३ महिने अगोदर लावलेल्या पपईपेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने वाढविलेली पपई सरस !

श्री. जगन्नाथ पांडुरंग भांडवलकर (B.A., B.P.Ed),
मु.पो. वाटेफळ, ता. परांडा, जि. उस्मानाबाद.
मो. ९४२३५८४९०३


मी ' कृषी विज्ञान' मासिकाचा वाचक असून गेल्यावर्षी किसान कृषी प्रदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे पपईचे पुस्तक घेऊन गेलो. त्या माहितीच्या आधारे ३ मार्च २०१४ रोजी तैवान ७८६ पपईची लागवड साधारणपणे २ एकर मध्यम भुरकट मातीच्या रानात ७' x ५' वर केली. रोपे संग्राम नर्सरी, वालवड (ता. भूम) येथून आणली. लागवड करताना जर्मिनेटरचे द्रावण रोपावरून सोडले. त्यानंतर आठवड्याने पुन्हा जर्मिनेटरची ड्रेंचिंग केली. त्यामुळे लागवड केलेल्या २००० झाडापैकी फक्त ४ - ५ झाडे सोडली तर सर्व जगली. इतर सर्व रोपे सशक्त व निरोगी वाढीस लागली. त्यानंतर १५ - २० दिवसांच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत औषधांच्या २ फवारण्या केल्या. त्यामुळे २ महिन्याच्या काळापर्यंत बागेची वाढ कंबरेबरोबर झाली. पाने हिरवीगार, पिकावर काळोखी होती. इतरत्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी पपईवर न वापरल्याने व्हायरसचा प्रादुर्भाव जाणवत असताना आपली फवारणी जोपर्यंत होती तोपर्यंत आमची बाग कडक उन्हाळ्यातही निरोगी होती.

त्यानंतरच्या पुढील फवारण्यासाठी कुर्डुवाडीतील दुकानदाराकडे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या औषधांमधील न्युट्राटोन ची मागणी व्हायरस प्रतिबंधासाठी केली, मात्र ते त्यांच्याकडील दुसरीच औषधे दाखवत. व्हायरससाठी हीदेखील औषधे चालतात असे सांगत. मात्र ती न घेता मी दुकानातून २ वेळा परत जाऊन पुन्हा फोनवरून किमान ५० ते ६० वेळा संपर्क साधून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे न्युट्राटोन आले आहे का ? विचारले. तर यावर ते मार्चएंड आहे अद्याप आले नाही. अशी करणे सांगू लागले. मग मी त्यांचा नाद सोडून थेट डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाशी संपर्क साधला. तेथून मला सांगण्यात आले की, तुम्ही बँकेमध्ये पैसे भरा म्हणजे एस. टी.पार्सलने औषधे आपणास पाठविता येतील.

या सर्व घटनेमध्ये दिड महिन्याचा काळ लोटला. त्यामध्ये डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी घेऊ न शकल्याने सध्या १० -१२ झाडांवर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. आज (२० जून २०१४) पाहुण्यांकडे पुण्याला आलो असता. खास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ऑफिसमध्ये येऊन सविस्तर माहिती व सरांच्या मार्गदर्शनानुसार थ्राईवर ३ लि., क्रॉपशाईनर ३ लि., न्युट्राटोन २ लि., प्रोटेक्टंट २ किलो, हार्मोनी ६०० मिली, स्प्लेंडर ६०० मिली ४०० लि. पाण्यातून फवारण्यासाठी तसेच २ एकराला ड्रेंचिंगसाठी जर्मिनेटर २ लि. घेऊन जात आहे.

गावातील एका शेतकऱ्यांने रमजानचे मार्केट पकडण्यासाठी डिसेंबर २०१३ मध्ये पपई लावली आहे. मी ३ मार्च २०१४ ला म्हणले ३ महिन्यांनी उशीरा लावली आहे. तरी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पहिल्या २ महिन्यातील वापरामुळे त्यांच्या ६ महिन्याच्या पपईपेक्षा सरस दिसत आहे.

परांडा तालुक्यात पाचपिंपळा हे गाव असून तेथे ९०% म्हणजे जवळपास ३०० ते ४०० एकर क्षेत्रावर पपई लागवड पहावयास मिळते. तेथे अद्याप या तंत्रज्ञानाची माहिती नाही. तेव्हा त्यांना मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती दिली.

आज रोजी ३।। महिन्याचा हा प्लॉट डोक्याबरोबर असून बुंधा पायाच्या पोटरीपासून मांडीच्या आकाराचा आहे. विशेष म्हणजे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरल्यामुळे ५५ दिवसात पहिली फुलकळी दिसली. आता १० - १२ झाडांवर लहान फळे लागली आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील फवारण्या घेऊन उत्पादनात लाक्षणिक वाढ करणार आहे. "सध्या कळी लागून फळधारणेचा काळ असल्यामुळे ठिबक ३ - ४ लि. चा डिस्चार्जप्रमाणे दिवसाआड ३ -४ तास पाणी देणे, तसेच ७ फुटाच्या मधल्या पट्ट्यात झेंडूची रोपे लावणे, त्याने सूत्रकृमी तसेच किडरोगासही प्रतिबंध होण्यास मदत होते. हे तंत्रज्ञान वापरण्यात मधे १।। महिन्याचा खंड जर पडला नसला तर ऑगस्टमधील रमजान आपण पकडू शकलो असतो. पण काही हरकत नाही आता जरी बाग थोडा उशीरा (रमजाननंतर) सुरू झाला तरी उत्पादनात व दर्जात आपण वाढ करून हा बाग २ वर्षापर्यंत सहज चालवू." असे सरांनी सांगितले.