प्रतिकुल परिस्थितीत खरबूज, उसातील कांदा पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दिली समृद्धी दरवर्षा परदेश प्रवास, सर्व सुखे व आत्मीक समाधान

श्री. प्रकाश ज्ञानोबा कोद्रे मु. पो. वाडेबोल्हाई, ता. हवेली, जि. पुणे.
मोबा. ९८२२२१२८०३


आम्ही १८ जानेवारी २०१२ ला कुंदन खरबुज दीड एकरमध्ये लावले आहे. बेड करून त्यावर ४ मायक्रॉन मल्चिंग पेपरचे अच्छादन केले आहे. दोन ओळीत ७ फूट आणि दोन रोपातील अंतर १.५ फुट ठेवले आहे. याच्या बियाणाला लागवडीवेळी जर्मिनेटर वापरू शकलो नाही. मात्र उगवणीनंतर जर्मिनेटरचे ड्रेंचिंग रोपे आठवड्याची असताना केले. त्यामुळे रोपांना पाने फुटून ती मोठी होऊ लागली. नंतर आठवड्यानी साप्तामृत औषधांची फवारणी केली, तर लगेच दोन दिवसात वेल १ फुट वाढल्याचे जाणवले.

धुक्यातही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे फवारणीने दुसरे दिवशी वेल टराटरा वाढून आतील रिकामी जागा पुर्णपणे झाकून गेली

त्यानंतर हवामान खुपच खराब झाले. थंडीने प्रमाण अचानक वाढले. धुकेही काही प्रमाणात होते. म्हणून आठवड्याच्या अंतराने पुन्हा दुसरी फवारणी केली. फवारणी करतेवेळी दोन ओळीतील वेलीमध्ये अंतर दीड फुटाचे होते. तर फवारणीनंतर दुसऱ्या दिवशी आमचा गडी (शेतमजूर) आणि मी खरबुजाच्या वेलांची पाहणी करण्यास शेतात गेलो तर गडी आश्चर्यचकित होऊन म्हणाला. "मालक हे काय झाले!" एका दिवसात वेळ टराटरा वाढून दोन ओळीतील दीड ते दोन फुटाचे अंतर पुर्णपणे वेलांनी झाकून गेले होते.

याच काळात हवामान खुपच खराब असल्याने गावातील सर्वांचे खरबुज गेले. बुंध्यालगत गळ पडली आहे. पानांना, खोडाला करपा झाला आहे. फळांना क्रॅक गेले आहेत. माझ्या शिवारामधील तसेच तळेगाव, पारगाव येथील लोक माझा खराबुजाचा प्लॉट पाहण्यास येत आहेत. माझ्या शेताच्या शेजारच्याच शेतकऱ्याच्या प्लॉटची खराब हवामानामुळे वरील दुरवस्ता झाली आहे. त्याने आपल्या प्लॉटला काय वापरले असे विचारून आम्हाला पण डॉ.बावसकर तंत्रज्ञान आणून द्या असे सांगितले. म्हणून त्याच्या प्लॉटमधील खरबुजाचा वेल उपटून सरांना दाखविण्या साठी आज (२१ फेब्रुवारी २०१२) आणला आहे. सरांनी वेलाची पाहणी करून हा देखील प्लॉट दुरुस्त होईल असे सांगून जर्मिनेटर, थ्राईवर प्रत्येकी ४० मिली, क्रॉपशाईनर ५० ते ६० मिली, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी ३० मिली, प्रोटेक्टंट २ काडेपेटी आणि हार्मोनी २५ मिलि हे १५ लि. च्या पपांचे प्रमाण देऊन त्याप्रमाणे प्रत्येकी सत्पामृत १ लि. आणि हार्मोनी २५० मिली घेऊन जात आहे.

आम्ही हे तंत्राज्ञान गेली १० -१२ वर्षापासून कांदा, कोबीला वापरतो. रिझल्ट आम्हाला १ नंबर मिळतो. त्यामुळे या तंत्रज्ञानावर आमची पुर्ण श्रद्धा आहे. आम्ही उसामध्ये कांद्याचे आंतरपीक २ ते ४ एकरमध्ये दरवर्षी घेतो. कांद्याचे बाजारभाव पडो अथवा वाढो, आम्ही दरवर्षी गरवा कांदा लावतोच. जेव्हापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतोय तेव्हापासून चिंगळी कधी निघतच नाही. किलोमध्ये ५ - ६ कांदे बसतात. आमच्या भागातील कांदा एक्सपोर्ट दर्जाचा असून पुण्यातील व्यापारी आमच्या भागात वखारी टाकून आहेत. एकरी २२५ पिशवी उत्पादन आम्हाला उसातील कांद्याचे मिळते.

उसाला सारी काढून प्रथम कांद्याची लागवड सरीच्या दोन्ही बाजूस करतो आणि त्यानंतर १५ ते २० दिवसांनी उसाची लागण करतो.

केळीच्या (ग्रॅण्डनैन) तिसऱ्या पिकाला (खोडावा काढल्यानंतरच्या) आता डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरायचे आहे. झाडे ३ ते ३॥ फुटाची झाली आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक झाडास ५०० ग्रॅम कल्पतरू खत देऊन जर्मिनेटर १ लि. चे १०० लि. पाण्यातून एकरी ड्रेंचिंग करणार आहे. त्यानंतर केळी डोक्याएवढी झाल्यावर कमळ निघण्यपुर्वी थ्राईवर ५०० मिली आणि क्रॉंपशाईनर १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी करणार आहे. नंतर कमळ बाहेर पडल्यावर थ्राईवर १ लि. क्रॉंपशाईनर १॥ लि., राईपनर ५०० मिली आणि न्युट्राटोन ५०० मिलीची २०० लि. पाण्यातून फवारणी करणार आहे. त्यानंतर तिसरी फवारणी केळीच्या कण्या बाहेर आल्यावर थ्राईवर १ लि., क्रॉंपशाईनर १।। लि., राईपनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी करणार आहे. आम्हाला २० - २२ किलोचा उतारा मिळतो. तर या तंत्रज्ञानाने २५ ते ३० किलोचा घड निघेल अशी अपेक्षा आहे.

३ महिन्यापुर्वी याचा खोडवा तुटून गेला आहे, ठिबक केले आहे, मायक्रोट्यूब आहे. रोज ४ तास पाणी देतो. आमच्याकडे दिवसातून १२ तास लाईट जाते. एकूण १४ एकर क्षेत्राला ड्रीप (नेटाफेम) केली आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने शेतीन नवीन प्रकल्प उभे करायचेत !

आमचे आजोबा पुणे कपोरेशनला स्टँडींग कमिटीचे चेअरमन होते. त्यांना दुरदृष्टी होती. पुण्यात शेतीसाठी जमीन राहणार नाही. म्हणून पुण्यापासून २२ किमी अंतरावर १९७६ - ७७ साली त्यांनी ३ लाखात ७५ एकर जमीन वाडेबोल्हाईत घेतली. मुंढव्यात २५ एकर जमीन आहे. आम्ही जमीन विकली नाही. माझी सासरवाडी बोराटेंची (खडकमाळ आळी) पुण्यातीलच आहे. २ मुले व ४ नातू आहे. माझे शिक्षण १० वी पर्यंत झाले असून मी आणि मुलेदेखील शेतीच करतो. मुंढव्यातील शेती मुलांसाठी आणि वाडेबोल्हाईची शेती नातुंसाठी ठेवली आहे. आमची कोठे कंपनी टाकायची अपेक्षा नाही, वा औद्योगिक प्रकल्प राबविण्याची इच्छा नाही. शेतीतच डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने नवीन - नवीन मोठे प्रकल्प कसे करता येतील हे पाहायचे आहे. कारण शेती हीच आमची मायमाऊली आहे.

माझा जन्म ३ जून १९४९ चा असून सध्या ६३ वय चालू आहे. आतापर्यंत मी बँकॉक, थायलंड, सिंगापूरला जाऊन आलो आहे. तेथील शेती पाहून त्यातील आपल्याकडे नवीन - नवीन प्रयोग राबवत असतो. आपणही जग पाहिले पाहिजे म्हणून मी दरवर्षी १५ दिवस परदेशी प्रवास करायचे ठरविले आहे. इस्त्राईलला जाऊन तेथील तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा देखील अवलंब सरांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या शेतात करणार आहे.