अधिक पावसातील खरबूज, खर्च ५० हजार, उत्पन्न १।। लाख

श्री. संभाजी रामचंद्र बंडगर,
मु.पो. कटकळ, ता. सांगोला, जि. सोलापूर.
मोबा. ९६०४४९५३५१आम्ही नामधारी २२५ जातीच्या खरबुजाची लागवड केली असून त्याचे अंतर १० x १।। फूट ठेवले आहे. या खरबुजाचे उत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने घेण्यासाठी वापर करण्याचे ठरविले. सुरुवातीला जर्मिनेटरच्या वापराने खरबुजाची उगवण चांगली व लवकर झाली. पुढे सप्तामृताच्या नियमित फवारण्यामुळे वेलांची वाढ निरोगी होऊन फळधारणा चांगल्याप्रकारे झाली. फळे पोसण्यासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर, न्युट्राटोनचा वापर केल्यामुळे फायदा झाला. मालाचा तोड करण्याच्यावेळी अचानक पाऊस होऊनदेखील फळांचे नुकसान झाले नाही. हे खरबूज ऐन रमजान महिन्यात काढणीस आल्यामुळे बाजारभाव अधिक मिळाले. एकरी १५ टन उत्पदान मिळाले. आंध्रचा माल मार्केटला येत असूनदेखील आमचा माल उत्कृष्ट असल्याने वाशी मार्केटला १ नंबर भावाने खरबुज विकले गेले. त्याचे १ लाख ५५ हजार रू. एकूण उत्पन्न मिळाले. खरबुज लागवडीपासून ते मार्केटला येईपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यासह एकूण खर्च ५० ते ५५ हजार रू. आला. सप्तामृताच्या वापरामुळे रोगराई आटोक्यात राहिली. तसेच इतर औषधांवरील खर्चही कमी झाला. फळे काढणीच्यावेळी अवकाळी पाऊस होऊनदेखील खरबुज प्लॉट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांमुळे वाचला. त्यामुळे इतर पिकांना देखील हे तंत्रज्ञान वापरतो आहे.

थंडीतील १ एकर काकडी २ लाख ४० हजार

काकडीची लागवड थंडीच्या दिवसात १ एकर क्षेत्रात केली होती. तिलादेखील खरबुजाप्रमाणे सप्तामृताच्या फवारण्या घेत होतो. त्यामुळे ऐन थंडीतदेखील वेलांची वाढ जोमाने होऊन फुलकळी व फळधारणा भरपूर झाली. राईपनर, न्युट्राटोनच्या वापरामुळे काकडीचे उत्पादन भरघोस आले. तोड्याला १ ते १।। टन काकडी निघत असे. प्रिझममुळे फुट होऊन नवीन फुलकळी चालूच होते. ही काकडी बार्शी मार्केटला विकत असे, तर बाजारभाव १५ रू. पासून २५ रू. पर्यंत मिळाल्याने २ लाख ४० हजार रू. १ एकरातून झाले.