४५० क्रेटपैकी २२५ क्रेट टोमॅटो एक्सपोर्ट, दर्जा बधून दलाल अवाक

श्री. फिरोज हमीद पटेल,
मु. पो. राजुरी, ता. जुन्नर, जि. पुणे.
मोबा. ९९७५९७८३८६


मी गेली ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरतो. माझ्याकडे २ एकर क्षेत्र असून टोमॅटो, फ्लॉवर, ऊस इत्यादी पिकावर ही तेक्नॉलॉजी वापरतो.

मी टोमॅटोच्या एकूण पाच पुड्या लावल्या होत्या. त्यावेळी पाण्याअभावी तीन पुड्यांची मर झाली, दोन पुड्यांचा प्लॉट सुरू आहे. त्याला सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी चे औषध वापरले. कल्पतरू खताच्या तीन बॅगा, १४:३५:१४ खताच्या तीन बॅगा वापरल्या. लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी जर्मिनेटरची ड्रेंचिंग केली. त्यामुळे पांढऱ्या मुळ्यांची वाढ होऊन मर झाली नाही. त्यानंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रिझम ८ ते १० दिवसांनी फवारणी केली. त्यामुळे प्लॉटला करपा आला नाही. फुटवा, फुलकळी एकदम चांगली आली. मार्केट मध्ये मालाला एक नंबर भाव मिळाला.दिवसाआड ५० क्रेट माल निघाला. आतापर्यंत एकूण ४५० क्रेट माल निघाला आहे. त्यामधील २२५ क्रेट एक्सपोर्टला गेला. व्यापारी माल बघून एकदम अवाक झाला. आणखी तेवढाच माल निघण्याची शक्यता आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे शेतीतील चमत्कारच असून सर्व शेतकरी बांधवांनी ही टेक्नॉलॉजी वापरून आपले उत्पादन व दर्जा वाढवावा.