आले उत्पादक शेतकऱ्यांच्या यशोगाथा

डॉ. मोहन शामसुंदर काळे, ७३ सोमवार पेठ, मु. कराड, जि. सातारा.
मोबा. ९८२३०८७२२३


१६ मे २००६ रोजी वाफे तयार करून आल्याचे बेणे जर्मिनेटरच्या द्रावणात भिजवून लावले. कल्पतरू खत वापरू शकलो नाही. शेणखत वापरले. लागवडीनंतर ३ आठवड्याच्या आतच उगवण झाली. त्याला रासायनिक खते काहीच वापरली नाही.

आल्याला दीड महिन्याने पहिली सप्तामृत औषधांची फवारणी केली. त्या फवारणीने सुरूवातीला पावसाने पानांवर जो करपा आला होता तो गेला. पाने पिवळी पडून वाळत होती, ती लगेच आटोक्यात आली. त्यानंतर १-१ महिन्याने आतापर्यंत ५ फवारण्या केल्या आहेत. जमीन मध्यम काळी असून पाणी स्प्रिन्क्लरने देतो. सध्या आले तयार झाले आहे. आल्याला दर फारच कमी असल्याने काढणी केली नाही आता त्याला नवीन फूट येऊ लागली आहे.

१-२ ठिकाणी आले काढून पाहिले असता हाताच्या पंजाएवढी फणी आहे. तसेच एरवी जी कुज जाणवते जी अजिबात नाही. याच आल्याच्या प्लॉटमध्ये कडेने बांधाच्या आत तैवान ७८६ पपईची लागवड केली आहे. पपईची ३५ -४० झाडे आहेत.

रोपे लागवडीच्या वेळी २-२ घमेली शेणखत दिले लागवडीनंतर १५ दिवसांच्या अंतराने पपईच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांच्या फवारण्या केल्या. मध्यंतरी पपई वर मोझॉंक आला होता. तेव्हा थ्राईवर, क्रॉंपशाईनर, न्युट्राटोनची फवारणी केली, त्याने मोझॉंक गेला. सध्या झाडावर २० -३० फळे लागली आहेत. ती फळे पोसण्यासाठी, टिकाऊपणा वाढण्यासाठी, रोग - कीड येऊ नये याकरिता थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर आणि न्युट्राटोनची फवारणी घेत आहे. पपईला पाणी पाटाने देत आहे.