५० गुंठे टोमॅटो - १ लाख रू. नफा

श्री. सोमनाथ गेणू नेहे,
मु. पो. सावरगाव, ता. संगमनेर, जि. अहमदनगर. पीक -टोमॅटो, क्षेत्र - ५० गुंठे


टोमॅटोची गेल्यावर्षी जून महिन्यात लागवड केली होती. लागवडीचे अगोदर ५० किलो कल्पतरू खत टाकले. सप्तामृत औषधे मे. पवार ब्रदर्स अकोले यांचेकडून १ लि. चा डोस घेऊन गेलो होतो. त्याची फवारणी लागवडीनंतर १५ दिवसांनी केली. या फवारणीमुळे झाडांची वाढ होऊन झाडांवर काळोखी आली. नंतर पुन्हा २१ दिवसांनी याच औषधांची फवारणी केली.

आमचे शेजारचे प्लॉटवर लाल कोळी आला होता. त्यामुळे त्यांचे उत्पादनात घट येऊन प्लॉट लवकर संपला, मात्र आमच्या प्लॉटवर लाल कोळी अजिबात आला नाही. तसेच इतर कुठलाही रोग आला नाही. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत होऊन ओलावा टिकून राहिला. त्याचा फायद झाडांची वाढ व फुटवा होण्यासाठी झाला. माल लागवडीनंतर पावणेदोन महिन्यात चालू झाला. २५ किलो वजनाच्या २५०० जाळ्या निघाल्या. टोमॅटो संगमनेर मार्केटमध्ये विकला. जाळीला सुरुवातीला बाजारभाव ६० - ८० रू. मिळाला नंतर १०० रू. मिळत होता. या प्लॉटपासून खर्च जाऊन १ लाख रू. उत्पादन मिळाले. खर्च २० - २ हजार रुपये झाला.

१॥ एकर कांद्यापासून १ लाखाहून अधिक उत्पन्न

दीड एकर कांद्यासाठी लागवडीनंतर १ महिन्यांनी सप्तामृताची एक फवारणी केली होती. या फवारणीमुळे कांद्याला कलर येऊन पत्ती कडक बनली. त्यामुळे बाजार चांगले मिळाले. कांद्याची विरळणी करून १९ पिशवी (५० किलोची) पुणे मार्केटला आणली होती. तेव्हा त्याला ९२० रू. क्विंटल भाव मिळाला. नंतर १५० पिशव्या माल बाजारभाव वाढल्यावर विकला.