गोल्ड मेडॅलिस्ट डेंटिस्ट डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने परसबागेत उत्कृष्ट फळबाग करतात

डॉ. भास्कर सालके, पुणे.
मो. ९८२२६१६८४५


गेली ३५ वर्षापासून मी डेंटल स्पेशालिस्ट आहे. मुंबईला पदवी मिळाली. माझे आई - वडील शेतीच करीत होते. मलाही शेतीची आवड आहे. गेली १० वर्षापासून मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी माझ्या पुण्यातील परसबागेत वापरत आहे. शेती जवळा, ता.पारनेर, जि. अहमदनगर येथे आहे. परसबागेत आंबा (४ झाडे), चिकू, फणस, काजूची झाडे आहेत. मोहोर येण्याअगोदरपासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी फवारतो. त्यामुळे हापूस आंब्याला पुर्वी वर्षाआड लागणार मोहोर आता दरवर्षी लागून आंबा दरवर्षी मिळू लागला आहे. फळांची साईज व उत्पन्नही वाढले. फळांची चवही अधिक गोड मिळते. पुर्वी आंबे लागत नव्हते तेव्हा इतर औषधे वापरून पहिली, मात्र अपेक्षित रिझल्ट केव्हाच मिळाला नाही. डॉ.बावसकर तंत्रज्ञान हे अतिशय प्रगत व फायदेशीर आहे असे लक्षात आले.

या तंत्रज्ञानाने कागदी लिंबाला फळांचे ओझे पेलवत नाही. एवढी फळे लागतात. म्हणून त्यांना डेंग्या लावतो. पहिला बहार जाईपर्यंतच दुसऱ्यांदा मोहोर आलेला असतो. लिंबाचे आम्ही उत्कृष्ट लोणचेही करतो. नातेवाईकांना १० - १०, २० - २० लिंबू देऊन तेही त्याचे लोणचे करतात. फणसाला ५० - ६० फळे येतात. चिकूला वर्षातून २ वेळा भरपूर फळे येतात. १५ वर्षापुर्वीचे चिकू झाड आहे. आंब्याची (फळांना) लोक आवर्जुन मागणी करतात. 'कृषी विज्ञान' मासिक वाचल्यानंतर शेतीची गोडी निर्माण झाली. १० वी पर्यंत जवळ्यात गावी शिकल्याने शेतीची बेसीक माहिती आहे. परस बागेतील झाडांना आठवड्यातून एकदाच पाणी देतो. बंगल्यामध्ये परसात जी झाडे लावली जातात, त्याला लोक दररोज पाणी देतात ते चुकीचे आहे. झाडांना त्यांच्या गरजेनुसार मोजकेच पाणी द्यावे.