तुतीची लागवड फायदेशीर

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


आपल्या देशात रेशीम उद्योग व तुती लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. देशात १७,००० मे टनांपेक्षा जास्त रेशीम धाग्याची निर्मिती होते व ६० हजाराहून अधिक खेड्यात हा उद्योग राबविला जातो. महाराष्ट्रातही हा उद्योग अधिक फायदेशीर ठरत आहे. आज विदर्भातही मोठ्या प्रमाणात तुती लागवड क्षेत्र वाढले आहे. रोजगाराची प्रचंड क्षमता असणाऱ्या या उद्योगाचे ग्रामीण विकासात मोठे योगदान आहे. यशस्वी रेशीम उद्योगासाठी तुतीची लागवड शास्त्रीय दृष्टिकोनातून होणे गरजेचे आहे.

यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांना तुती लागवड, कीटक संगोपन व धागा निर्मितीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होतो. इतर अनेक नगदी पिकांच्या तुलनेत तो अधिक फायदेशीर आहे. या उद्योगामुळे शहरी संपत्ती सहजपणे ग्रामीण कारागिरांकडे वळली जाते व दिवसेंदिवस आपल्या देशाला मिळणाऱ्या परकीय चलनात वाढ होत आहे. उच्च प्रतीच्या रेशमास जागतिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेता, दुबार (बायव्होल्टाईन) जातीच्या कोष उत्पादनाकडे वळणे अत्यंत गरजेचे झाले आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा/तंत्राचा वापर करून तुतीची लागवड करणे फायदेशीर ठरेल. तुती रेशीम उद्योगाचा यश हे सर्वस्वी तुतीच्या एकरी उत्पादित होणाऱ्या पानांवर अवलंबून आहे. रेशीम उदोगाच्या यशस्वी उत्पन्नाच्या ३८.२ टक्के भाग सकस तुती पानांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे.

रेशीम उद्योग' या जोड व्यवसायाचे मूळ तूती लागवडीत दडले आहे हे सर्वश्रृतच आहे. घरच्या गृहिणीलाच नव्हे तर आजी - आजोबा आणि नातवंडांनाही फावल्या वेळात घरच्या घरी रोजगाराची संधी यातून मिळू शकते. शिवाय महिन्याकाठी हमखास उत्पन्न आहेच. परंतु त्यासाठी तंत्रशुद्ध माहिती शेतकऱ्यांना असणे गरजेचे आहे.

हवामान : राज्याचे कृषी विषयक हवामान तुतीच्या वाढीसाठी वर्षभर पानांच्या निर्मितीसाठी पोषक आहे. तुती लागवडीसाठी ७५० ते १००० मि. मी. पाऊस वर्षाभर समप्रमाणात पडत असल्यास तुती वाढीसाठी चांगले वातावरण मिळते. तुती हे वर्षभर पाला देणारे पीक असल्यामुळे लागवड करताना योग्य ती खबरदारी घेणे क्रमप्राप्त ठरते.

तुती लागवड करताना खालील मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.

१) तुती लागवड वाहनांची वाहतुक जेथे जास्त आहे अशा रस्त्याकडेच्या जमिनीमध्ये करू नये. पानावर धुळ मोठ्या प्रमाणात बसल्यास अशी पाने संगोपनासाठी कीटकांना देणे योग्य ठरत नाही.

२) कीटकनाशकांचा वापर ज्या पिकावर वारंवार करावा लागणार आहे. अशा पिकांच्या जवळ तुती लागवड करू नये, त्यामध्ये किमान १०० मीटर अंतर ठेवावे.

जमिनीची निवड : हलकी, मध्यम, भारी अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये तुतीची लागवड करता येते. मात्र सपाट व पाण्याचा निचरा होणारी जमीन लागवडीखाली योग्य ठरते. तुतीच्या झाडाची मुळे खोलवर जात असल्यामुळे ६० सें. मी. खोल माती असणारी भारी जमीन व जमिनीचा सामू (आम्ल - विम्ल निर्देशांक) ६.५ ते ७ च्या दरम्यान असावा. केंद्रीय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संध, म्हैसूर येथील व्यापक संशोधनाच्या आधारे अनेक प्रकारच्या जमिनीमध्ये व्यापक प्रमाणात तुती लागवड करणे शक्य झाले आहे.

पुर्व मशागत : उन्हाळ्यात जमीन ३० ते ३५ सें.मी. खोलवर नांगरावी. नांगरणीनंतर जमीन तशीच १५ -२० दिवस तापू द्यावी व नंतर ढेकळे फोडून जमीन समपातळीत करून घ्यावी. आडवी व उभी नांगरणी आणि वखरणी करून चांगले मुरलेले शेणखत ८ -१० टन आणि कल्पतरू सेंद्रिय खत १०० ते १५० किलो प्रति सर्व जमिनीत सारख्या प्रमाणात पसरून द्यावे.

वाणांची निवड : तुती झाडाचे वर्गीकरण मोरासिए या कुटुंबात मोडते. तुतीच्या अनेक जाती देशात उपलब्ध आहेत. तथापि योग्य वाणाची लागवड व रेशीम अळ्यांसाठी पोषक पाला उपलब्ध होणे हे गुणधर्म महत्त्वाचे ठरतात. रेशीम उद्योगातील ५५ - ६० टक्के खर्च तुतीच्या पानांच्या उत्पादनावर होत असल्याने लागवडीसाठी योग्य वाणाची निवड खूपच महत्त्वाची आहे. एकरी जास्तीत जास्त पानांचे उत्पादन व इतर पोषक गुणधर्म असलेला वाण निवडल्यास, रेशीम उद्योग आर्थिकदृष्ट्या अधिक फायद्याचा ठरतो. आज राज्यात व देशात कन्वा - २ किंवा एम - ५ या जातींच्या मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी उपयोग केला जातो. या जातीची वाढ चांगली असून आंतरशागत, हवामान व जमीन इत्यादी बाबींना चांगला प्रतिसाद देते. एकरी पानाचे उत्पादन १० -१२ हजार कि. ग्रॅ. पर्यंत मिळले. इतर बागायती जातीपैकी एस - ३०, एस- ३६, एस - ५४ या जातीही तुती लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर असून पानांचे उत्पादनही भरपूर मिळते. काही जिराईत जाती उदा. एस - १३, एस- ३४ ह्या एकरी ५ - ६ हजार किलो पाल्याचे उत्पादन देतात.

तुतीचे सुधारित वाण : व्ही - १, एस- ३६, एस- ५४ हे सुधारित वाण आहेत. अलिकडेच केंद्रीय रेशीम मंडळ, म्हैसूर येथे व्ही - १ ही सुधारित जात विकसित करण्यात आली असून, सदन जातीचे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात लागवडीसाठी बेणे उपलब्ध करून देण्याचे धोरण रेशीम संचालनालयाने सुरू ठेवले आहे. या जातीचे एकरी पानाचे उत्पादन २० - २५ हजार किलोपर्यंत येऊ शकते. ही जात लागवडीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. तथापि खताची वाढीव मात्रा व जमीन चांगल्या दर्जाची असल्यासच या जातीचा फायदा दिसून येतो. तुती पानांचे उत्पादन जेवढे जास्त तेवढ्या प्रमाणत जास्त कीटक संगोपन करून जास्तीत जास्त कोष निर्मिती या वाणांपासून करता येते.

चॉकी कीटक संगोपनासाठी तुती लागवड : चॉकी अवस्थेतील कीटक संगोपन १ ० -१२ दिवसांच्या अळ्यांसाठी एस- ३० व एस -३६ जाती अत्यंत पोषक आहेत. ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रेशीम उद्योग आहे, अशा शेतकऱ्यांनी चॉकी कीटक संगोपनासाठी किमान अर्धा एकरमध्ये वरील जातींच्या तुतीची लागवड करावी व चॉकी कीटकासाठी पानांचा वापर करावा.

लागवड पद्धत : पावसाळ्यात माहे जून ते ऑगस्टपर्यंत तुतीची लागवड अनेक पद्धतीने करण्यात येते. ३ x ३ फूट झाडामधील व ओळीमधील अंतर ठेवले जाते. जमीन मध्यम प्रतीची असल्यास ३ x २ फूट तर हलक्या जमिनीमध्ये २ x २ फूट पद्धतीने लागवड योग्य होते. देशातील विविध राज्यात व भागात वेगवेगळ्या लागवड पद्धती वापरल्या जातात. कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यात ९ इंच किंवा १ x १.५ फूट पद्धतीने लागवड केली जाते.

सुधारित तुती लागवड पद्धत : महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या ५ - ७ वर्षापासून औरंगाबाद पॅटर्नचा वापर करून जोड - ओळ पद्धतीने तुती लागवड करतात. रेशीम संचालनालयाचे सहसंचालक श्री. एन. जी. कामडी यांनी त्यांचे चीन येथील प्रशिक्षणात जोड ओळ पद्धत व फांदी पद्धत अत्यंत उपयोगी असल्याचे पाहिले होते. राज्यात डॉं. ए. डी. जाधव यांनी या तंत्रज्ञानाचा शेतकरी स्तरावर प्रथम अवलंब औरंगाबाद जिल्ह्यात सन १९९६ मध्ये केला. आज महारष्ट्रात ही पद्धत मोठ्या प्रमाणात अवलंबली जात असल्याने रेशीम उद्योगाला नवीन दिशा मिळाली आहे. या पद्धतीमध्ये १ x २ x ६ फूट किंवा १ x २ x ५ फूट अंतराचा लागवडीसाठी वापर केला जातो. दोन ओळीमध्ये २ फूट तर दोन झाडांमध्ये १ फूट तसेच ५ फूट किंवा ६ फुटांचा पट्टा मध्ये मोकळा सोडला जातो. या पद्धतीमध्ये झाडांची संख्या १०,००० ते १०,८०० प्रती एकरी बनते. फांदी पद्धतीने कीटक संगोपन आज प्राधान्याने केले जात असल्याने कमीतकमी जागेत जास्त फांद्या तयार करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे. शिवाय लागवडीमध्ये हवा खेळती राहते व सूर्यप्रकाशही चांगला मिळतो व. आंतरमशागत सहज करता येते. तसेच पानायची आवश्यकता कमी भासते. आंतरपिके घेणेही या पद्धतीमध्ये सहज शक्य होते. या पद्धतीचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे.यामुळे पानांचे उत्पादन व कोष निर्मितीमध्ये मोठी वाढ झालेली आहे.

तुती बेणे तयार करणे : शेतकऱ्यांना रेशीम संचालनालयाकडून २०० रुपयांमध्ये १ एकरसाठी तुती बेणे उपलब्ध करून दिले जाते. बेण्याची वाहतूक शेतकऱ्यांनी स्वत: करावयाची असते. व्ही - १ व इतर सुधारित जातींचे बेणे जास्तीचे पैसे देऊन उपलब्ध करता येऊ शकते. ६ ते ८ महिने वयाच्या तुती झाडांच्या १० ते १२ मि. मी. जाडीच्या फांद्या निवडाव्यात व ३ ते ४ डोळे असलेले ६ इंचाचे तुकडे धारदार हत्याराने करावेत. कलमांची साल खराब होणार नाही, याची दक्षता घ्यावी. हिरव्या व कोवळ्या फांद्या लागवडीसाठी वापरू नयेत.

तुती बेण्यासाठी प्रक्रिया : तुतीची बाग सतत १५ - २० वर्षापर्यंत भरपूर पानांचे उत्पादन देते. त्यामुळे प्रथम वर्षी लागवड शास्त्रीय पद्धतीने करण्यावरच रेशीम उद्योगाचे यश अवलंबून राहते. त्यामुळे लागवडीपूर्वी बेण्यावर प्रक्रिया करणेच योग्य ठरते. बुरशीपासून बचाव करण्यासाठी १ टक्का बावीस्टिन/ कॅप्टॉंन द्रावणामध्ये तुतीचे बेणे / तुडके ४ - ५ तास बुडवून ठेवावेत : मुळे फुटण्याची प्रक्रिया लवकर होण्यासाठी १० लि. पाण्यामध्ये १०० मिली जर्मिनेटर घेऊन बेणे (कांड्या) १० ते १५ मिनिटे बुडवून घ्यावे. तुती लागवड करताना निवडलेल्या कांड्या, बेणे जमिनीमध्ये ५ इंचापर्यंत जाईल असे पाहावे व नंतर चोहोबाजूने माती दाबून घ्यावी.

आंतरमशागत : तुतीची लागवड केल्यानंतर १ ते १.५ महिन्यांनी खुरपणी २ ते २.५ महिन्यांनी करावी व त्यानंतर आंतरमशागतीचे काम प्रत्येक पानांच्या तोडणीनंतर करावे. यामुळे तुतीच बाग भरपूर पानांचे उत्पादन देऊ शकते.

पाणी व्यवस्थापन : लागवड प्रामुख्याने पावसाळ्याच्या हंगामात केली जात असल्याने जून ते नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पावसाचा फायदा पावसाळ्यातील लागवडीस मिळतो. तथापि लागवड झाल्यानंतर पाऊस कमी झाल्यास किंवा १० - २३ दिवसांनी उघडीप झाल्यास झाडांना ७ - ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. इतर दिवसात जमिनीच्या प्रतीनुसार ८ - १२ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या नियमित द्याव्यात.

खतांची मात्रा : दर्जेदार व भरपूर पानांच्या निर्मितीसाठी लागवडीसाठी पहिल्या वर्षी ४० :२० :२० किलो नत्र, स्फुरद व पालाश खताची एकरी मात्रा दोन टप्प्यात द्यावी. पहिला हप्ता लागवड झाल्यानंतर २ ते २.५ महिन्यांनी मिश्र खतांची मात्रा २०:२०:२० किलो ग्रॅम रिंग पद्धतीने द्यावी. दुसऱ्या वर्षापासून पुढे एकरी १२०:४८:४८ किलो खतांची (न:स्फु:पा) मात्रा पाच हप्त्यात द्यावी व ८ - १० टन शेणखत शेतात दरवर्षी वापरावे. जमिनीचे माती परीक्षण जरूर करावे. माती परीक्षण व तुती वाणांच्या आवश्यकतेनुसार खतांची मात्रा कमी - जास्त करावी. गांडूळ खते, हिरवळीची खते तसेच जैविक खातांचाही (अॅझेटोबॅक्टर, ट्रायकोनटेनॉल व मायकोरायझा इत्यादींचा) वापर जरूर करावा.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कल्पतरू सेंद्रिय खताची मात्रा पहिल्या वर्षी एकरी ५० ते ७५ किलो आणि नंतर दरवर्षी १०० ते १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत तीन हप्त्यात देऊन खालीलप्रमाणे औषधांची फवारणी केल्यास तुतीच्या पानांच्या प्रतिमध्ये सुधारणा होण्यास व एकूणच कोष उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी मोठा फायदा होत असल्याचे कर्नाटक भागातील श्री. विद्याधर कुलकर्णी यांनी तसेच या तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या त्यांच्या मित्रांनी फळविले आहे.

तुतीच्या अधिक उत्पादन व दर्जासाठी फवारणी :

१) पहिली फवारणी : कड्या फुटल्यानंतर १० ते १२ दिवसांनी : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रोटेक्टंट १०० ग्रॅम + प्रिझम १५० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : कड्या फुटल्यानंतर १८ ते २१ दिवसांनी: जर्मिनेटर ३५० मिली.+ थ्राईवर ३५० मिली. + क्रॉंपशाईनर ४०० मिली.+ राईपनर १०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली.+ १०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : कड्या फुटल्यानंतर ३० ते ४० दिवसांनी : जर्मिनेटर ५०० मिली. + थ्राईवर ५०० मिली.+ क्रॉंपशाईनर ५०० मिली. + राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ३०० मिली. + न्युट्राटोन ५०० मिली. + १०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : कड्या फुटल्यानंतर ५० ते ५५ दिवसांनी : थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ३५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली.+ न्युट्राटोन ५०० मिली. + १५० लि.पाणी.

अधिक माहितीसाठी खालील संदर्भ पहावेत-
रेशीम कापड निर्मितीत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ब्रेक थ्रु (Break Through ) शक्य


श्री. निळकंठ राजाराम भोंगळे, मु. पो. माळीनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर

(संदर्भ : कृषी विज्ञान, नोव्हेंबर २००१, पान नं.२३)