रोगट प्लॉट दुरुस्त होऊन हिरव्या मिरचीस ३० ते ४० रू. / किलो भाव

श्री. सर्जेराव कृष्णात पाटील, मु. पो. नेर्ली, ता. कागल, जि.कोल्हापूर. मोबा. ८४२१२४०८३२


मी कोल्हापूर कृषी प्रदर्शनामधून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे जर्मिनेटर हे औषध घेतले होते आणि ते उसाचा फुटव्यासाठी वापरत होतो. तर त्याचा आम्हाला चांगला रिझल्ट मिळाला. त्यानंतर ३० मार्च २०१२ रोजी एक एकर क्षेत्रावरती सितारा या जातीची रोपे नर्सरीमधून आणून त्याची २' x १' या अंतरावर लागण केली. सुरूवातीला मिरची रोपे खूपज छान बसली होती. संपुर्ण प्लॉट फुले लागून मिरची तोडणे चालू होते.

हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे (ढगाळ वातावरण झाल्याने) सुरुवातीला ठराविक रोपांवरती मुरकुटा पडला व मिरची रोपाचा शेंडा आखडल्यासारखा होऊन पानांची गुंडाळी व काही प्रमाणात किडीही दिसू लागल्या. ४ ते ८ दिवसात संपूर्ण प्लॉटवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. त्यातील ५० % प्लॉट तर पुर्णत: निकामी झाला. म्हणून उरलेला ५० % प्लॉट तरी रोगापासून सावरावा याकरिता ८ दिवसाच्या अंतराने १०० मिली जर्मिनेटर + २५ ग्रॅम बाविस्टीन + १० लि. पाणी या प्रमाणे दोन वेळा आळवणी दिली व थ्राईवर, क्रॉंपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट- पी प्रत्येकी ५० - ५० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. तर हळूहळू राहिलेला प्लॉट पुर्वस्थितीत आला. श्री. मोरेंनी सांगितलेल्या सल्ल्याने ५० % तरी मिरची रोगापासून वाचली. मे २०१२ ला तोड चालू झाला. राहिलेल्या प्लॉटमधून १ ते २ दिवसांनी २५ ते ३० किलो मिरची निघत होती. तोडा दिवसाआड चालू आहे. बाजारात हिरवी मिरची कमी प्रमाणात ३० ते ४० रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. रोगाने गेलेला प्लॉट पुन्हा पुर्व स्थितीत आल्याने आर्थिक नफा चांगल्या प्रमाणात मिळाला आहे. त्यामुळे समाधान वाटते. अजून ८ - १० तोडे होतील. या प्लॉटला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या एकूण ४ फवारण्य केल्या असून एकूण ३० ते ३५ तोड्यापासून ८०० ते ९०० किलो माल निघाला आहे. त्यापासून २० ते २५ हजार रुपये उत्पन्न मिळाले.