दुष्काळी कोरडवाहू शेतीस 'सिद्धीविनायक' शेवगा वरदान आंतरपीक कपाशी, वांगी, मिरची व शेवग्याचे ३ एकरात पहिल्याच वर्षी ४ लाख, दुसऱ्या वर्षी ५ लाख, तिसर्या वर्षी ६ लाख नफा

प्रा. प्रकाश पांडूरंग लहासे,
मु.पो. पहूर-कसबे, ता. जामनेर, जि. जळगाव - ४२४२०५.
मो.नं. ०९४२३९३७१३६


डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सिद्धीविनायक मोरिंगा शेवग्याच्या १ हजार झाडापासून मला पहिल्या वर्षी ४ लाख, दुसऱ्या वर्षी ५ लाख, तिसऱ्या वर्षी ६ लाख रुपये खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न मिळाले. १२' x १२' अंतर २ शेवगा झाडामध्ये ठेवल्याने दरवर्षी वेगवेगळी आंतरपिके व मिश्र पिके घेता आली व त्यामधून संपूर्ण खर्च व मजुरी आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघाली व खऱ्या अर्थाने ३ वर्षाची शेती शुन्य खर्चाची झाली व सेंद्रिय औषधांनी, खतांनी व शेवग्याने जमीन जास्त सुपीक बनली आणि एक सेवानिवृत्त प्राध्यापक कमी पाण्यात शेवग्याचे एवढे चांगले उत्पन्न घेऊ शकतो. हा आदर्श परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठेवला गेला व त्यातून जामनेर तालुक्यात आज रोजी ५० एकर शेवगा उभा राहिला तर जळगाव जिल्ह्यात ३०० एकर शेवगा पीक घेणारे शेतकरी तयार झाले. ही सर्व किमया डॉ. बावसकर सरांच्या 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याने केली. 'सिद्धीविनायक' शेवग्याची चव लय भारी, रंग पोपटी हिरवा, आकर्षक व शेंग मध्यम लांब म्हणून मार्केटला जादा भाव व लवकर उठाव (विक्री) होते.

शेवगा पीक अत्यंत कमी पाण्यावर म्हणजे सरासरी फक्त १० मिनिटाचे ठिबकचे पाणी परंतु आंतरपिके, मिश्रपिके यांचे जिवंत आच्छादन आणि मका कुट्टीचे आच्छादन करून शेवगा जगवला, वाढविला व उत्पन्न मिळविले आणि एक वेगळा आदर्श परिसरातील शेतकऱ्यांसमोर ठेवला. परिणामी श्री. प्रकाश लहासे सर, गुरुजी, प्राध्यापक, इंग्रजीचे सर नावाने प्रसिद्ध असलेले माझे व्यक्तिमत्व बदलले व 'शेवग्यावाले लहासे सर' अशी माझी ओळख निर्माण झाली. मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येणे सुरू झालेत व मी प्रामाणिकपणे मार्गदर्शन करीत गेलो, कारण मुळात मी एक शिक्षक आहे. माझे उत्पादन प्रत्येकवर्षी वाढत गेले. माझी शेवग्याची शेतजमीन डॉ.बावसकर विनायक सुकदेव यांच्या शेताला लागूनच आहे व त्यांनीच मला शेवगा लावायची प्रेरणा दिली. पण सदरच्या भारी, काळीच्या जमिनीत शेवगा लावू नका असे बजावले व सांगितले की, दूरच्या गोगडीच्या शेतात, हलक्या मध्यम जमिनीत शेवगा लावा. मात्र पाणी अत्यंत कमी असल्याने मी हलक्या जमिनीऐवजी भारी काळ्या, कापसाच्या जमिनीत हा शेवगा लावला. अत्यंत कमी असल्याने मी हलक्य जमिनीऐवजी भारी काळ्या, कापसाच्या जमिनीत हा शेवगा लावला. पाणी फारच कमी असल्याने एरवी जी भारी जमिनीतील शेवग्याची अनावश्यक वाढ होते तेवढी येथे झाली नाही व नियमीत डॉ. बावस्कर सरांचे मार्गदर्शन व तंत्रज्ञानाचा वेळच्यावेळी वापर, करुणो हा शेवगा यशस्वी केला.

सदरचे 'सिद्धीविनायक' मोरिंगा हे वाण डॉ. बावसकर सर (पुणे) यांनी निवड पद्धतीने विकसित केलेले आहे. ते अत्यंत चांगले असून हलक्या जमिनीपेक्षा भारी जमिनीत भरपूर उत्पादन देणारे आहे. ह्या जमिनीचा दर ३.५०/- आहे. अश जमिनीत हे शेवगा वाण फक्त पावसाच्या पाण्यावर म्हणजे कोरडवाहू सुद्धा येणारे आहे. फक्त त्याला साथ हवी डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीच्या 'सप्तामृताची' व कल्पतरू सेंद्रिय खताची.

पहिल्या वर्षी मी १००० बी रात्रभर जर्मिनेटरमध्ये भिजत ठेवले व सकाळी ७ जून २०१३ ला १ तास सावलीत गोणपाटावर सुकवून १२' x १२' वर बी डायरेक्ट इनलाईन ठिबकवर फक्त अर्धा इंच खोल टोकले. ४ गड्यांनी फक्त ४ तासात ३ एकर शेवग्याची लागवड केली. योगायोगाने रात्रभर झिमझिम पाऊस झाला व ६''इंच ओल रात्रीतूनच झाली. पावसाळी तयार झालेले होते. परिणामी ६ व्या ते ७ व्या दिवशी ९९% बी उगवून जमिनीच्यावर आलेले पाहून समजले की आता आपण अर्धी लढाई जिंकलो. पंधरा दिवसानंतर नांग्या भरण्यासाठी फक्त २० बिया लागल्या. साधारण एक महिन्याने सप्तामृताचा हलका फवारा दिला. त्याने रोपे उत्कृष्ट झाली. नंतर २ एकरात कपाशीची अंतर पीक, तर एका एकरात भरताची वांगी ३० आर व मिरची १० आर घेतली. तर कापूस २७ क्विंटल, वांगी एक लाखाची आणि मिरची ५०,०००/- रू. ची घडवली (झाली) आणि शेवगा पीक बोनस ४ लाखाचा झाला. घरची शेती करणारी, राबणारी एकही व्यक्ती नाही. सर्व मजुरीवर. सतत ३ बाई व २ माणसे यांना बारा महिने रोजगार मिळवून दिला. मी फक्त त्यांच्या कडून सर्व कामे करून घेऊ लागलो पण त्यांच्यापेक्षाही मी जास्त वेळ शेतात राहिलो. आंतरपिकातून मजुरी तसेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे बी, खत, सप्तामृत यावरील सर्व खर्च भागविला गेला आणि शेवग्याचे उत्पन्न नफ्यात राहिले. मग मला वेड्यात काढणारे शेजारी माझी स्तुती करायला लागले. पहिल्या वर्षी मी फक्त कल्पतरू खत व सप्तामृतावर जास्त भर दिला. वर्षभरात ३०,०००/- रू. डॉ.बावसकर सरांच्या तंत्रज्ञानावर खर्च झालेला. परिणामी माझे शेत सेंद्रिय बनले व त्यात शेवगा सुद्धा मुळात सेंद्रियच असल्याने शेतीचा पोत सुधारत गेला. सुरुवातीला प्रत्येक पंधरवाड्याला सप्तामृत फवारणी करीत होतो. क्वचित पाने खाण्याऱ्या अळीचे प्रमाणे वाढल्यावर क्लोरोपायरी फॉस अथवा नुवॉनची फवारणी सप्तामृताबरोबर घेत होतो. नोव्हेंबर २०१३ ला सुरू झालेला शेवगा जळगाव व भुसावळ मार्केटला विकला. दर सरासरी ४० रू. मिळाला. मे २०१४ ला खरड छाटणी केली व चवळीचे आंतरपीक घेतले व त्यात मिरचीचे आंतर - आंतरपीक वाढविले व पुन्हा नोव्हेंबर २०१४ ला शेवगा सुरू झाला. तो मार्च २०१५ पर्यंत ५ लाखाचा झाला. नंतर मे २०१५ ला खरड छाटणी करून नोव्हेंबर २०१५ ला शेवगा सुरू झाला व आज रोजी ३ मार्च २०१६ पर्यंत सुरू आहे. ६ लाख रुपये आतापर्यंत व कपाशीचे आंतरपीक २० क्विंटल झालेले आहे. ह्या वर्षी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत तसेच देशी गावरान गाईचे शेण, गोमुत्राचा वापर करून जीवामृत व स्लरीचा उपयोग केला आहे व त्याला कल्पतरू खताची जोड दिल्याने उत्कृष्ट क्वॉलिटीचा माल मिळत आहे.

आतापर्यंत ५०० हून अधिक शेतकऱ्यांनी मला फोन करून सल्ला विचारला आहे व त्या सर्वांची नोंद मी ठेवली आहे. शेतकऱ्यांना मी तत्पर, सविस्तर उत्तरे देतो त्यांची शंका निरसन करतो. त्यामुळे 'सिद्धीविनायक' शेवग्याचा दुत झालो आहे. 'आत्मा' चे जळगाव जिल्ह्याचे उपसंचालक, विविध खात्यांचे अधिकारी, कर्मचारी वृंद यांनी या पथदर्शक प्रकल्पाला भेट देऊन या शेवग्याविषयी तंत्रज्ञानाविषयी व मी केलेल्या प्रयोगाला शाबासकी दिली. शेतकऱ्यांच्या शिबीरात हा शेवगा कसा यशस्वी केला या विषयी मी कथा कथन केले. सदरच्या सिद्धिविनायक शेवगा पिकाविषयी माझा एवढा अभ्यास झाला की, कोणतीही अडचण, शंका मी सविस्तर सोडवू शकतो. सदरचा शेवगा हा सर्वच जातीमध्ये सरस आहे. म्हणून हेच वाण लावा व भरपूर पैसा मिळवा हा माझा शेतकरी बांधवांना सल्ला आहे.

सरांनी सांगितले, "काळ्या जमिनीत शेवगा लावू नये याचे कारण असे, २० वर्षापुर्वी सतत ४ - ५ वर्ष अनेक ठिकाणी विविध जमिनीत प्रयोग केले त्याचे कारण हे पीक देशाला, महाराष्ट्राला नवीन होते. तेव्हा अशा परिस्थितीत काळ्या जमिनीत शाखीय वाढ जास्त झाली. त्याचे कारण त्यावेळचे हवामान अनुकून व पाऊस योग्य असल्यामुळे प्रचलित पाणी पद्धीतेन दांड किंवा आले पद्धतीने आठवड्याला व जेथे ठिबक होते तिथे कंट्रोल पाणी दिल्याने काळ्या जमिनीत पिकाची शाखीय वाढ आनावश्यक जास्त होत असल्याने फुल कमी लागत असे. लागलेले फुल (काळ्या जमिनीला) गरजेपेक्षा जास्त पाणी होत असल्याने टिकत नव्हते. त्यामुळे अपेक्षीत किंबहुना उत्पादनच मिळत नव्हते. अलीकडे मात्र २०१५ मध्ये हवामानातील प्रचंड बदल. मोसमी पाऊस जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यात ५ ते ७ इंच एवढाच होत असल्याने एरवीच्या हलक्या जमिनीस (पिकाला) लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने या अपुऱ्या (अत्यंत कमी) पाण्यावर काळ्या जमिनीची पाणी धारणाशक्ती (W.H.C.) जास्त असल्याने तसेच पावसाळी ढगाळ हवा, हवेतील आर्द्रता पोषक, अधिक उष्णता असली तरी दररोज १० मिनिटे चालविलेल्या ठिबकमुळे जमिनीत हे पाणी मुरून गारवा निर्माण होऊन पिकाभोवतीचे वातावरण अनुकूल राहिल्याने काळ्या जमिनीत हे शेवगा पीक यशस्वी करता आले."

"शेवग्याचे झाड हे संवेदनशील असल्यामुळे व ज्याप्रमाणे तहान लागते तेव्हा पाण्याचे महत्त्व कळते, जेव्हा भूक लागते तेव्हा चटणी व भाकरीची किंमत कळते. या नियम व सिद्धांताप्रमाणे अत्यंत कमी मोजके पाणी दिल्यानंतर माणसाप्रमाणे झाडांना जीव, ज्ञान, संवेदना आणि माणसांच्या विचारांना, कृर्तीना त्यांच्यासमोर १ फुटाच्या आत आपण संवाद साधला तर ते त्यांची प्रतिक्रिया आपल्या विषयी नोदंवितात. त्यामुळे त्यांच्याशी जेवढे आपण प्रेमाने वागू, बोलू त्याचप्रकारे ते साद देतात. याला दुसरा दाखला (Evidence) म्हणजे वैद्य एखादा रोगी निवारणासाठी विशिष्ठ तिथी, वारी जंगलात रोपवाटीकेत रात्री जाऊन त्या आयुर्वेदिक रोपांशी त्याची काढणी करण्या अगोदर त्याला विनंती करून त्या वनस्पतीचे खोड, पाने, मुळे, फुले, फळे काढून उपचारासाठी वापरून त्याचा गुण येतो. जसे लहान मूल भुकेने व्याकूळ झाले व रडायला लागले म्हणजे आई त्याला जवळ घेऊन त्याला मायेची ऊब देऊन अंगावर पाजते आणि त्याचा चेहरा काही क्षणामध्ये निरागस, त्याच्या डोळ्यातून हास्याचे तेज आणि हसताना प्रकट होणार खोडकर कृष्णाचा भाव व हास्य पाहून आईचा प्रेमाने उर दाटून येतो व तिला कृतकृत्य वाटते. आईच्या वात्सल्याने गुलाबाच्या फुलासारखा प्रसन्न चेहरा आणि त्याच्या डोळ्यातील प्रतिक्रिया बघून आपले सारे. कष्ट, श्रम विसरून चेहरा खुलतो हेच समीकरण खरा जातीवंत शेतकरी आपल्या भुमातेशी आणि पिकांशी (झाडांशी) जपतो आणि हा सूर एकमेकांत मिळाला म्हणजेच मळे फुलतात, अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिकूल परिस्थितीत ज्या यशोगाथा साऱ्या जगभर प्रसिद्ध होतात तेथे या समिकरणाची प्रचिती हमखास येतेच !"

सर "सिद्धिविनायक शेवग्याचा हा अत्यंत कमी पाण्यावरील प्रयोग इस्राईलपेक्षा अधिक यशस्वी झाला. म्हणून शेतकऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीत धीर न सोडता, त्याचे राजकारण न करता या राजकारणात गर्भगळीत न होता, दु:खाच्या गर्तेत न ओढता, जखमेवर मीठ चोळून त्याचा अंगार (विस्तव) न करता त्याचे सांत्वन, धीर व प्रेरणा याचे गुलाब पाणी प्रेमाचे चंदनाचे उटणे त्यांच्या अंत: करणावर थेट शिंपडून त्यांचे जिवन पुलकित करणे हाच खरा मानवधर्म आहे. जे सत्ताधारी जगातील सर्व देशात आपली सत्तेची मिरासदारी दिर्घकाल मिरवतात आणि जेव्हा पाया खालची वाळू सरकल्यावर आणि आत्मविश्वास कमी झाल्यावर आपोआपच उदाहरणार्थ हेलिकॉप्टरचे पंख मिटून जसे हेलिकॉप्टर जमिनीवर धुराळा उडून आदळते आणि ज्योत विझताना जशी मोठा प्रकाश पाडून विझते त्याप्रमाणे सत्तेचे पंख निखळून पडल्यावर त्या पराभवाची खंत जाणवते त्या खंतेला सामोरे जात येत नाही. सहन होत नाही आणि मग काळाचा विरोधी पक्ष होतो. विरोधी पक्ष जनतेच्या कृपेने सत्तेवर येतो, त्यामुळे जगातल्या सर्व देशांनी मानव कल्याणासाठी आणि मानवतेसाठी प्रयत्न व कृती केली तर धर्म, पंथ एक होऊन मानवाचा द्वेष नष्ट होऊन अरविंद घोष व स्वामी विवेकानंद यांनी सांगितल्याप्रमाणे धर्म आणि पंथ हे एकाच आत्माच्या दोन बाजु आहेत म्हणून सर्व मानव जात आत्मदृष्टीने निट आचरण करून वागली तर सर्व पवित्र आत्मे येशु, आल्ला (महंमद), राम, गुरु गोविंद सिंग, इस्रोत राष्ट्र (पारशीगुरू), खोजा (अगाखान) आणि गौतम बुद्धांना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्म्याला शांती मिळेल व ते समाधानाचा पाऊस पाडतील आणि सैबेरिया, राजस्थान, थरचे वाळवंट हे त्या पावसाने सुजलाम सुफलाम होतील. कारण जगातील प्रत्येक देशमध्ये याच्याहून अधिक बिकट परिस्थिती येतात व तेथील सरकारे, सत्ताधारी विरोधी होतात व विरोधक सत्ताधारी होतात तरीही संसदेचे कामकाज नीट चालल्याने देशाचे सुकाणू व्यवस्थीत चालावे, देशाला यशावर न्यावे या मानवतेच्या भुमीकेतून वागत असल्याने तेथे प्रतिकूल परिस्थितीतही मानवता वादातून प्रगतीचे चाहूल लागते पण जिथे मानवतेला माणूस ओळखत नाही, माणसाला माणूस समजत नाही, माणुसकी कळत नाही तेथे हिंसाचार होवून मानवतेचा विकास खुंटतो व माणुसकीला काळींमा लागतो अशी उदाहरणे अनेक राष्ट्रांमध्ये जगभर दिसत आहेत आणि त्यामुळे अर्ध्याहून अधिक जगाची अर्थव्यस्था ही ढासळली नव्हे तर जमिनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे. याची कृपया साऱ्या जगणे नोंद घ्यावी. कारण पुढच्यास ठेच व मागचा शहाणा याप्रमाणे विकसनशील अविकसीत व विकसीत राष्ट्रांनी याचा धडा घ्यावा." सर