उसात मर झालेल्या प्लॉटमध्ये मिरची, झेंडू व भुईमुगाच्या आंतरपिकाचा फायदाच फायदा उसाचेही चांगले उत्पादन

श्री. निवृत्ती दादासाहेब पाटील, मु.पो.खुपीरे, ता. करवीर, जि . कोल्हापूर.
फोन.नं.(०२३१) २४२०७२२ मोबा. ९९७०३७८७५७


मी दरवषी ऊस पीक घेत असतो. मात्र ताळमेळ जमत नसल्याने इतर भाजीपाला पिके, भुईमूग यांची लागवड करण्याचे ठरविले. कारण २५ गुंठ्यामध्ये ऊस लावला होता. मात्र उसाची उगवण कमी व उगवणीनंतर मर झाल्याने तुटाळ पडली होती. (उसाला लागवडीच्यावेळी जर्मिनेटर वापरले नव्हते) उसाचे उत्पादन घटणार म्हणून या २५ गुंठे उसामध्ये आंतरपिके म्हणून १५ गुंठ्यात मिरची तर ६ गुंठ्यात झेंडूची लागवड ऑगस्टमध्ये केली. रोपे नर्सरीमधून आणली होती. जर्मिनेटरचे द्रावण तयार करून त्यामध्ये रोपे बुडवून लागवड केली. जर्मिनेटरच्या प्रक्रियेमुळे रोपे एक तासात सरळ ताठर झाली. नंतर जर्मिनेटर ५०० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणात द्रावण तयार करून रोपांना आळवणी (ड्रेंचिंग) केले. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ जोमाने झाली. त्यानंतर आठवड्याच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या फवारण्या केल्या. २ फवारण्यात रोपांची वाढ, फूट जबरदस्त होऊन प्लॉटला काळोखी आली. नंतर पुन्हा २ फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने केल्या. त्याने झेंडू, मिरची, उसाची वाढ होऊन झेंडूचा पहिला तोडा बरोबर दसऱ्याला मिळाला. हा झेंडू दसरा, दिवाळीत आल्याने तसेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने फुलांचा दर्जा उत्तम प्रतिचा मिळाल्याने बाजारभाव चांगले मिळाले. सहा गुंठ्यातील आंतरपीक मिरचीची वाळलेली मोठी ६ पोती उतारा मिळाला. २५ गुंठ्यातील उसाचा २७ टन उतारा मिळाला. या तिन्ही पिकांना एकूण सर्व फवारण्यांचा खर्च ६ ते ७ हजार रू. आला. या उसामध्ये भुईमूगही लावला होता. या सर्व पिकांना एकाचवेळी फवारण्या करत होतो. भुईमूगाचा वाळवून १२ पोती उतारा मिळाला. ही सर्व पिके एकत्र घेतल्याने गावातील लोक प्लॉट पाहण्यास येऊन आश्चर्यचकीत होत.