२।। वर्षात कलिंगड, खरबुजाचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे उत्पन्न ३५ लाखाचे

प्रा. डॉ. बाबासाहेब अंकुशराव चव्हाण,
मु. आनंदवाडी, पो. तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड.
मोबा. ९८८१०८९८९४



माझे आई - वडील, मोठा भाऊ पुर्णत: अशिक्षीत असून मी एकटाच शिकलो आहे. २००२ -२००३ मध्ये माझे एम.ए.बी.एड. पुर्ण झाले. तसेच २.भ.अट्टल महाविद्यालय. गेवराई येथे पार्टटाईम जॉब करत असतानाच हिंदी लिटरेचरमध्ये डॉक्टरेट मिळविली.

आजची शेती ही पुर्वीप्रमाणे पारंपारिक अडाणी शेतकऱ्याची राहिली नाही. कारण दिवसेंदिवस हल्लीचे बदलणारे हवामान आणि यामुळे पिकावर येणारी नव - नवीन रोगकीड, दुष्काळी परिस्थती, अवकाळी पाऊस, गारपीट अशा एकामागून एक समस्या उभ्या, राहत आहेत. आजच्या काळात नवीन संशोधित वाणांचा, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यासपुर्वक कुशलतेने वापर करून प्रतिकुल परिस्थतीवर मात करून दर्जेदार स्पर्धात्मक उत्पादन घेणे गरजेचे झाले. आहे हे मी हेरले. आई - वडील पारंपारिक पद्धतीने भाजीपाला घेत असत. तेव्हा आठवड्याला ५०० ते १००० रू. मिळत, त्यावर ते खूष असत. मात्र यातून काहीच परवडत नसे. म्हणून मी माझ्या ज्ञानाचा नोकरीपेक्षा शेतीत वापर करण्याचे ठरविले.

प्रथम वडिलोपार्जित कोरडवाहू २० एकर जमिनीसाठी ४ कि.मी. अंतरावरून २००६ मध्ये पाईपलाईन ने पाणी आणून बागायती केली. त्यामध्ये २००७ पासून निरनिराळे प्रयोग करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला रेशीम उद्योगाचा प्रयोग केला. २ एकर तुती लागवड करून हा उद्योग उभारला. मात्र त्यावेळी शासनाचा अपेक्षित दर मिळत नव्हता आणि खाजगी बाजारपेठीही उत्पलब्ध नव्हती. त्यामुळे हा उद्योग बंद करावा लागला. नंतर ऊस पिकाकडे लक्ष केंद्रीत केले. मग मी तालुक्यात पहिल्यांदाच ३।।' x ३।।' वर फुलीवर जोडओळीने ठिबकवर ऊस लावला. त्यापासून २ वर्ष चांगले एकरी ६५ ते ७० टन अॅव्हरेज मिळून दर २२०० रू. चा मिळून १।। लाख रू. उत्पन्न प्रति एकरी मिळाले. या लागवड पद्धतीमुळे उसाच्या उत्पन्नात एकरी १५ - २० टन उत्पादन वाढून अंतरमशागतीच्या खर्चात १० - १२ हजार रू. बचत झाली. नंतर दुसऱ्या वर्षी २००८ - २००९ मध्ये महाराष्ट्रातील उसाखालील क्षेत्र वाढल्याने दर खाली आले, त्यामुळे ऊस पीक परवडेनासे झाले.

नंतर २०११ मध्ये डाळींब लागवडीचा निर्णय घेतला व त्यामध्ये कलिंगड, खरबुजाचे आंतरपीक घेण्यास सुरुवात केली. ७ एकरमध्ये टिश्यु कल्चर भगवा डाळींब १०' x १४' वर मध्यम प्रतिच्या जमिनीत लावले. या पिकाची पूर्ण वाढ होईपर्यंत मधल्या पट्ट्यात कलिंगड, खरबूज लावून लावून ३ महिन्यामध्ये प्रति एकरी १।। लाख रू. उत्पन्न मिळू लागले. याला ५० हजार रू. खर्च जावून १ लाख रू. नफा मिळू लागला. यामध्ये विशेषत: पावसाळी सप्टेंबरची आणि उन्हाळी जानेवारी - फेब्रुवारीची लागवड करत असे.

पहिल्यावर्षीचा प्रयोग यशस्वी झाल्यावर सलग कलिंगड, खरबुजाचे पीक अजून सुधारित बेड, मल्चिंग पेपरचा वापर करून घेऊ लागलो. चालू वर्षी सप्टेंबर २०१३ मध्ये ६ एकरमध्ये कलिंगड व खरबुज लागवड केली. यासाठी सुरूवातीपासूनच नेहमीप्रमाणे जर्मिनेटरचा बीजप्रक्रियेसाठी वापर केला, त्यामुळे उगवण लवकर झाली. जर्मिनेटरमुळे प्रतिकुल परिस्थतीतदेखील रासायनिक औषधापेक्षा उगवण उत्तम प्रकारे होत असल्याने लागवड यशस्वी होते. या पिकांस पुढे गरजेनुसार सप्तामृताच्या ३ फवारण्या केल्या. कारण २०१२ यावर्षी खरबुजावर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला होता तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन, हार्मोनी वसुंधरा अॅग्रो, बीड येथून नेवून वापरले होते. तर सर्वांचे खरबुज गेले असताना आपल्या खरबुजावरील व्हायरस आटोक्यात येवून एकरी किमान खर्च तरी निघाला. एकरी साधारण ५० ते ६० हजार रू. उत्पन्न मिळाले होते.

या अनुभवातून चालू वर्षी सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ६ एकर कलिंगड, खरबुजाला वापरले तर एकरी १।। लाख रू. मिळाले. असे जून २०११ ते जानेवारी २०१४ पर्यंतच्या २।। वर्षात ३५ लाखाचे कलिंगड, खरबुज विकले.

३ एकर शेवग्यापासून १।। लाख

जून २०१३ मध्ये ३ एकर शेवगा लावला आहे. त्यालासुद्धा वेळोवेळी सप्तामृतचा वापर करत आहे. हा शेवगा जानेवारीत चालू झाला. बहार लागताना अडचणी होत्या, थंडी जास्त होती. त्यातच पाणी ज्यादा होत होते. त्यामुळे शेंगा लागत नव्हत्या. मात्र हे लवकर उमजत नव्हते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे शेवगा लागवडीचे पुस्तक नेले होते. त्याचा फायदा झाला. सेंटिग अवस्थेत पाण्याचे नियोजन चुकत असल्याचे पुस्तक वाचल्यानंतर समजले, त्यानुसार बदल केला. तर फुले लागून सेटिंग चांगले झाले. जानेवारी २०१४ पासून उत्पादन चालू झाले. १५ जानेवारी ते ८ मार्च २०१४ पर्यंत माल औरंगाबाद मार्केटला विकला. तेथे ३० ते ४० रू./किलो भाव मिळाला. या ३ एकर शेवग्यापासून आतापर्यंत १।। लाख रू. झाले असून झाडावरून अजून किमान १० ते १५ टन माल निघाला असता, मात्र मागील आठवड्यात गारपीटीने पुर्णता: उद्ध्वस्त झाला. आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मोडलेल्या, टिचलेल्या फांद्या छाटून या झाडांना ५०० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत देवून एकरी जर्मिनेटर १ लि. + प्रिझम ५०० मिली चे १०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग करणार आहे. त्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे सप्तामृत फवारून २ महिन्यात नवीन बहार येईल असे सरांनी सांगितले.

७ एकरमधील १५०० डाळींबाचा १८ महिन्याचे असताना जून २०१२ मध्ये मृगबहार धरला. त्यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर ड्रेंचिंगसाठी नियमित वापरत होतो आणि सप्तामृत औषधांची गरजेप्रमाणे फवारणी घेत असे. थोड्याप्रमाणात किटकनाशक, बुरशीनाशकाचाही वापर केला. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे
फवारण्यामुळे फळांचे सेटिंग चांगले झाले. २५ - ३० च फळे धरली होती. तर त्याची फुगवण उत्तम होवून फळांना चकाकी आली होती. या १५०० झाडांपासून ७ टन माल निघाला होता.

गेल्यावर्षी दुष्काळाचा फटका बसला. मृगबहाराची (२०१३) ७ एकरला कळी अपेक्षेप्रमाणे निघाली नाही. तरी काही लागली त्याच्या फळांपासून २ लाख रू. झाले. त्यामुळे खर्च निघाला. नंतर सप्टेंबर २०१३ मध्ये हस्तबहाराचे नियोजन केले. या बहाराला खर्च फारसा करावा लागला नाही. कारण मृग बहाराला खर्च दिली होती. तर प्रतिकुल हवामानात झाडावर ३० ते ४० फळे धरली होती. ३०० ते ४०० ग्रॅमचे पक्क्व फळ झाले असताना गारपीटीने नुकसान झाले. त्यातील १०० क्रेट माल पुणे मार्केटला आज १७ मार्च २०१४ रोजी आणला होता. त्याला २५ पासून ८० रू. प्रतिकिलो दर मिळाला. मागच्या आठवड्यात सोलापूरला यातील काही माल नेला होता. त्यापेक्षा पुण्याचे मार्केटमध्ये भाव चांगले मिळत आहे.

शिक्षणाचा उपयोग इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पुस्तके कायम वाचतो. माझ्याकडे २५ - ३० कृषी विज्ञान मासिके आहेत. त्यातील अनुभवातून प्रेरणा मिळते. १ - १ अनुभव तर इतका प्रभावी असतो की, २ - ३ वेळा वाचूनही पुन्हा - पुन्हा वाचू वाटतो. त्याप्रमाणे मी शेतीत प्रयोग व तंत्रज्ञानाचा वापर करतो. माझे प्रयोग पाहण्यासाठी जिल्ह्यातून छोटे - मोठे सर्व प्रकारचे शेतकरी येतात. ५० वर्षापुर्वी ज्याच्यांकडे ७०० ते १००० एकर शेती होती ती विभागून आजही एकेकाकडे शेकडो एकर जमीन आहे असे शेतकरी माझे प्रयोग पाहण्यास येवून आम्हाला मार्गदर्शन करा म्हणतात. यावरून माझ्या लक्षात आले की, मी माझ्या शिक्षणाचा उपयोग नोकरीसाठी केला तर मोजकेच शिकणारे फक्त यातून नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने प्रेरणा घेतील. त्यापेक्षा माझ्या शिक्षणाचा शेतीसाठी वापर करून जो अशिक्षित, अडाणी शेतकरी आहे, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आहे अशांना यातून प्रेरणा मिळेल. आपल्या शेतीला बळकटी आणून विकास साधण्यासाठी त्यांना माझ्या शिक्षणाचा उपयोग झाला तर त्याचे चीज होईल आणि त्यातून वेगळेच समाधान मिळेल. म्हणून मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी कृषी तंत्रज्ञान विक्रीसाठी ठेवणार आहे. आमच्या भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे.

आता ४ एकर भेंडी व २ एकर ढेमसे लावणार आहे. त्यासाठी आज सप्तामृत ५ - ५ लि. घेवून जात आहे.