२० गुंठ्यातून ३२ टन ऊस

अॅड. देविदास शंकरराव खिलारे,
मु.पो. सोनवडी (बु.), ता. फलटण, जि. सातारा.
मोबा. ९६२३३००४२७


मी ८६०३२ उसाची आडसाली लागवड जुलै २०१२ ला केली होती. या उसाला बेणेप्रक्रियेच्यावेळी जर्मिनेटर वापरल्यामुळे उगवण लवकर होऊन पुढे फुटवे भरपूर फुटले. उसाला कल्पतरू सेंद्रिय खताच्या २ बॅगा दिल्या. इतर कोणतेही रासायनिक खत वापरले नाही. दोन महिन्याचा ऊस असताना सप्तामृताची १ फवारणी केली. त्यानंतर केणतीही फवारणी केली नाही. मात्र प्रत्येक पाण्याच्या वेळी पाटाने देशी गाईचे १० किलो शेण + २ लि. गोमुत्र + १ किलो काळा गूळ यांचे एकत्र १०० लि. पाण्यात जिवामृत तयार करून पाण्यावाटे देत होतो. एवढ्यावर उसाची १५ महिन्यामध्ये १५ फूट वाढ झाली. उसाच्या कांड्यातील अंतर वाढले. एका उसाला २८ पासून ३२ - ३५ कांड्या होत्या. कांड्यांची जाडी वाढली. हा ऊस कारखाना चालू झाल्यावर फलटणच्या श्रीराम सहकारी साखर कारखान्याने सप्टेंबर २०१३ मध्ये नेला. २० गुंठ्यातून ३२ टन ऊस मिळाला. त्याचा पहिला हप्ता २००० रू./टनाने मिळाला. अजून ५०० रू./टनाचा फरक निघेल असे वाटते.