२ एकर सितारा व प्रजोलापासून १० महिन्यात निव्वळ नफा ४।। लाख सिताफळ, पपई, मिरची, टोमॅटो रोपवाटिकेत अनेक यशस्वी प्रयोग

श्री. जीवन विठ्ठल ढाकरे,
मु.कंकराळा, पो.जरंडी, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद
मो. ९६८९६५७५२८


दोन वर्षापुर्वी जळगाव कृषी प्रदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची कृषी मार्गदर्शिका नेली होती. त्यातील माहिती वाचल्यानंतर टेक्नॉंलॉजीने वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांनी विविध पिकांवरील घेतलेले रिझल्ट वाचून भारावलो. त्यानंतर जळगाव येथून जर्मिनेटर मिरचीची रोपे कोकोपीटमध्ये तयार करण्यासाठी घेवून गेलो. मिरचीचे बियाणे जर्मिनेटर द्रावणात बुडवून लावल्यामुळे १००% उगवण झाली. नंतर एकही रोप मेले नाही. २५% मर होत असे.

त्या रोपांची २ एकरात ४' x २' वर जून २०१३ मध्ये लागवड केली. त्यावेळी हवामान अनुकूल असल्याने पिकावर जास्त फवारण्याची गरज भासली नाही. गरजेपुरते बाविस्टीन आणि कॉन्फिडॉर फवारले. डी.ए.पी., सुपर फॉस्फेटच्या २ - ३ बॅगा लागवडीपुर्वी आणि त्यानंतर पुन्हा याचप्रमाणे फुलकळी अवस्थेत २ - २ बॅगा खत दिले होते.

जर्मिनेटरमुळे रोपे सुरूवातीपासूनच जोमदार तयार झाल्याने मिरचीवर ज्यादा फवारण्याची गरज भासली नाही. प्लॉट १ नंबर तयार झाला होता. बाकीच्यांकडे व्हायरस आला असताना आमची मिरची निरोगी होती. या मिरचीचे तोडे सव्वा महिन्यात चालू झाले. १५ दिवसात २० क्विंटलपासून सुरू झालेली मिरची पुढे वाढत वाढत तोड्याला ४० - ७० ते ८० क्विंटलपर्यंत मिळाली. २ - ३ महिने चांगले उत्पादन मिळाले. नंतर पुढे कमी - कमी होत गेली व जुलै २०१३ अखेरीस चालू झालेली मिरची मे २०१४ पर्यंत चालली.

वाशी मार्केटला सितारा (१ एकर) मिरचीला ३ - ४ हजार रुपये/क्विंटल तर प्रजोला (१ एकर) वाणाच्या मिरचीला २००० ते २२०० रुपये/क्विंटल भाव मिळत होता. या २ एकरातील मिरचीपासून एकूण १।। लाख रू. खर्च वजा जाता ४।। लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. मल्चिंग पेपर व ठिबकमुळे उत्पादन खर्च वाढला होता. मात्र त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली व दर्जा चांगला मिळाल्याने ज्यादा भाव मिळून उत्पन्नात भरीव वाढ झाली.

नर्सरी व्यवसायासाठी जर्मिनेटर रामबाण

माझा भाजीपाल्याच्या नर्सरीचा व्यवसाय असल्याने बिजप्रक्रियेत जर्मिनेटरचा वापर करतो. गेल्यावर्षी टोमॅटोची २० हजार रोपे तयार केली, एकही रोप वाया गेले नाही. आठवड्यापुर्वी सितारा मिरचीचा १० हजार व प्रजोला मिरचीचा १० हजार रोपे तयार केली आहेत. १ महिन्याच्या आत रोपे ७ - ८ इंच उंचीची लागवडीयोग्य तयार होतात.

गेल्या आठवड्यातील या मिरची रोपांना जर्मिनेटरचे अजून २ फवारे घेणार आहे. सरासरी ३० दिवसात रोपे विकतो, तेव्हा ती ५ - ६ पानावर असतात. खोड बळकट होते. ४' x २' वर ५ ते ५।। हजार रोपे एकरी लावतात. ट्रे सह १.२० रुपये/रोपे याप्रमाणे देतो. ट्रे शिवाय एक रुपयाला रोप देतो. कोकोपिटमध्ये कोणतेही खत वापरत नाही. तरी मिरचीचे पीक आमच्या भागात एक नंबरचे असते. सरांनी सांगितले की, "जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केल्यामुळे रोपे जोमदार येवून रोगप्रतिकार शक्ती वाढते, तसेच रोपे लावतानाच सरळ लागत असल्याने झाडे जोमदार तयार होतात. रोगराई येत नाही. "

सिताफळ बाळानगरची रोपे जर्मिनेटरची प्रक्रिया करून शेतकऱ्यांना वाटली. १९९५ साली पाटील नावाचे कृषी अधिकारी आमच्या भागात होते. ते आपल्याकडे येत असत. त्यांनी मला सिताफळाचे ५०० ग्रॅम बी दिले होते. त्यावेळी माझ्याकडे २ एकर पपई १०'x १०' वर होती. तेव्हा पपईच्या खोडाजवळ अंदाजे २- २/३ - ३ सिताफळाचे बी टाकले. १८ महिन्यात पपई संपली. पपई माल सुरत मार्केटला विकला. रासायनिक खत कोणत्याही पिकाला वापरात नाही. पपईच्या खोडाजवळ टाकलेल्या सिताफळाच्या बियापासून उगवलेल्या रोपांपैकी जोमदार १ - १ रोग ठेवले. सिताफळ १०' x १०' वर आहे. ठिबक आहे.

सिताफळात सध्या २ महिन्याचे मिरचीचे आंतरपीक इनलाईन ५' x १।' वर आहे. हे सिताफळ १५ वर्षापासून सुरू आहे. ३ वर्षात सिताफळ चालू झाले होते. ६ फळांचे आणि ४ फळांचे याप्रमाणे बॉक्स भरतो ते बॉक्स ८० रू. पासून १२० रू. भावाने जातात. दसऱ्याला सिताफळ चालू होते ते डिसेंबर - जानेवारीत संपते. ३ महिने बहार चालतो. जावेळेस पाऊस असतो तेव्हा भाव डाऊन होतात.

अभिनव प्रयोग

४ - ५ वर्षापुर्वी नवरात्रात अचानक पाऊस झाल्याने मार्केटला पाठविण्यास तयार केलेल्या मालाचे १ हजार बॉक्स भिजले. ते पाण्याने सडून आतील सिताफळही सडून गेले व फक्त बी राहिले. मग ते बी उकिरड्यावर टाकले. बॉक्समध्ये एका रात्रीत सिताफळ पिकते. नंतर उकिरड्यावरील बी गोळा करून शेतात असेच फोकले. यापासून जवळपास १ लाख रोपे तयार झाली असतील. त्यातील ५० - ६० हजार रोपे शेतकऱ्यांना फुकट दिली आणि उरलेली काढून टाकून त्या रानात मिरची लावली. सिताफळ सुरत मार्केटला आडत्याकडे विकतो. जामनेरचे आडते तेथे आहेत.

१९९५ साली मी मॅट्रीक पास झालो. आपली टेक्नॉंलॉजी इतरांपेक्षा भारी आहे. तेव्हा मला आपल्याकडून टिश्यू कल्चर केळीची रोपे पाहिजे आहेत. आता २० हजार रोपे दिली तरी चालतील. वर्षभरात ३ ते ३।। लाख रोपांची माझ्या मार्फत आमच्या भागात विक्री होईल. एवढी माझ्याकडे ऑर्डर आहे. तेव्हा आज (३० जानेवारी २०१५) खास केळी व पपईच्या रोपांसाठी आलो आहे. याचबरोबर मला डॉ. बावसकर तंत्रज्ञान आमच्या भागातील शेतकऱ्यांसाठी विक्रीस ठेवायचे आहे. तेव्हा सरांनी सांगितले की, ज्यांना शेतकऱ्यांविषयी कणव आहे. ज्यांचा तालुक्यात हजारो शेतकऱ्यांशी संपर्क आहे. त्यांना शेतकऱ्यांसाठी उभे करू. आज सरांनी मला 'कृषी विज्ञान' फेब्रुवारी २०१५ चे मासिक भेट दिले व मासिक पाहिल्यावर हे मासिक खूप उपयुक्त असल्याचे जाणवल्याने लगेचच 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली.