डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणारा मी शेतकरी पुर्वा कंपनी किताब बहाल करी !

श्री. बाळसाहेब महादु साळवे, मु. साबळेवाडी, पो. टाकळी, हाजी, ता. शिरूर, जि. पुणे.

मी गेली अनेक वर्षे वडिलोपार्जीत शेती करत असून त्यामधुन मुख्यत्वेकरून धना व मेथी पिकांचे उत्पादन घेत असतो. धना व मेथी ही पिके अल्प कालावधीत येणारी असल्याने ती अतिसंवेदनशिल स्वरूपाची आहेत. उन्हाळ्यात धना व मेथी या पिकांची मोठ्या प्रमाणात मर होत असे. मर होऊ नेये म्हणुन मी ह्युमिक अॅसीड चा वापर करत होतो. त्याचे साधारण रिझल्ट आम्हाला मिळत होते. मात्र धना व मेथी मंचर मार्केटमध्ये विक्रीसाठी नेत असल्याने तेथील मे. थोरात कृषी भांडाराचे मालक अॅड.श्री. सुधाकर थोरात यांनी मला जर्मिनेटर वापरण्याचा सल्ला दिला. सुरुवातीस मी ५०० मिली जर्मिनेटर घेऊन गेलो व रिझल्ट अनुभवला तर भाजीची मर न होता जोमाने वाढ झाली. हा ह्युमिकपेक्षा जबरदस्त रिझल्ट आम्हाला मिळाला. तसेच भाजी काढतेवेळी भाजीच्या मुळांवर पुर्णपणे मोठ्ये प्रमाणात अधिक पांढऱ्या मुळ्या वाढलेल्या दिसल्या. त्यानंतर भाजीला काळोखी येण्यासाठी व पाने पसरट बनण्यासाठी मी थ्राईवरचा वापर करू लागलो. धन्यासही जर्मिनेटर वापरत असुन चकाकी व सुगंध येण्यासाठी क्रॉंपशाईनर प्रत्येक फवारणीत वापरतो.

याच टेक्नॉंलॉजीच्या वापरामुळे मला "पुर्वा कं नाशिक" हिने "सेवर प्रगतशिल शेतकरी पुरस्कार २०१०-११" हा बहाल केला.

धना व मेथी पिकाच्या उत्पादनाविषयी प्रत्येक फवारणीत थोरात कृषी भांडारचे प्रतिनिधी श्री. जयसिंग वाळुंज यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Related New Articles
more...