३।। एकरात ७० क्विंटल कापूस

श्री. कौतीक नवल पाटील, मु. पो. गोंदूर, ता.जि. धुळे.
मोबा. ८२७५००७२६७


५ वर्षापासून आम्ही कापसावर कापूस लावत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ३ वर्षापासून वापरत आहे. कापसाची लागवड जूनमधील ठिबकवर ४ x २ फूट अंतरावर असते.

कापूस १५ दिवसांचा असताना एकदा आणि १।। महिन्याचा असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची एकदा फवारणी केली होती. इतर कोणतीच औषधे वापरली नाही. झाडांचा फुटवा चांगला होता. ५ फूट उंच कापूस झाला होता. ३।। एकरमध्ये ७० क्विंटल कापूस निघाला. सध्या ५३०० रू./क्विंटल भाव चालू आहे. अद्याप विक्री केली नाही.

पूर्वी ३।। एकरात ३० - ३५ क्विंटल कापूस निघत असे, कवडी होत होती. मात्र आता ३ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने कापूस पूर्ण उमलतो. वेचणीस सोपा जाते. कवडी अजिबात होत नाही. पांढराशुभ्र कापूस मिळतो. शिवाय उत्पादनातही दुप्पट वाढ झाली आहे.

चालूवर्षी फरदड घेतली होती. मात्र बोंडे लागून माल तयार झाला असतानाच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात गारपीटीने फांद्या मोडल्या, अन्यथा २० क्विंटल उत्पादन झाले असते. फरदडला कोणतीच फवारणी केली नव्हती.

कापसात 'सिद्धीविनायक' शेवग्याचे मिश्रपीक

आज पुढील हंगामातील जून २०१४ च्या कापूस लागवडीमध्ये 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा आमच्या चुलत्यांच्या (श्री. मच्छिंद्र पाटील) अनुभवावरून लावणार आहे. त्यांचा १०० शेवग्याच्या झाडांचा प्लॉट मी पाहिला आहे. त्याचे उत्पादन पाहून आज १० पाकिटे 'सिद्धीविनायक' शेवगा बियाणे आणि जर्मिनेटर १ लि. घेऊन जात आहे. त्याचे कापसामध्ये मिश्रपीक घेणार आहे.