धरण परिसरातील उरलेल्या माळरानावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ५ एकर डाळींब प्रयोगाचा यशस्वी प्रयत्न

प्रा. शिरीष बळीराम पाटील, (M.Sc. वनस्पती शास्त्र)
मु.पो. हिंगणे बु॥, ता. जामनेर, जि. जळगाव.
मो. नं. ९४२०११२८५३माझ्याकडे, माझी व भावाची एकत्र १३ एकर मुरमाड, हलकी, माळरानाची जमीन आहे. आमचे शिवार वाघुर धरणाच्या बॅक वॉटर परिसरातले. भारी जमीन धरण क्षेत्रात पाण्याखाली गेल्यावर हेच माळरान हाती शिल्लक राहिले. या माळरानात धरणातून पाणी आणून त्यात डाळींब लावावे असे ठरवले.

राहुरी विद्यापीठ येथून १७०० रोपे आणून १२ x १० फुट अंतरावर ५ एकर लागवड सप्टेंबर २०१४ ला केली. लागवडीच्या वेळी खड्डे भरताना शेणखतासोबत कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर केला. जर्मिनेटर मध्ये बुडवून गुटी रोपांची लागवड केली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी, जळगाव ऑफिसमधून वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन आळवणी, फवारे यासाठी सप्तामृताचा वापर सुरूवातीपासून सुरू ठेवला.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची सर्व उत्पादने मी याआधी सुद्धा (२००६ पासून) केळी, कापूस, टरबूज या पिकांसाठी वापरत आलो आहे.

प्रथम बहाराची तयारी

डाळींबाच्या बाबतीत आम्ही सुरवातीपासून सेंद्रिय पद्धतीवर भर देत आहोत. शेणखत, शेण-कडधान्य स्लरी, ईएम यांचा वापर केला. लागवडीनंतर प्रत्येक झाडाला मल्चींग पेपर आंथरला. त्याचा खुपच फायदा झाडांना झाला. झाडे जोमाने वाढली. पांढरी मुळे जोमाने वाढली. झाडाखाली वाफसा स्थिती कायम राहिली. तणांचा त्रास ६ महिने झाला नाही.

झाडांची छाटणी प्रत्येक ६ व्या महिन्यात केली. रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवला. जर्मिनेटरचा वापर फवारणी, ड्रेंचिंगसाठी वेळोवेळी केला. एका वर्षाच्या काळात झाडे एकदम सशक्त व जोमदारपणे वाढली. १४ व्या महिन्यातच ४ ते ५ फुटाचा घेर व उंची ६ फुटापर्यंत गेली. झाडे बहार घेण्यालायक तयार झाली.

नोव्हेंबर २०१५ ला बागेला ताण देऊन आंबे बहार घेण्याचे नियोजन केले आहे. दीड महिन्यात ७५% पानगळ होऊन नवीन पालवी फुलोऱ्यासह निघाली ताणाच्या काळात बागेत रोटर मारून १० ट्रॉली शेणखत चांगले मुरलेले प्रत्येक झाडाला १५ किलो याप्रमाणे दिले पहिले पाणी सुरू केल्यानंतर जर्मिनेटरची ड्रेंचिंग केली सप्तामृतची फवारणी केली. त्यामुळे पानांना चकाकी व रुंदपणा आला. कळी सेटिंग चांगली झाली.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमीत फवारणी व आळवणीमुळे रसशोषक किडी, बुरशी रोगांचा प्रादुर्भाव बागेत जास्त जाणवला नाही.

प्रत्येक झाडाची क्षमता पाहून पहिल्या बहाराचे नियोजन आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे म्हणजे अगदी Eco-Friendly औषधे आहेत. ती मधमाशा, मित्रकीटक व मानवासाठी अपायकारक नाहीत. त्रासदायक किडींचा, बुरशी रोगांचा बंदोबस्त होतो. झाडांची निरोगी, जोमदार वाढ होते.

डॉ.बावसकर तंत्रज्ञाना हे एक अस्सल भारतीय तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदानच आहे व इस्त्राईल तंत्रज्ञानाच्याच तोडीचे आहे. शेतकऱ्यांनी अनुभव घेतल्याशिवाय त्याची प्रचिती येत नाही.