खराब हवामानातही झेंडुची शायनिंग पाहून लोक व दलाल चकीत होतात.

श्री बाळासाहेब तुळशीराम गाढवे, मु.पो. आर्वी, ता. जुन्नर, जि.पुणे. मोबा.९८६०९५६०८०

मी गेली दोन वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. ऊस, गहू, फरशी, धना, झेंडू, मिरची इ. पिकासाठी ही टेक्नॉंलॉजी वापरतो. इतर शेतकऱ्याच्या तुलनेत मला चांगले उत्पन्न मिळाले.

मी १ नोव्हेंबर २०११ ला गुलछडीमध्ये एक एकर क्षेत्रामध्ये टॉंल ऑरेज ही झेंडूची जात ३ फुटावर लावली. सुरवातीला लागवडीला कल्पतरू आणि २४:२४:०० खताच्या दोन - दोन बॅगा लावल्या. लागवडीनंतर आठ दिवसांनी जर्मिनेटर चे ड्रेंचिंग केले. चार दिवसांनी फवारणीमध्ये जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ५० मिली वापरले. त्यामुळे वाढ व फुटवे भरपूर प्रमाणात निघाले. दर पंधरा ते वीस दिवसांनी फवारणी केली.

थंडीतही १ एकर गुलछडीतील झेंडुचे १ लाख १० हजार

कळी लागल्यानंतर थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपाणार ५० मिली फवारले असता कडाक्याच्या थंडीतसुद्धा मला एक एकर क्षेत्रातील गुलछडीतील आंतरपीक झेंडूपासून १ लाख १० हजार रू. झाले असून अजून झेंडू सुरू आहे. ह्या टेक्नॉंलॉजीने खराब हवामानात सुद्धा चांगले उत्पन्न निघते हे दाखवून दिले. माझा प्लॉट बघायला पंचक्रोशीतील लोकयेतात. ह्या कडाक्याच्या थंडीत केळी, वालवड, झेंडू व इतर पिकांचे खूप नुकसान झाले. परंतु माझे पैसे झाले. व्यापारीसुद्धा झेंडूची शायनिंग पाहून चकीत होतो. दोन महिन्यानंतर सुद्धा प्लॉटला शायनिंग कायम आहे. सर्व पिकांना ह्या टेक्नॉंलॉजीशिवाय मी काहीही वापरत नाही. खरोखरच रिझल्ट उत्तम मिळतात आणि पैसे होतात.

Related New Articles
more...