ऊस प्रक्षेत्रासाठी १ डोळा उसाची रोपवाटिका अशी करावी

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


वरील किटकनाशकांची मात्र साध्या पंपासाठी आहे, पावर पंपासाठी मात्रा तीनपट वापरावी.

लागोपाठ एकाच किटकनाशकाची फवारणी करू नये. अशाप्रकारे पिकाच्या विविध टप्प्यानुसार आणि किडीनुसार योग्य किटकनाशकाची निवड करावी.

उसाच्या प्रक्षेत्रावर लागवड करत असताना उसाची रोपे तयार करून ती १॥ ते २ महिने जोपासून नंतर रोपांची जमिनीत लागवड केली असता नेहमीच्या पद्धतीतील २ महिन्यापर्यंत ऊस पीक जोपासण्यासाठी लागणारे पाणी, खते, तणनियंत्रण, मशागत, वेळ वाचतो, यासाठी एकडोळा पद्धतीने डोळे ट्रेमध्ये लागवडीची पद्धत अधिक फायदेशीर ठरते.

बेणे निवड : रोपवाटिकेसाठी बेणे मळ्यातील ९ ते ११ महिने वयाचे, सुधारित जातीचे शुद्ध, जाड, रसरशीत, लांब कांड्याचे, निरोगी बेणे निवडावे. बेणे तोडल्यापासून शक्यतो २४ तासाच्या आत त्याची लागवड करणे फायद्याचे ठरते.

ट्रे ची निवड : प्रयोग व अनुभवातून असे निदर्शनास आले की, प्लॅस्टिक ट्रे हे ३६ x ५६ x ७ सेमी आकाराचे ४२ कप असलेले १६० ग्रॅम वजनाचे ट्रे घ्यावेत. त्यामध्ये चांगले कुजलेले कोकोपीट (सामू ६.५ ते ७.५ असणारे) निर्जंतुक, कर्ब:नत्राचे गुणोत्तर २० :१ आणि ई. सी. ६०० ते ७०० (Micromohs) असलेले घ्यावे.

रोपे तयार करणे : प्रथम बेणेमळ्यातील बेणे आणल्यानंतर १ इंच लांबीचे १ डोळ्याचे तुकडे करावेत.

२५ किलो कोकोपीठमध्ये साधारणपणे ३ ते ५ किलो कल्पतरू सेंद्रिय खत चांगले मिसळून प्लॅस्टिक ट्रेमध्ये कपात एकतृतीयांश (३३%) भरून घ्यावे.

बेणेप्रक्रिया : १ डोळ्याचे १ इंच तयार केलेले तुकडे जर्मिनेटर १ लि. + ५०० ग्रॅम प्रोटक्टंट + १०० लि. पाण्याच्या द्रावणात ५ ते १० मिनिटे बुडवून नंतर ते सावलीत सुकवावेत. बेणे जून (जाड कांड्याचे) असल्यास डोळे फुटण्यासाठी जर्मिनेटर १ लि. सोबत प्रिझम १ लि. वापरावे.

बेणे लागवड : प्रक्रिया केलेले बेणे वरील पद्धती ने १ /३ कोकोपीट भरलेल्या ट्रेमधील कपात १ डोळा कांड्या ठेवाव्यात, नंतर त्यावर पुन्हा वरील मिश्रणाचे कोकोपीट टाकून ट्रे पुर्ण भरून घ्यावेत.

पाणी व्यवस्थापन : बेणे लागण झाल्यावर गरजेप्रमाणे झारीने अथवा सुक्ष्म तुषार संचाने पाणी द्यावे.

बेणे प्रक्रियेचे फायदे : बेणे प्रक्रियेमध्ये जर्मिनेटर वापरल्याने बेण्याचे कोंब १०० % फुटतात. कोंबाची जोमाने वाढ होते. प्रोटक्टंटया आयुर्वेदिक वनस्पतीजन्य पावडरमुळे कांड्यावरील कीड - रोगाचे नियंत्रण होते. प्रिझमच्या वापरामुळे जून कांड्यावरील न फुटणारे डोळे फुटतात. फुटवे अधिक निघतात. कोंब जोमाने वाढतात.

रोपांवर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी :

१) पहिली फवारणी : बेणे उगवून आल्यानंतर ८ ते १० दिवसांनी - जर्मिनेटर २५ मिली + थ्राईवर २५ मिली + कॉपशाईनर ३० मिली + प्रिझम २० मिली + प्रोटेक्टंट २० ग्रॅम (१ - २ काडेपेटी) + १० लि. पाणी याप्रमाणे घेऊन फवारावे.

२ ) दुसरी फवारणी : २० ते २५ दिवसंनी - जर्मिनेटर ३० मिली + थ्राईवर ३० मिली + प्रिझम २५ मिली + प्रोटेक्टंट २५ ग्रॅम (२ - ३ काडेपेटी) + १० लि. पाणी याप्रमाणे घेऊन फवारावे.

आळवणी : रोपे १५ ते २० दिवसांनी असताना १० लि. पाण्यात ३० ते ५० मिली जर्मिनेटर घेऊन झारीने रोपांवरून पिशवीत द्रावण मुरेल अशा पद्धतीने सोडावे. म्हणजे पांढऱ्या मुळीचा जारवा भरपूर वाढतो आणि फवारण्यांमुळे कोंबाची वाढ १। ते १॥ महिन्यात २ महिन्याच्या रोपांएवढी होऊन कोंब सशक्त, निरोगी वाढलेला मिळतो व फुटवे लवकर व अधिक तसेच सशक्त फुटण्यास मदत होते.

पारंपारिक पद्धतीच्या लागवडीपेक्षा उसाची रोपे तयार करण्याचे फायदे : १ ते १॥ महिन्यापर्यंत रोपे शेताबाहेर (ट्रेमध्ये/पिशवीत) वाढत असल्यामुळे या काळात जमिनीस विश्रांती मिळते. या काळात हिरवळीच्या खताचे पीक घेऊन जमिनीची सुपिकता वाढविता येते किंवा शेतातील अगोदरच्या पिकाच्या काढणीस अवधी असल्यास रोपे तयार करून त्यांची लागवड करता येते. त्यामुळे हंगाम साधता येतो.

काही वेळेस अगोदरचे पीक काढणीस उशीर होतो. तेव्हा अथवा जास्त पावसाने वाफसा नसल्यास अशा वेळी वापस येईपर्यंत थांबूनही रोपांची लागण केल्याने हंगाम साधता येतो.

सर्व रोपांना सुर्यप्रकाश, अन्नद्रव्ये, पाणी आणि वाढीचे इतर घटक योग्य व सारख्या प्रमाणात मिळाल्यामुळे सर्व उसांची वाढ एकसारखी (ऊस संख्या एकरी ४५ ते ५० हजार) होऊन फुटव्यांची मर कमी होते, एकूण उत्पादनात १० ते २५ टक्क्यांनी वाढ होते.

क्षारपड जमिनीत रोपांची लागण केल्यास रोपांना वाढीचा जोर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरूचा वापर केल्यास चांगला राहून वाढ चांगली राहते. लागण केलेल्या उसातील नांग्या भरण्यासाठी किंवा खोडवा पिकातील नांग्या भरण्यासाठी रोपांचा वापर फायदेशीर ठरतो.

सध्याच्या नवीन प्रचलित जाती :

१) को - ८६०३२ (नीरा ) : महाराष्ट्रात ही जात सुरू, पूर्व हंगामी व आडसाली या तिन्ही हंगामातील लागवडीस योग्य वाण असून तिचे वैशिष्ट्ये म्हणजे मध्यम ते उशिरा पक्व होणारी जात असून साखरेचे प्रमाण अधिक आहे. या जातीत तुरा येण्याचे प्रमाण कमी आहे. खोडव्यासाठी उत्तम वाण. काणी व गवताळ रोगास मध्यम प्रतिकारक असून पाण्याचा ताण काही प्रमाणात सहन करते. पाने गर्द हिरवी असून सरळ वाढतात. उसाचा रंग अंजिरी असून कांड्यावर काही प्रमाणात भेगा आढळतात. पानांच्या देठावर कूस नसल्याने वाढ्याचा उपयोग जनावरांना उत्तम चार म्हणून होतो. दुष्काळाचे वेळी चारा टंचाईचे काळात दुष्काळी भागात दुभती व कामाच्या जनावरांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निर्माण केलेल्या उसाचे वाढे उत्तम खाद्य मिळते. दुधात व त्याच्या फॅटमध्ये वाढ होऊन दुधाची चव चांगली वाटते.

उसाचे व साखरेचे सरासरी हेक्टरी उत्पन्न
हंगाम   उसाचे उत्पादन   साखरेचे उत्पादन  
सुरू   १०६ मे.टन   १४.४ मे.टन  
पूर्व हंगामी   १३९ मे.टन   १९.७ मे.टन  
आडसाली   १५९ मे.टन   २२.५ मे.टन  
२) को - व्ही.एस.आय ९८०५ (शरद -१) : महाराष्ट्रात ही जात सुरू, पूर्व हंगामी व आडसाली या तीन हंगामात लागवडीसाठी प्रसारित करणात आली आहे. या जातीचे वैशिष्ट्चे म्हणजे ही जात मध्यम ते उशीरा पक्व होणारी असून, साखरेचे प्रमाण अधिक आहे. तुरा येण्याचे प्रमाण कमी असून खोडव्यासाठी ही जात उत्तम आहे.

उसाचे व साखरेचे सरासरी हेक्टरी उत्पन्न

हंगाम   उसाचे उत्पादन   साखरेचे उत्पादन  
सुरू   १२३ मे.टन   १८.४५ मे.टन  
पूर्व हंगामी   १३७ मे.टन   १९.६९ मे.टन  
आडसाली   १६५ मे.टन   २४.७७ मे.टन  


३) को - एम ०२६५ (फुले २६५) : या जातीमध्ये गाळपालायक उसाची संख्या, उसाची जाडी व उसाचे वजन जास्त असल्याने हेक्टरी ऊस व साखरेचे अधिक उत्पादन मिळते. प्रचलित वाण को - ८६०३२ या जातीपेक्षा दर हेक्टरी ऊस उत्पादन १९.४५ % तर साखर उत्पादन १८.७४ टक्क्याने जास्त आहे.

ही जात आडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू या तिन्ही हंगामांत चांगली येते. साखरेचे प्रमाणही (सी.सी.एस. १३.६८%) जवळपास को - ८६०३२ (१३.७८% ) इतकेच असल्यामुळे ही जात महराष्ट्रात तिन्ही हंगामांत लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे.

मध्यम ते भारी जमिनीत तसेच खारवट व चोपण जमिनीतही चांगले उत्पादन मिळते. पाण्याचा ताण सहन करते. पाने हिरवीगार, तूऱ्याचे प्रमाण अत्यल्प आणि देठावर कूस कमी असल्याने वाढ्यांचा उपयोग चाऱ्यासाठी होतो. पाचट सहज निघते. त्यामुळे तोडणी करणे सुलभ जाते. खोडव्याची फूट व वाढ चांगली आहे.

चाबूक काणी, मार व लाल कूज या रोगांना प्रतिकारक आहे. तसेच खोड कीड, कांडी कीड, शेंडे कीड व लोकरी मावा या किडींचा कमी प्रमाणात प्रादुर्भाव होतो. फुले २६५ ची रिकव्हरी को - ८६०३२ पेक्षा किंचीतशी कमी असली तरी उत्पादकता अधिक असल्यामुळे एक हेक्टर क्षेत्रामधून २०% जादा साखर मिळते. साखर कारखानदार व शेतकरी यांना ही जात फायदेशीर आहे.

उसाचे व साखरेचे सरासरी हेक्टरी उत्पन्न

हंगाम   उसाचे उत्पादन   साखरेचे उत्पादन  
सुरू   १५० मे.टन   २०.३१ मे.टन  
पूर्व हंगामी   १६५ मे.टन   २२.५७ मे.टन  
आडसाली   २०० मे.टन   २६.८२ मे.टन  
खोडव्याचे   १३० मे.टन   १७.४१ मे.टन  


ऊस लागवड व खोडवा पिकाच्या व्यवस्थापनासाठी तसेच कमी पाण्यावर ऊस जोपासून एकरी ८० ते १०० टन उत्पादन मिळण्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञान व कल्पतरू सेंद्रिय खत (कृषी विज्ञान, फेब्रुवारी २०१३, पान नं. ६ ते १६ मध्ये दिल्याप्रमाणे ) वापरावे. तसेच आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.