एरवी रोगामुळे कारली पीक बंद करून परत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने सुरू करून ३० गुंठ्यात १ लाख

श्री. गणपतराव जोगजी भुरले,
मु.पो. सावळी, ता. हिंगणा, जि. नागपूर,
मो. ९५५२९०९४४७


माझ्याकडे एकूण ९।। एकर शेती आहे. त्यामध्ये मी कापूस, सोयाबीन, तूर तसेच भाजीपाला पिकामध्ये वांगी, चवळी, काकडी अशी पिके घेत असतो. वेलवर्गीय पिकामध्ये पहिले मी कारली लागवड करत असे., मात्र गेल्या ३ - ४ वर्षापासून कारली पिकावर व्हायरस या रोगाचा प्रादुर्भाव खुप मोठ्या प्रमाणात होत असल्याने कारली लागवड बंद केली व कपाशीखालील क्षेत्र वाढविले. मागील वर्षी मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्यास सुरुवात केली. पुर्वी आमच्या भागात मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. मग आम्हाला राहून कुकडे (मो. ७५०७५०३११७) हे कंपनी प्रतिनिधी आहेत असे समजले. तेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने थोडी कारली व काकडी लागवड केली. जमीन मध्यम प्रतिची असून २।। x १ फुटावर लागवड केली आहे. नंतर मी प्रतिनिधींना पुन्हा संपर्क साधला आणि शेतावर बोलावून घेतले. त्यानंतर प्रतिनिधींनी प्लॉटवर येऊन काकडी, कारली व कपाशी पिकाची पाहणी करून कारल्यावर व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवतोय असे सांगून पहिली फवारणी थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + न्युट्राटोन ४० मिली + हार्मोनी ३० मिली / पंप (१५ लि. पाणी) लिहून दिली. तसेच कपाशीवर कॉटन थ्राईवर ५० मिली + क्रॉपशाईनर ५० मिली + किटकनाशक यांची फवारणी करण्यास सांगितले. या प्रमाणे मी फवारणी केली असता ५ - ६ दिवसांनी कारली पिकावरील व्हायरस ५०% पेक्षा जास्त कमी झाला होता. त्यानंतर २ - ३ दिवसांनी कुकडे शेतावर आले. तेव्हा कारली पिकची पाहणी केली असता व्हायरस पुर्ण गेलेला होता. त्यानंतर पिकाच्या वाढीसाठी त्यांनी दुसरे फवारणी थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + प्रिझम ३५ मिली + न्युट्राटोन ४० मिली + १५ लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करण्यास सांगितले. त्याप्रमाणे फवारणी केली असता पिकाची जोमदार वाढ झाली. त्यानंतर फुलकळी लागताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५०० मिली, हार्मोनी २५० मिली १५० लि. पाण्यातून फवारले. त्यामुळे फुलगळ आटोक्यात राहून फळधारणा चांगली झाली. नंतर माल पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोन फवारले. त्यामुळे मालाचे तोडे लवकर सुरू झाले.

आठवड्यातून दोन तोडे करत होतो. तोड्याला ५ - ६ मण (४० किलोचा मण) कारली उत्पादन मिळत होते असे ऑगस्ट - सप्टेंबर या दोन महिन्यात एकूण २० तोडे झाले. एकूण ४ टन उत्पादन मिळाले. सर्व माल कळमणा (नागपूर) मार्केटला विकला. २५ ते ३० रु. किलो भाव मिळाला. असे ३० गुंठ्यातून १ लाख रुपये उत्पन्न मिळाले. या कारल्याला मंडपाचा (तार - बांबु) खर्च १० हजार रु. आणि औषधे, खते, मजुरीचा २० हजार रु. असा एकूण ३० हजार रु. खर्च आला.

शायनी काकडीस डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी प्रभावी

शायनी काकडी १ एकरमध्ये १५ जानेवारी २०१७ ला लावली आहे. जमीन मध्यम प्रतीची असून लागवड २ १ वर आहे. पाणी पाटाने देतो. याला मांडव नाही. ३ - ४ दिवसाला फवारण्या घेतो. एकूण १० फवारण्या झाल्या आहेत. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ६ फवारण्या केल्या आहेत. प्लॉट पुर्णपणे निरोगी असून पुढील २ - ३ दिवसात तोडा चालू होईल.

कॉटन थ्राईवर व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने कपाशीचे १४ क्विंटल उत्पादन

कापसावर फुलपात्या लागताना तसेच बोंडे पोसताना कॉटन थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोनच्या फवारण्या केल्यामुळे मला एकरी १४ क्विंटल कापूस उत्पादन मिळाले.