५ गुंठे टोमॅटोतून ३० ते ३५ हजार रू. नफा

श्री. मारुती बवन चोपदार,
मु. पो. दक्षिण तांबवे, ता. कराड, जि. सातारा.
मोबा. ९९७०३६७१९३


माझ्याकडे फक्त ३४ गुंठे रान आहे. त्यातील १४ गुंठे क्षेत्रात मी मागील वर्षी पपई लावली होती. त्यावेळी मला पपईचे १४ गुंठ्यात ६५ हजार तर ४ गुंठे झेंडूचे १७,५०० रू. झाले होते. तेव्हापासूनच मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा भक्तच झालो आहे. त्याच अनुभवातून मी माझ्याकडच्या ५ गुंठे क्षेत्रावर टोमॅटो घ्यायचा ठरवला. त्यानुसार श्री. कापसे यांना फोनवरून बोलावून घेतले. त्यांच्याशी चर्चा करून सम्राट जातीच्या टोमॅटोची रोपे होळ अॅग्रो. अतित येथून आणली. प्रति रोप १ रू. १० पैसे प्रमाणे ११०० रोपे मी मागवली होती व सव्वा फुटावर एक याप्रमाणे २० मार्चला लागवड केली. पाणी पाजून लगेच जर्मिनेटर ६० मिली + प्रोटेक्टंट पावडर ३० ग्रॅम अशी आळवणी केली. चौथ्या दिवशी आणखी एक आळवणी वरील प्रमाणेच घेतली. तेवढ्यावरच रोपे इतकी सतेज झाली की, माझा माझ्यावरच विश्वास बसत नव्हता की मी आणलेली रोपे हीच का ? पांढऱ्या मुळ्या तर जमिनीलगतच भरपूर सुटल्या होत्या. पाणी जादा झालं तरी मला भीतीचे कारण नव्हत.

त्यानंतर २० दिवसांनी जर्मिनेटर ५० मिली + थ्राईवर ४० मिली + क्रॉंपशाईनर ३० मिली + प्रोटेक्टंट पावडर ३० ग्रॅमची फवारणी घेतली. तेवढ्या फवारणीवरच बाकी सगळ्यांच्या रासायनिक फवारणीच्या बागेपेक्षाही माझी बाग उजवी दिसायला लागली. पाने रुंद, चमकदार दिसायला लागली. नंतर १५ -२० दिवसात वरीलप्रमाणेच आणखी एक फवारणी घेतली. साधारणपणे २ महिन्यात म्हणजे २० मे ला पहिला तोडा केला. पण त्या तोड्यापुर्वी मात्र मला पिझमचा रिपोर्ट माहीत असल्याने थ्राईवर ६० मिली + क्रॉंपशाईनर ७० मिली + प्रिझम ६० मिली + प्रोटेक्टंट पावडर ५० ग्रॅमची १५ लिटर (पंप) पाण्यातून फवारणी घेतली होती. त्यामुळे फुलकळी इतकी लागली की, पाने कमी पण फुलंच जादा दिसत होती. मार्केटचे प्लेनिंग मी आधीच तयार करोन ठेवल होतं. माल पुणे मुंबईला पाठव्याचा नाही.

लोकल मार्केटच करायचा. म्हणून कराड मार्केटलाच माल पाठवायचा ठरवल. तोडा दररोज करत होतो. दिवसाला ५ - ७ क्रेट माल निघत होता. मालाची क्वॉलिटी एवढी जबरदस्त होती की, पुणे - बेंगलोरला ज्यावेळी १०० - १२० रू./१० किलो दर होता, त्यावेळी मला १३० - १४० रू/ १० किलो दर कराड मार्केटला मिळत होता. त्या दरम्यान फवारण्या मात्र वेळच्या वेळी आपले मार्केटिंग प्रतिनिधी श्री. उमेश कापसे यांच्या मार्गदर्शनानेच घेत होतो. मालाची फुगवण व्हायला थ्राईवर ८० मिली + + क्रॉंपशाईनर ९० मिली + राईपनर पहिल्यांदा ६० मिली परत वाढवून ८० मिलीपर्यंत (१५ लि. पाण्यास) केले. सोबत प्रिझम ७० मिली बुरशीला अटकाव म्हणून हार्मोनीचाही वरच्यावर स्प्रे घेत होतो. दलालपण एवढ्या क्वालिटीच्या मालासाठी आश्यर्च करत होते. मी मात्र डोके वापरून लोकल मार्केट आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर एवढाच विचार केला होता.

५ गुंठ्यातील प्रत्येक क्रेटचे ३८ -४० किलोपर्यंत वजन भरत होते. ज्यावेळी शेजाऱ्यांना १८ ते २० गुंठ्यातून दोन - तीन दिवसाआड तोडा होऊन २० क्रेटच्या पुढे माल जात नव्हता, त्यावेळी माझा माल फक्त ५ गुंठ्यात ७ क्रेट निघत होता. या सगळ्या अनुभवामुळे मी कलकत्ता झेंडू ४ मे ला लावून त्यावरही श्री. कापसे यांच्या सल्ल्यानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करत आहे. सध्या २ तोडे झाले आहेत. मार्केटच्या मागणीनुसारच तोडा करतोय.

खरोखर माझ्याकडे एवढे कमी क्षेत्र असतानाही जर मी एवढे उत्पन्न घेत असेल तर २ - ३ एकर रान असते तर या टेक्नॉंलॉजीचा वापर करून मी आणखी लवकर लखपती झालो असतो. खरोखर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी लोकांना लखपती करायच साधनच आहे. महत्त्वाचे म्हणजे या फक्त ५ गुंठ्यातून खर्च वजा जाता मला ३० ते ३५ हजार निव्वळ नफा झाला आहे.