प्रतिकुल परिस्थितीत लागवडी (पेरण्या) यशस्वी होण्यासाठी जर्मिनेटरसोबत प्रिझम अतिशय प्रभावी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


देशभर व महाराष्ट्रात चालू मोसमी हंगामात थोडासा (सरासरी ६० % ते ७० %) काही भागात पाऊस वेळेवर पडला, मात्र नंतर अधिक काळ ताण दिला, तर काही भागात पाऊस पडलाच नाही यामध्ये खरीप हंगाम वाया जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर किंवा पाऊस पडेल आणि उत्पादन मिळेल या आशेने सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस अशा पिकांची पेरणी केली, मात्र वरील समस्या कायम राहिल्याने सुरूवातीच्या पावसानंतर केलेल्या पेरणीतील बी उगवल्यानंतर पावसाने ओढ दिल्याने मेले. तर काही ठिकाणी पेरणी वेळी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने बी रानातच वाया गेले. यामध्ये मुळातच बियाण्याची उगवण शक्ती कमी असणे, शिफारशीप्रमाणे ७५ ते १०० मिमी उगवणीस आवश्यक पाऊस नसणे, बियाणे अर्धवट ओलीवर पडणे, किड्यांनी खाणे अशा समस्यांमुळे पेरणी वाया जाते. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येते, तसेच यामध्ये बियाण्याचे प्रमाण कमी झाल्याने बियाणे वेळेवर उपलब्ध होत नव्हते. जेथे होते तेथे अधिक भावाने खरेदी करावे लागत होते. अशा एक न अनेक समस्यांना प्रतिकुल परिस्थितीत पेरण्या वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

अशी बिकट परिस्थिती टाळण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे 'प्रिझमचा' वापर करणे फायदेशीर ठरते. याकरीता बीजप्रक्रियेस जर्मिनेटर १५ ते २० मिली सोबत प्रिझम २० मिली प्रति लि. पाण्यास घेतल्यास पेरणीनंतर पावसाचा ताण बसला तरी रोप तग धरते, तर पेरणीनंतर पाऊस मर्यादित काळात उशीरा झाला तरी बी आहे त्या अवस्थेत राहून नंतर पाऊस झाल्यावर उगवते. असा देशभरातील शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे बियाणे, वेळ निविष्ठांचा खर्च वाचतो. मशागतीचा खर्च वाचतो. हंगाम व्यवस्थित वेळेवर सापडून काहीही उत्पन्न न येता हंगाम वाया न जाता अपेक्षेच्या ५० ते ८० % उत्पादन हमखास मिळते. मात्र त्यासाठी वेळच्या वेळी सल्ला तसेच योग्य निविष्ठांचा व शिफारशींचा वापर करणे अत्यावश्यक असते.

फुले, फळे, कापसाची बोंडे तृण व कडधान्य, तेलबियांच्या शेंगा पोसण्यासाठी 'न्युट्राटोन' चा वापर करावा. पावसाचा ताण पडल्यानंतर रोपाचा शेंडा सुकतो, जमीन घट्ट होते. मुळी सुकते अशा वेळी थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी फायदेशीर ठरते. रोपे अधिक काळ तग धरतात. पाण्याचा ताण सहन करतात. जर्मिनेटर व प्रिझम चे ड्रेंचिंग (आळवणी) आमच्या तज्ञामार्फत सल्ल्याने शिफारस घेऊन केल्यास पांढरी मुळी प्रतिकुल परिस्थितीतही वाढून पाण्याचा खोलपर्यंत शोध घेते.

ज्यावेळी पाऊसमान कमी असते तेव्हा झीमझीम (बुरंगट) पाऊस असतो तेव्हा सोयाबीन तसेच इतर पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा सप्तामृतासोबत 'हार्मोनी' चा वापर करावा म्हणजे भुरी, डाऊनी, करपा, तांबेरा या रोगांना प्रतिबंध होऊन जेथे १०% ही उत्पन्न मिळण्याची शक्यता नसते तेथे ५० % हून ८०% पर्यंत उत्पदान मिळूशकते. असे अनुभव शेतकऱ्यांनी घेतले आहेत.

श्री. बिभीषण अंबादास मुळे , तेर, जि. उस्मानाबाद, मो. ९४०४९६१८६३ यांचा २००५ मध्ये झेंडू बियाणे फेल गेल्याने उत्पदान शुन्य टक्के मिळेल म्हणून बियाणे कंपनीचे २५ हजार रू. नुकसान भरपाई दिली. मात्र यातील जो झेंडू आला त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा सप्तामृताचा शिफारशीप्रमाणे वापर केला असता ७५,००० रुपये झाले. त्यांची दोन एकर पपई (तैवान ७८६) ७ महिन्याची असून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून ७ व्या महिन्यात १ ते १।। किलोची ५० फळे झाडावर आहेत. रमजानचे १५ दिवस सापडतीलच. म्हणून इतर सल्ल्यासाठी सरांना फोन करून (२४-७-११ ला सकाळी ११ वा. ) वरील अनुभवही मोठ्या आनंदाने सांगितला. असे अनेक अनुभव 'कृषी विज्ञान' मासिकातून आपणास प्रेरणा देतील.