ्राईवर ४०० मिली + क्रॉंपशाईनर ४०० मिली + १०० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घेतल्यामुळे रोपांची वाढ निरोगी व जोमदार होऊन, प्लॉटवर काळोखी आली.

उगवणीनंतर ३५ दिवसांनी जर्मिनेटर ५०० मिली + थ्राईवर ४०० मिली + १०० लिटर पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून ओलीवर हात पंपाने (नोझल काढून) आळवणी बुंध्यात सोडले. यामुळे पांढरी मुळीची वाढ चांगली होऊन एका रोपापासून १२ ते १५ फुटवे एकसारखे मिळाले.

यानंतर पुढीलप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या केल्या असता. प्लॉटवर शेवटपर्यंत काळोखी टिकून होती. शिवाय रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. आले लागण्याचा जो प्रादुर्भाव होतो तो या तंत्रज्ञानाने झाला नाही. रोपांची उंची दोन ते अडीच फुट होती.

पंचामृत फवारणी :

लागणीनंतर ६० दिवसांनी : जर्मिनेटर ४०० मिली + थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ४०० मिली + स्ट्रेप्टोसायक्लीन १२ ग्रॅम + १०० लिटर पाणी .

९० दिवसांनी : थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.

१२० दिवसांनी : थ्राईवर ४०० मिली + क्रॉंपशाईनर ४०० मिली + राईपनर ४०० मिली + १०० लिटर पाणी.
१५० दिवसांनी: थ्राईवर ४०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर ५०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.

१७५ दिवसांनी : थ्राईवर ५०० मिली + क्रॉंपशाईनर ५०० मिली + राईपनर ६०० मिली + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लिटर पाणी.

वरील फवारणीमध्ये इतर किटकनाशक बुरशीनाशकाचे प्रमाण अत्यल्प वापरले आहे. या भातात प्रथमच हे पीक करून उत्तम प्रत व अधिक उत्पादनाची हमी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे मिळून, ' आले' न लागता आल्यामुळे शेजारील शेतकरी कुतुहलाने या प्लॉटची चौकशी करीत आहेत.