संत्रा बाग गारपिटीत सापडून मालाचा आकार लहान, २१० क्रेट ७० हजार रू.

श्री. मदनलाल चांदमल मुथ्था,
मु.पो. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे.
मोबा. ९८९०९२४९२९


संत्र्याची २ एकरमध्ये १३ x १३ फुटावर २५० झाडे ७ वर्षाची आहेत. त्याचा बहार जून २०१३ मध्ये धरला. मार्च ते मे २०१३ अखेर ताण दिल्यानंतर जुनमध्ये पाणी दिले. पाणी देण्यापुर्वी झाडे टाचाळून (चाळणी करून) खते (कल्पतरू १ किलो, शेणखत १ पाटी) दिले व पाणी सोडले. नंतर जर्मिनेटर ची ड्रेंचिंग केली. तर २५० ते १०० झाडाला १५ दिवसात फूट चांगली निघाली. गेल्यावर्षी पाऊस भरपूर असल्याने झाडे लवकर फुटली. फुटीवर सप्तामृत फवारल्याने पहिले पाणी दिल्यानंतर २१ दिवसात फुटीला कळी दिसू लागली. आठवड्याला पाट पाणी देत होतो. कळीला माशी लागू नये म्हणून बाजारातील किटकनाशक फवारले होते. त्याने माशीचा बंदोबस्त झाला, मात्र कळीगळ व्हायला लागली. म्हणून दुसरी फवारणी सप्तामृताची लगेच केली. तर आठवड्यात गळ थांबली.

त्यानंतर १८:४६ खताच्या २ गोण्या आणि दाणेदारच्या २ गोण्या २५० झाडांना दिल्या व पाणी आठवड्याला देत होतो. तर फळांचे सेटिंग होऊन फळे पोसू लागली. झाडावर १५० ते २०० फळे होती. १५ डिसेंबर २०१३ नंतर माल सुरू झाला. फळाचे वजन १०० - १५० ग्रॅम होते. १ किलोत ७ - ८ फळे बसत. ५०% फळे १५० ग्रॅमची आणि ५०% फळे १०० ग्रॅमची होती.

गेल्यावर्षी गारपिटीचा फटका इतरत्र बसत होता. त्या बातम्या ऐकून झाडावरील शेवटचा माल कच्चा असतानाच काढला. त्यामुळे म्हणावी तशी साईज मिळाली नाही, हवामान दुषीत होते. आमचा देखील शेवटचा काही माल गारपिटीत सापडला. गारपिटीने फळांवर लालसर, काळपट डाग पडत होते. त्यामुळे भाव कमी मिळत असे.

सुरूवातीचा माल पुणे मार्केटला २०० ते ३०० रू. पासून ५०० रू./क्रेटपर्यंत भाव मिळाले. क्रेटमध्ये मोठी ८ डझन व लहान १० -११ डझन फळे बसत होती.

एकूण २१० क्रेट माल निघाला. त्यापासून ७० - ८० हजार रू. झाले. याला एकूण खते, औषधे, चाळणी, फळे तोडणी असा ४० हजार रू. खर्च झाला. गेल्यावर्षी २५० पैकी १०० झाडांनाच माल लागला होता. आता गेल्यावर्षी न फुटलेली १५० झाडे फुटली आहेत. मात्र गेल्यावर्षी फुटलेली झाडे आता फुटली नाहीत. यासाठी आज (१५ जुलै २०१४) जर्मिनेटर ५ लि. प्रिझम १ लि., थ्राईवर १ लि. आणि हार्मोनी ५०० मिली घेऊन जात आहे.