चित्रातल्या फलापेक्षा, झाडावरची डाळींब फळे आकर्षक निर्यातक्षम

श्री. सदाशिव आत्माराम भगत,
मु.पो. राजुरी, ता.पुरंदर, जि.पुणे,
मो.नं. ७७२१००५०१४माझ्याकडे २०१० मध्ये ५० गुंत्यात लावलेली ३०० डाळींबाची झाडे आहेत. या डाळींबाचा हा चौथा बहार धरला आहे. त्याला सप्टेंबर - ऑक्टोबर मध्ये ताण देऊन ऑक्टोबर (२०१५) अखेरीस छाटणी करून खते देऊन पहिले पाणी दिले. हा लेट हसत बहार आहे. सध्या ३०० ते ५०० ग्रॅमची फळे आहेत. यासाठी आतापर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ फवारण्या घेतल्या आहेत. तर फळे चित्रात दाखविली जातात, त्यापेक्षाही उत्कृष्ट आहेत. आमच्या भागात बायर कंपनीचे शिबीर होते. तेव्हा त्यांनी तेथे काही फोटो दाखविले. तर त्यांना मी सांगितले माझ्या बागेत झाडावर २०० ते २५० फळे असून यापेक्षाही मोठी फळे आहेत. त्यानंतर २ - ३ दिवसांनी बायर कंपनीचे लोक माझा प्लॉट पाहण्यात आले तर फळांनी लगडलेली झाडे तंगुसाचे तसेच १६ एम. एम. ची तार बांधून आधार दिलेली झाडे फळांच्या ओझ्याने वाकत होती, हे पाहून ते सर्वजन आश्चर्य चकित झाले व मला विचारू लागले. नक्की काय वापरले आहे बागेला? तेव्हा मी सांगितले ही फक्त डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची किमया आहे.

माझ्या बागेस अनेक डाळींब बागायतदरांनी तसेच डॉक्टर, तज्ञ, वाघिरे कॉलेजचे प्राचार्य अशा मान्यवरांनी भेट दिली आहे. आता ३०० ते ५०० ग्रॅम वजनाच्या फळांचे अजून पोषण होण्यासाठी सरांचे मार्गदर्शन घेण्यास आज (१४ मार्च २०१६) आलो आहे. तेव्हा सरांनी सांगितले, आता या बागेला थ्राईवर २ लि. + क्रॉपशाईनर ३ लि. + राईपनर १.५ लि. + न्युट्राटोन २ लि. + प्रोटेक्टंट १.५ किलो + हार्मोनी ५०० मिली + ३०० लि. पाणी अशा १५ - १५ दिवसांच्या अंतराने अजून २ ते ३ फवारण्या घ्या. म्हणजे ६०० ते ८०० ग्रॅमची फळे मिळतील व याला आकर्षक लालभडक रंग, चमक येईल. डाळींब खाताना बोटे एकमेकांना चिकटतील एवढी गोडी येईल.

असा माल अमेरिका, युरोप, पॅरीस इटली, जपान, चीन या राष्ट्रात निर्यात होईल. फळांचा दर्जा उत्कृष्ट असल्याने भाव जादा मिळेल, तसेच यातील शेवटच्या फवारणीमुळे ऑगस्टला चालू झालेला बहार सप्टेंबरपर्यंत संपत असतानाच पुढील बहारासाठीची काडी पक्व, दमदार तयार होईल. त्यामुळे पुढील बहाराची फळी भरपूर जोमदार निघेल. म्हणून फळे काढणीपुर्वीची ६ वी फवारणी तसेच ड्रेंचिंग करण्यास सरांनी मुद्दाम सांगितले आहे. म्हणजे सप्टेंबरच्या बहाराची फळे एप्रिल २०१७ मध्ये चालू होतील. तेव्हा माल उत्तम मिळाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात भाव सापडतील. हे सरांचे म्हणणे १००% साध्य होईल कारण सरांनी सांगितलेले सर्व तंत्रज्ञान आम्ही शिरसावंद्य पाळतो. या अगोदरही केलेली कारली, दोडका, शेवगा, मेथी, काकडी ह्या पिकांचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी तंतोतंत वापरून विक्रमी उत्पादन घेतले आहे.

यावेळी सरांनी आम्हाला मार्गदर्शन करून डाळींबाची सुधारीत सहावी आवृत्ती आणि कृषी विज्ञान मार्च २०१६ चे मासिक दिले.