करपलेली बिजली डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने निरोगी १० पांडात दिवसाआड १ पोते, भाव १०० ते १५० रू. /किलो -५० ते ५५ हजार रू. उत्पन्न

श्री. विलास बबन दारेकर,
मु. पो. आंबळे , ता. पुरंदर, जि. पुणे.
मोबा. ९०९६७२९७९३


एका वाफ्यात १ गुंठ बिजलीची लागवड होते. जाधव वाडीहून रोपे आणली. एक वाफा १२०० -१३०० रू. ला मिळतो. बिजलीची १ ते १० मी ला लागवड गेल्यावर्षी केली होती. पोत्याच्या आकाराचा वाफा ५ इंच उंचीची रोपे होती. गेल्यावर्षी सरीला ३' x १' वर (३ फुटाची सरी, १ फुटावर एका बाजूला) लागवड केली.

२ महिन्याची बिजली नुकतीच चालू होती. तेव्हा करपा आलेला. त्यावर इतर औषधे फवारली तरी करपा आटोक्यात आला नाही. ५० % झाडांवर करप्याचे प्रमाण वाढले, तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी ऑफिसमध्ये जाऊन माहिती घेतली. त्यांनी करप्यावर सप्तामृत दिले त्याची १ फवारणी केली. तर करपा जागेवर थांबला नवीन फुटवा निघाला. नंतर १ फवारणी केली. अशा २ फवारण्या डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या केल्या. १० पांडात (२० गुंठे) दिवसाड १ पोते ४५ - ५० किलोचे निघत होते. फुलांचा दर्जा चांगला होता.

जुलैला फुले चालू झाली. त्यानंतर २॥ - ३ महिने तोडे चालले. १०० ते १५० रू. किलो भाव मिळाला. साळुंखे यांच्याकडे पुणे मार्केटला आणतो. मंदीत ४० - ५० रू./किलो भाव असतो ५० - ५५ हजार रू. उत्पन्न मिळाले होते.

या अनुभवातून चालू वर्षी बिजली १ मे २०१३ ला अर्धा एकर लावली आहे. ठिबकर ४ x १। फुट बेडवर आहे. बेडच्या ५४ ओळी आहेत. अद्याप एकही फवारणी केली नाही. सध्या फुले चालू झाली आहे. २ किलो माल पहिल्या तोड्याला निघाला व काही झाडांवर करपा जाणवत आहे. म्हणून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी करपा जाण्यासाठी व माल वाढीसाठी घेऊन जात आहे.