सतत १५ वर्ष डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा अनेक पिकांना वापर

प्रा. श्री. सोपान निवृत्तीराव कोल्हे. M.Sc (Physics),
सारोळा बु॥, ता. जि. उस्मानाबाद.
मोब. ९४२१८७५४१३


४ वर्षापुर्वी ६०० झाडे केशर आंब्याची १५' x १५' वर लावली आहेत. जमीन काळी कसदार आहे. पाणी ठिबकने देतो. शेणखत आणि कल्पतरू सुरुवातीला वापरले. सप्तामृत दरवर्षी २ फवारण्या ऑगस्ट व जानेवारीत करतो.

कल्पतरू सप्तामृत फळ १ महिना लवकर स्वाद, सुगंध, गोडी व भाव उत्तम !

४ वर्षानंतर पहिला बहार धरला. ५००० फळे मिळाली. घरी फळे पिकल्यानंतर घरूनच विक्री झाली. ६० रू. किलो भावाने विकली. आंबे संपले तरी लोकांची मागणी होती. कारण फळांना स्वाद व गोडी अतिशय चांगली होती. किलोमध्ये ३ ते ४ फळे बसत.

पुढे आंब्याच्या झाडाला आळे करून कल्पतरू सेंद्रिय खत, शेणखत घालून सप्तामृताचे कमीत कमी ३ फवारण्या करण्याची योजना आहे. यामुळे फळे पुर्ण पोसून १ महिना लवकर काढणीस येतात व दरवर्षी फळधारणा होऊन फळांचा स्वाद, सुगंध आणि गोडी अप्रतिम मिळते व पिकलेली फळे जास्त दिवस टिकतात असा अनुभव आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रॉडक्टस गेल्या १५ वर्षापासून तूर, सोयाबीन, उदीड, मूग, ज्युट, गहू, हरभरा, ज्वारी, वांगी, टोमॅटो या पिकांवर वापरून चांगले उत्पदान घेतले आहे.

६ एकर क्षेत्रात सोयाबीन व तूर ४:२ याप्रमाणात पेरल्यानंतर सोयाबीन ४५ क्विंटल व तूर ३५ क्विंटल. मिळाली. सप्तामृतासोबत किटकनाशक व बुरशीनाशकाच्या फवारण्या घेतल्या आहेत. बीजप्रक्रिया जर्मिनेटरची केल्याने सर्व प्रकारचे बियाणे लवकर उगवते. उगवण क्षमता ७० % हून ९५% पर्यंत वाढते. असा अनुभव आहे.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी लागवडीचे नियोजन

आता चालू वर्षाच्या रब्बी हंगामात ग्रॅण्ड नैन केळी ३ एकर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावण्याचे नियोजन आहे. केळीत सुत्रकृमीचा प्रादुर्भाव होऊ नये. याकरीता झेंडूची झाडे केळीमध्येच लावण्याचे ठरविले आहे.