संशोधनाची वाटचाल - ३ एकर ७८६ पपई पासून निव्वळ नफा ५ लाख

श्री. रविंद्र आत्माराम पाटील,
मु. पो. बाभुळदे, ता. शिरपूर, जि. घुळे


आम्ही मार्च २०१० मध्ये तैवान पपईची हलक्या जमिनीत ६' x ७' वर ३ एकरमध्ये लागवड केली होती. रोपे मोहोळ जि. सोलापूर येथील नर्सरीमधून घरपोहोच ७ रू. प्रमाणे ३ हजार रोपे आणली होती. आमच्या गावातीलच माझे मित्र डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत होते. त्यांच्या सांगण्या वरून मी सुरूवातीपासून या प्लॉटला हे तंत्रज्ञान वापरू लागलो.

प्रथम रोपे लावतेवेळी शेणखत व कल्पतरू सेंद्रिय खत १०० ग्रॅम मिसळून खड्डे भरून घेतले, नंतर जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे प्लॅस्टिक पिशवीसह बुडवून बाजूला ठेवत व लावताना पिशवीतील मातीत मुरल्यावर रोपाची पिशवी फाडून नंतर रोप लावत. त्याच्यामुळे मर झाली नाही व रोपांची वाढ सुरू झाली. नंतर २० - २५ दिवसांनी सप्तामृताची फवारणी सुरूवातीपासून ते ६ - ७ व्या महिन्यापर्यंत करू लागलो. ज्या - ज्या वेळी हवामान खराब झाल्यावर पाने पिवळी पडायची किंवा शेंडा आकसायचा, पानगळ व्हायची त्या - त्या वेळी डॉ.बावसकर सरांना फोन करून त्यांच्या सल्ल्यानुसार सप्तामृताचे प्रमाण घेऊन औषधे शिरपूर येथून घेऊन फवारण्या करत होतो. सप्तामृताशिवाय इतर रासायनिक औषधे कोणतीच वापरली नाही.

झाडांवर ६० ते ७० फळे होती. त्यांची काढणी ९ व्या महिन्यापासून सुरू झाली.शिरपूर, इंदोरचे व्यापारी बागेतून स्वत: फळांची काढणी करून माल खरेदी करीत. २॥ रुपयापासून ४ रू. पर्यंत भाव देतात. भाव अगोदर ठरविला तर सरसकट ३ ते ३॥ रू. देतात आणि भाव नाही ठरवला तर सुरूवातील्स माल मिळण्यासाठी ७ - ८ रू. ने भाव देतात. मात्र सुरुवातीचे थोडे तोडे झाल्यानंतर जसजसा माल १० - १५ टन असा वाढू लागतो तेव्हा २ रू. पासून सुरुवात करतात. अशावेळी २ ते ३ रू. च भाव देतात. अशी पपईची साधारण मार्केट परिस्थिती आहे. तोडे चालू झाल्यावर ३ महिने तोडे चालतात. एका पिकापासून साधारणपणे ६० टन उत्पादन मिळाले. त्याचे सरासरी ३ - ३॥ रू. भावाप्रमाणे एकरी २ लाख असे ३ एकरातून ६ लाख रू. मिळाले. याला एकरी एकूण (रोपे,ड्रीप,खते,औषधे,मजुरीसह) ३० हजार रू. खर्च आला. म्हणजे ३ एकरातून खर्च वजा जाता ५ लाख निव्वळ नफा मिळाला.

वाया गेलेल्या प्लॉटमधून ३ एकराचे ३ लाख या अनुभवावरूनच पुन्हा पुढील वर्षी मार्च २०११ मध्ये पुन्हा ३ एकर पपई वरील प्रमाणेच लावली. डॉ. बावसकर तंत्रज्ञान माझ्या अनुभवानुसार वापरात होतो. मात्र प्लॉट ४ - ५ महिन्याचा असताना खराब हवामानामुळे अचानक पानगळ झाली. झाडाचा फक्त दांडाच उभा होता. त्यावर ३० - ३५ फळे होती. पानगळ झाल्याने फळांचे पोषण होईना. तसेच नवीन फुलकळी लागणेही थांबले. यावरून प्लॉट पाहणारे शेतकरी म्हणू लागले. प्लॉट गेला. आता काही येणार नाही.

अशा परिस्थितीत सरांना फोन केला. सरांच्या सल्ल्यानुसार सप्तामृतचे प्रमाण घेऊन फवारणी केली. तर आठवड्यात नवीन फूट दिसू लागली. महिन्याभरात पुर्ण पाने आली. ज्यांनी ज्यांनी १ महिन्यापूर्वी प्लॉट पहिला होता, त्यांना नंतर झालेली फुट पाहून आश्चर्य वाटे की हा चमत्कार कसा झाला !

पुर्णपणे वाया गेलेल्या प्लॉटपासून उत्पादन मिळाले. या प्लोटपासून ३ एकरातून ३ लाख रू. मिळाले याला देखील १ लाख रू. एकूण खर्च आल होता तर खर्च वजा जात २ लाख रू. नफा ३ एकरात मिळाला. अन्यथा प्लॉट फेल गेला असता तर १ रू. चेही उत्पदान न मिळता १ लाख रू. खर्च वाया गेला असता. त्यामुळे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मी पुर्णपणे खूष असून समाधानी आहे.

उसाचे २० ते २५ टन उत्पन्न मिळते आम्हाला मात्र एकरी ५०, २॥ एकरात १२५ टन

पपईबरोबर उसावर या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. आमच्या भागातील जमीन गेली २० वर्षापासून पाण्याखाली आहे. त्यामुळे १ पीक निघाले की, लगेच दुसरे पीक असे सतत चालू असते. त्यामुळे जमिनील काही आराम मिळत नाही. त्यामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. आमच्या भागात उसाचे एकरी २० ते २५ टन उत्पादन निघते. त्याच्यावर उत्पादन जात नाही. अशा परिस्थितीत आम्ही डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा २॥ एकरवर प्रयोग केला.

सुरुवातीला जर्मिनेटरच्या द्रावणात कांड्या बुडवून लावल्या. फुटवे चांगले निघाले. तसेच एकरी कल्पतरू सेंद्रिय खताच्या ५ बॅगा दिले. तेवढ्यावर आम्हाला एकरी ५० टनाप्रमाणे २॥ एकरात १२५ टन उत्पादन मिळाले. उसाचे क्षेत्र निमबटाईचे होते. सुरुवातीला त्या शेजारच्या शेतकऱ्याला मला सांगावे लागले की, एरवी आपल्याला फक्त २० - २५ टन उत्पादन मिळते. तर तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उतपादन निश्चित वाढेत. तेव्हा तो शेतकरी खर्च वाढेल म्हणून तयार होत नव्हता. मात्र मी विनवणी केल्यावर व उत्पादनाची खात्री दिल्यावर तो तयार झाला आणि नंतर मग हे वाढलेले उत्पादन पाहून तोही खूष झाला.