कृषी विज्ञान मासिकाने आमचे अज्ञान दूर करून प्रगती व समृद्धीचा मार्ग दाखविते


कृषी मंत्रालयाच्या अर्थ सहाय्यातून कृषी अभ्यास दौऱ्यासाठी, युरोप, नेदरलँड, जर्मनी, स्पेन, फ्रान्स आणि स्वित्झरलँड या देशामधील कृषी हवामान, फळबाग, फुलबाग, पवनऊर्जा सौरऊर्जा बाबत उच्च तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे २५ वर्षापासून अभ्यास व अवलंब करणारे प्रयोगशील शेतकरी आणि प्रगतीशील बागायतदार श्री. रामचंद्र जगन्नाथ साबळे यांची खेड (राजगुरुनगर जि. पुणे. ) तालुक्यातून संशोधन शेतकरी म्हणून निवड झाली. त्याबाबत 'कृषी विज्ञान' परिवारातर्फे त्यांचे अभिनंदर.

कृषीमित्र श्री. साबळे यांनी त्यांच्या शेतावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून उत्पादन वाढविले आहे. ते चायनिज भाजीपाला उत्पादनाचे अभ्यासक असून उत्पादक आहेत. त्यांच्याकडे भाजीपाल्याची, सामाजिक वनीकरणाची रोपवाटिका असून त्यांचा सुगंधी चंदनाबाबत सखोल अभ्यास आहे. त्याच्यांकडे औषधी, सुगंधी वनस्पतींचा संग्रह आहे. त्यांची शेती पाहण्यास महारष्ट्राबरोबरच गुजरात, आंध्र, गोवा येथून शेतकरी येतात. आठवड्यातून दर रविवारी ते अनेक शेतकऱ्यांना विनामुल्य मार्गदर्शन करतात. त्यांनी सामाजिक कार्य म्हणून आई - वडिलांच्या स्मरणार्थ सुभाषचंद्र बोस उच्च माद्यमिक विद्यालय बहुळ येथे विद्यार्थ्यांसाठी कृषी विज्ञान मंचाची स्थापना केलेली आहे. त्यांनी त्यांच्या घरी १९७२ साली शेतकरी ग्रंथालय स्थापन केले आहे.