डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे वापराने बाग निरोगी कळी चांगली व भरपूर, गारपिटीतही ७ टन डाळींब, जागेवर ७० ते ८० रू./किलो भाव

श्री. संपत भिकाजी गाडीलकर,
मु.पो. गाडीलगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर,
मोबा. ९८८१९६८४९०


डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे गेल्यावर्षी डाळींब पिकास वापरली. कमी खर्चात मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा झाला. मी सुरुवातीला बहार धरताना जर्मिनेटर, प्रिझम व किटकनाशका ची फवारणी केली. त्यामुळे मोठ्याप्रमाणात एकसारखी फुट निघाली. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम या औषधांची दुसरी फवारणी केली. तर ५ ते ६ दिवसात फुलकळी मोठ्या प्रमाणात निघाली. कळी देखील मोठी टपोरी होती. तापमान अधिक असूनदेखील थ्राईवरमुळे गळ बिलकूल झाली नाही. त्यानंतर पावसाळा चालू झाला. लोकांच्या बागेवरील फळांवर काळे डाग, फळकूज, अँथ्रॅक्नोज असे बुरशीजन्य रोग दिसू लागले. त्याचा प्रादुर्भाव वाढून आमच्या बागेकडेही त्याचा परिणाम दिसू लागताच मी अहमदनगरला जाऊन रोहन सिडसमधून थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी ५ लि. आणले व त्याची फवारणी प्रत्येक १० दिवसाच्या अंतराने करत राहिलो. जेणेकरून बुरशीचा प्रादुर्भाव कमी होईल.

बागेमध्ये पाणी साठत असल्याने मर रोग, मुळकूजची समस्या उद्भवू लागली. तेव्हा मी जर्मिनेटर /एकरी १ लि. ठिबकद्वारे सोडल्याने मर रोग व मुळकूजचा प्रादुर्भाव झाला नाही. तरी खबरदारी म्हणून प्रिझम व जर्मिनेटरसोबत कॉपरऑक्झिलोराईड १ किलोची २०० लि. पाण्यातून आळवणी ठिबकमधून व फवारणीतून करण्यास सरांनी सांगितले.

सप्तामृताच्या एकूण फळ काढणीपर्यंत ७ फवारण्या केल्या होत्या. सेटिंगच्यावेळी प्रत्येक झाडावर ७० - ८० फळे होती. त्यांचे वरील फवारण्यामुळे पोषण होऊन ४०० ते ५०० ग्रॅम पर्यंत फळांची साईज झाली. सेटिंग अवस्थेत गारपीट होऊनदेखील एकरी ७ टन माल निघाला. तो जागेवरून ५० ते ७० रू./किलोप्रमाणे प्रतवारीनुसार गेला. त्याचे खर्च वजा जाता एकरी ३ लाख रू. उत्पन्न मिळाले.