१५ गुंठे वांग्यापासून ९० हजार

श्री. जगन्नाथ सुदाम पाडेकर,
मु. संतवाडी, पो. आळे, ता. जुन्नर, जि. पुणे,
मोबा. ९७६६४५७०१६आम्ही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा १४ - १५ वर्षापासून वापर करीत असून या तंत्रज्ञानामुळे अतिशय निकृष्ट, हलक्या, चुनखडयुक्त अशा जमिनीतूनदेखील दर्जेदार प्रतीचे विक्रमी उत्पादन घेत आहे. पुर्वी या जमिनीतून काहीच पिकत नव्हते. त्यामुळे शेतमजूरी, विहीरी खोदाईची कामे करून उदरनिर्वाह करीत असे. मात्र जेव्हापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची साथ लाभली. तेव्हापासून स्वकष्टातून शेती चांगली बहरली आहे. यासंदर्भातील माझ्या मुलाखती कृषी विज्ञानमधून वेळोवेळी प्रसरीत झालेल्या आहेत.

गेल्यावर्षी मी ऑगस्ट २०१३ मध्ये १५ गुंठ्यामध्ये बेडवर पंचगंगा वांग्याची लागवड डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केली आहे. कल्पतरू २ पोती आणि १८.४६ ची १ बॅग असा बेसल डोस दिला. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या दर १५ दिवसाला फवारण्या करतो. २ - ३ महिन्याला ५- ५ लि. साप्तामृत नारायणगाव शाखेतून नेत असतो. स्प्लेंडरचे ३ वेळा स्प्रे केले. तर आलेला लाल कोळी गेला. त्यानंतर पुन्हा लाल कोळीचा प्रादुर्भाव झाला नाही. १५ दिवसाला १९:१९ ड्रिपवाटे १ किलो देतो.

६५ दिवसात वांगी चालू झाली. रानाची ४ भागात विभागणी करून दररोज क्रमवार तोड करतो. तर चौथ्या दिवशी फिरून दुसरा तोड होत असे. दररोज ५ - ६ क्रेट वांगी निघत असत. झाडे खूप वाढली, फुटाव वाढला. झाडे डोक्याला लागत आहेत. १५ गुंठ्यात २ हजार झाडे आहेत. ४ महिने वांगी चालली. सुरुवातीला २०० ते २५० रू./क्रेट (१५ किलो) भाव मिळाला. मात्र नंतर भाव ढासळले. तरी इतरांचे क्रेट ७० - ८० रू. ला जात असताना आमचे क्रेट १०० ते १२० रू. पर्यंत जात असे. किमान बाजारभावापेक्षा २० रू./क्रेट भाव जादा मिळत असे.

४ महिन्यात जवळपास ६०० क्रेट सहज माल निघाला असून सरसरी १५० रू. भावाने १५ गुंठ्यातून ९० हजार रू. झाले. याला एकून खर्च २० हजार रू. आला.

या तंत्रज्ञानाने वांग्याला कलर, चमक असल्याने भाव जादा मिळत होता, शिवाय चवही उत्कृष्ट असल्याने गिऱ्हाईक लवकर लागत असे. विशेष म्हणजे या वांग्याची भाजी अतिशय चवदार होत असल्याने आळेफाट्यातील साईलीला हॉल. सौभद्रा हॉलमध्ये लग्नकार्यातील भाजीसाठी आवर्जुन आपली वांगी नेत असत.

आता वांग्याचा माल कमी झाला आहे. तेव्हा ती काढून टाकून त्यात टोमॅटो लागवडीसंदर्भात सल्ला घेण्यासाठी सरांकडे आलो आहे. कारण आमच्याकडे जाणकार शेतकऱ्यांच्या मते टोमॅटोवर वांगी घेता येतात. मात्र वांग्यावर टोमॅटो पीक चांगले येत नाही. सरांनी सांगितले, "डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सुरूवातीपासून वापरले तर वांग्यावरही टोमॅटो चांगले येऊ शकते. ही टोमॅटो ऐन उन्हाळ्यात घेत असल्याने यावर लाल कोळीचा प्रादुर्भाव होतो. 'स्प्लेंडर' चा तुम्ही वांगी पिकावरील लाल कोळी नियंत्रणासाठी चांगला रिझल्ट घेतलेला आहेच. तेव्हा टोमॅटोवर त्याचा सप्तामृतासोबत आवर्जुन वापर करा." गेल्यावर्षी टोमॅटोचे भाव कोसळल्याने काही परवडले नाही तेव्हा पावसाळ्यात वांगी लावू का ? असे सरांना विचारले असता सरांनी सांगितले, "वांग्याला पावसाळ्यात खोडकिडीचा, शेंडेअळीचा तसेच फळआळीचा प्रादुर्भाव होतो आणि तो कोणत्याच औषधांनी आटोक्यात येत नाही. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले तरी ६० ते ७० % च फरक पडेल. शिवाय पावसळ्यात वांग्याला भाव कमीच राहतात. तेव्हा ज्या भागात पाऊस कमी आहे आणि परतीचा मान्सून सप्टेंबरमध्ये येतो तेथे उन्हाळी व पावसाळी वांगी लागवड यशस्वी होते. याला खोडकीड लागत नाही, वांग्याचा रंग, झालर, वांग्याचा आकार, चव, काटेरीपणा या त्या - त्या भागातील मागणीनुसार त्याप्रमाणे तशा वांग्याची लागवड केली जाते."

हलक्या जमिनीत २० गुंठ्यात १० टन कांदा

दसऱ्याला गरवा कांदा २० गुंठ्यामध्ये लावला होता. याला जमीन हलकी असल्याने पहिली खुरपणी केल्यावर साधारण १ महिन्याचा कांदा असताना कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा आणि २३: २३ ची १ बॅगा दिली. १५ दिवसाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करीत असे. पहिल्या ४ फवारण्या केल्यानंतर पुन्हा कांदा फुगावणीसाठी शेवटच्या महिन्यात ३ वेळा न्युट्राटोन व राईपनर फवारले. तर हलक्या जमिनीतील कांदा एक नंबर प्रतीचा मिळाला. फेबुवारी अखेरीस काढला तर २० गुंठ्यात १० टन माल निघाला. कांदा एकसारखा, डबलपत्तीचा मिळाला आहे. खायला अगदी खोबऱ्यासारखा लागत आहे. याची अद्याप विक्री बाकी आहे.

आता वांग्याचे रान निट करून टोमॅटो लागवडीचे नियोजन करणार आहे. मात्र यामध्ये सरांनी असे सांगितले की, "ही दोन्ही पिके एकाच कुळातील असल्याने वांग्याची धसकटे, काडीकचरा पूर्ण वेचून बाहेर काढावा लागेल. कारण यावरील कीड व बुरशीचा पादुर्भाव पुढील टोमॅटो पिकावर होऊ शकतो." तेव्हा हे रान जर वेळेत तयार झाले तर यामध्ये टोमॅटो लावणार आहे. नाहीतर कांद्याच्या रानात टोमॅटो लावणार आहे.

या टोमॅटो पिकालादेखील नेहमीप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सुरूवातीपासून कल्पतरू सेंद्रिय खतासह वापरणार आहे.