ऑलस्पायसेस्ची लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


ऑलस्पायसेस् हे १२ ते १३ मीटरपर्यंत उंच वाढणारे मसाला वर्गातील पीक आहे. या झाडाच्या फळांचा सुगंध जायफळ, लवंग काळी मिरी, दालचिनी आणि वेलदोडा यापासून तयार केलेल्या मसाल्यासारखा येतो, ऑलस्पायसेस्ची फळे काळी मिरीच्या आकाराची, गर्द तांबूस तपकिरी रंगाची असतात. काळी मिरीच्या आकाराची फळे असल्याने याला इंग्रजीमध्ये 'पिमेंटा' म्हणतात. ऑलस्पायसेस् ची लागवड तामिळनाडूमध्ये कलार, बुरलीयार आणि केरळच्या पठारी भागात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याचबरोबर कोकणातील काही ठिकाणी लागवडी खालील क्षेत्र वाढू लागले आहे.

उपयोग : ऑलस्पायसेस्च्या फळांची भुकटी, अखंड फळे आणि फळातील तेल यांचा उपयोग वेगवेगळ्या मसाल्यामध्ये केला जातो. मांस, हवाबंद केलेले पदार्थ, सॉसेस, लोणचे, चटण्या अशा पदार्थांना चव न स्वाद देण्यासाठी ऑलस्पायसेस्चा उपयोग होतो. त्याचप्रमाणे उत्तर, सुगंधी साबण बनविण्यासाठी केला जातो.

ऑलस्पायसेस् हे आयुर्वेदामध्ये पोटातील गुबारा (गॅस) हगवण व अपचन या आजारावर गुणकारी आहे तसेच संधीवात व मज्जातंतूचा दाह झाल्याने होणाऱ्या डोकेदुखीवर गुणकारी औषध म्हणून ऑलस्पायसेस्चा उपयोग होतो.

वाळलेली फळे व पानांपासून वाफ उर्ध्वपातन पद्धतीने तेल काढले जाते. फळांपासून ३.३ ते ४.५% तेल निघते. त्याला 'पिमेंटो बेरी ऑईल' म्हणतात. पानांपासून ०.७ ते २.९% तेल निघते. त्याला 'पिमेंटो लिफ ऑईल' म्हणतात. दोन्ही तेलात 'युजेनॉल' हा अतिमहत्वाचा घटक ६५ ते ८०% असतो.

ऑलस्पायसेसची पाने जाड, हिरवी, चमकदार देठाकडे निमुळती असतात. पानांच्या खालील भागात तेलाच्या ग्रंथी असतात. फांद्यांच्या टोकावर फुलांचे गुच्छ असून झाडे नर आणि मादी अशा दोन प्रकारची असतात. मादी झाडावर स्त्रीकेसर व पुंकेसर अशी संयुक्त फुले व निव्वळ स्त्रिके सर असलेली मादीफुले असतात. नराच्या झाडाला फक्त स्त्रीके सर असलेली फुले असतात. नराच्या झाडाला फळे लागत नाहीत.

हवामान व जमीन : ऑलस्पायसेस् या मसाला पिकास विषम म्हणजे कमाल तापमान ३५ डी. से. चे वर चालत नाही. यावरील तापमानात पानांच्या कडा जळतात व रोपांची वाढ खुंटते. अशा वेळेसे भोवताली गारवा असणे जरुरीचे असते.

तांबुस, पोयट्याची अधिक लोह व कार्बनयुक्त जमीन ऑलस्पायसेस्च्या वाढीसाठी अधिक उपयुक्त ठरते. हलक्या प्रतीच्या परंतु निचऱ्याच्या जमिनीत देखील ऑलस्पायसेस् वाढू शकते.

रोप तयार करणे : ऑलस्पायसेस्ची प्रथम बियांपासून रोपे तयार करावी लागतात. बिया लावल्यापासून १५ दिवसापासून ४५ दिवसापर्यंत उगवण होत असते. बियांना जर जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केली तर १२ ते १८ दिवसात बियांची पूर्ण उगवण होते. बी उगवून आल्यानंतर १५ दिवसाच्या अंतराने सप्तामृताच्या २ - ३ फवारण्या घेतल्यास ३ ते ४ महिन्यात रोप लागवडीस येते रोप लागवडीस तयार होण्यासाठी एरव्ही ५ ते ६ महिने लागतात.

प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र येथील प्रयोगावरून ऑलस्पायसेस्ची अभिवृद्धी गुटी पद्धतीने करता येते. गुटी अलग करण्याचा कालावधी हा १८ ते २८ महिने आहे. गुटी कलम पद्धतीसाठी २ वर्षे वयाची ४५ सेंमी लांबीचा आणि २.५ सेमी गोलाकार जोमदार फांदी निवडावी आणि नेहमीच्या पद्धतीने त्यावर गुटी कलमास मुळे फुटण्याचा कालावधी अधिक असल्याने शेवाळ वाळते. त्यासाठी हिवाळ्यात १५ दिवसांनी आणि उन्हाळ्यात १० दिवसांनी शेवाळामध्ये सिरींजने पाणी द्यावे.

लागवड : ऑलस्पायसेस्ची लागवड ६ मी x ६ मी अंतरावर ६० सें. मी. लांबी, रुंदी व खोलीचे खड्डे खोदून त्यात चांगले (पूर्ण) कुजलेले १० ते १५ किलो (१ ते १।। पाटी) शेणखत आणि कल्पतरू २५० ते ५०० ग्रॅम एकत्र मिसळून खड्डे भरावेत. पावसाळ्यात रोपांची लागवड करावी. खड्ड्यात रोप लावल्यावर त्याला जर्मिनेटर २० ते २५ मिली + १ लि. पाणी या प्रमाणात द्रावण तयार करून प्रत्येक रोपावर २०० ते २५० किलो द्रावणाने आळवणी घालावे. नंतर बुंधाजवळ मातीची भर लावून पाणी द्यावे.

खते : कल्पतरू सेंद्रिय खत ५०० ग्रॅम ते १ किलो आणि शेणखत १० किलो द्यावे. दहा वर्षाच्या व तेथून पुढच्या झाडांना कल्पतरू दीड ते दोन 'किलो २ ते ३ वेळा विभागून दर २ महिन्यांनी जून ते सप्टेंबरपर्यंत (पावसाळ्यात) द्यावे आणि शेणखत २५ ते ३० किलो द्यावे. ऑलस्पायसेस्ला रासायनिक खते देऊ नये. दिल्यास ऑलस्पायसेस्ची प्रत खराब होते. म्हणून निंबोळी पेंड, करंज पेंड, एरंडी पेंड द्यावी. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्रावरील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

रोग व किडी : ऑलस्पायसेस्वर शक्य तो रोग व किडींचा प्रादुर्भाव आढळून येत नाही. काही प्रमाणात 'पिमेंटा रस्ट' नावाचा रोग पानांवर येतो. एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी किंवा सप्तामृताच्या खालीलप्रमाणे फवारण्या घेतल्यास हा रोग होत नाही आणि झाडांची जोमदार सशक्त वाढ होऊन पाने रुंद, जाड होऊन सुगंध वाढतो.

फवारणी :

१) पहिली फवारणी : (लागवडीनंतर २१ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ राईपनर २५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ३०० मिली. + हार्मोनी २०० मिली. + स्प्लेंडर २०० मिली. + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (लागवडीनंतर ३० ते ५० दिवसांनी) : जर्मिनेटर ७५० मिली.+ थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट १ किलो + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी ३०० मिली. + स्प्लेंडर ३०० मिली. + २०० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (लागवडीनंतर ६० यर ९० दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट १ किलो + प्रिझम १ लि. + न्युट्राटोन १ लि. + हार्मोनी ५०० मिली. + स्प्लेंडर ५०० मिली. + ३०० लि.पाणी.

काढणी : रोपांपासून लागवड केल्यापासून ७ ते १० वर्षांनी फुले लागतात. फेब्रुवारी महिन्यात फुलोरा येऊन मे - जून या काळात फळांची वाढ पूर्ण होते. पूर्ण वाढ झालेली फळे हिरवी दिसतात. मसाल्यामध्ये वापरण्यासाठी अशीच फळे काढावीत. पूर्ण पक्व झाल्यावर (पिकल्यावर) ती चकचकीत काळसर दिसतात. अशी फळे चवीला गोड असतात. अशी फळे उन्हात वाळवावीत. वाळल्यानंतर तांबूस तपकिरी रंग येतो आणि अशी फळे मुठीत घेऊन हलविल्यास खणखणीत आवाज येतो.

ऑलस्पायसेस्चा स्वाद आणि सुगंध हा जायफळ, लवंग, काळी मिरी, वेलदोडा आणि दालचिनी या पाच मसाला पिकांचा असल्याने या पाच पिकांची लागवड करावी लागत नाही. शिवाय या पिकांची लागवड करावी लागत नाही. शिवाय या पिकांची लागवड करण्यासाठी वेगवेगळ्या २ - ३ प्रकारची लागणारी जमीन, खते, पाणी, श्रम, वेळ आणि पैसा हा वाचतो. पंजाबचे खोरे, गंगेचे खोरे, हिराकुडचे खोरे आशा ठिकाणी याची लागवड होऊ शकते.

भारतीय अन्न पदार्थ विशेषकरून (Curry) ज्याला पुरणाच्या डाळीचा आमटीला स्वाद आहे. अशा आमटीसाठी युरोप व अमेरिकेमध्ये प्रचंड आवड आहे आणि त्याला लागणारे पाच प्रकारचे मसाले (जायफळ, लवंग, मिरी, वेलदोडे आणि दालचिनी) याचा स्वाद देण्याकरिता वेगवेगळे पाच पदार्थ न घेता त्याच्या ठिकाणी ऑलस्पायसेस्चा उपयोग करता येईल. ज्या पद्धतीने दक्षिण आणि केरळमध्ये कढीपत्त्याला मागणी आहे. त्यामुळे त्याची पावडर विकली जाते. त्या पद्धती ने ऑलस्पायसेस्ला जगभर मागणी राहील.