डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कृषी विज्ञानने शेतमजुराचा मी झालो मालक आणि यशस्वी शेतकरी व सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत !

श्री. जगन्नाथ सुदाम पाडेकर,
मु. पो. संतवाडी आळे, ता. जुन्नर, जि. पुणे.
मोबा. ९७६६४५ ७० १६ / ८६२४८१६५२८


मी मुळचा शेतमजूर, सकाळी स्वयंपाक केला तर संध्याकाळी स्वयंपाकासाठी तिच भांडी चुलीतील राखेने घासून वापरावी लागत. जेवायला जर्मलच्या ताटल्या. पांघरायला गोधड्याही नव्हत्या. लोकांच्या विहीरी खोदायला जायचो. एवढी बिकट परिस्थिती होती आमची.

१० - १२ वर्षापुर्वी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. 'कृषी विज्ञान' मासिक वर्गणी भरून चालू केले. ४ एकर अगदी हलक्या मुरमाड प्रतीची, डोंगर उताराची वडीलोपार्जीत जमीन आहे. आम्ही ती कसत होतो, मात्र खर्चायला भांडवल नसायचे. पारंपारिकतेने उत्पादन अगदी कमी निघायचे. अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या मासिकातील देशभरातील शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामान व परिस्थितीवर मात करून घेतलेल्या दर्जेदार उत्पादनांच्या मुलाखती वाचून त्यातून प्रेरणा घेऊन वडीलोपार्जीत शेतीत मोजक्या भांडवलावर थोडी - थोडी पिके डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने करू लागलो.

१५ गुंठे हलक्या जमिनीतून ११ -१२ टन निर्यातक्षम कांदा

प्रथम अगदी निकृष्ट दर्जाच्या फफुटा असलेल्या मातीत डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरून कांदा पीक घेतले. परिस्थिती नाजूक असल्याने काटकसरीने की खर्चात खूप कष्टाने शेती करू लागतो.

अतिशय हलकी जमीन आहे. या जमिनीत पीक येत नव्हते. तेव्हा आमचा मेंदू जड झाला होता. त्या जमिनीत पिकांवर सरांचे तंत्रज्ञान वापरल्याने कमी क्षेत्रातून अधिक दर्जेदार उत्पन्न कमी वेळात मिळाल्याने मन बहरले, आनंदाने अशा जमिनीतून आता १५ ते २० गुंठ्यातून डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने ११ ते १२ टन दर्जेदार कांदा उत्पादन घेतो. कांदा एकसारखा डबल पत्तीचा असल्याने बाजारभावही नेहमीच इतरांपेक्षा जादा मिळतो. असे उत्पादन मिळू लागल्यावर मजुरी बंद करून शेतीस पुरक व्यवसाय म्हणून होलेस्टेन फ्रिजीयम (H.F.) एक गाई पळून दुग्धव्यवसाय चालू केला. नंतर १- १ करत गाया वाढविल्या. गायांना चाऱ्यासाठी गिन्नी गवत (हत्ती गवत), मेथी घास लावला. या गाई १० - १२ लि. दूध देत असत. नंतर सरांच्या संपर्कात आल्यावर सरांनी सांगितले की, या चारा पिकांनाही हे तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त आहे. तेव्हा त्यालादेखील अवश्य वापरा.

एरवी महिन्याने कापणीस येणारा १॥ ते २ फूट मेथी घास २१ दिवसात २॥ - ३ फूट उंच मिळू लागला

त्यानंतर या चारा पिकांवर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने स्प्रे घेऊ लागलो. तर आशचर्यकारक परिणाम जाणवले. दीड फुट वाढणारा मेथी घास २॥ - ३ फुटापर्यंत वाढू लागला. शिवाय एरवी ३० दिवसांनी कापणीस येणारा हा घास २१ - २२ व्या दिवशी कापणीस येऊ लागला. हत्ती गवताचेही तसेच झाले. अधिक फुटवे निघू लागले. पाने खोडापासून शेंड्यापर्यंत हिरवीगार रसरशीत मिळू लागली. उंची ७ - ८ फुटापर्यंत होऊ लागली. हा घास रसरशीत असल्याने घास अजिबात वाया जात नाही.

१० - ११ लिटर दूध देणाऱ्या गाई १५ - २० लिटर दूध देऊ लागल्या

नेहमी जमिनीपासून १ ते १॥ फुटाचा भाग जाड, कमी रसाचा झाल्या ने जनावरे खात नसत. कुटीमशीनद्वारे चारा बारीक करून वाया जाणारा चाराही वापरात येऊ लागला आणि सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे १० ते ११ लि. दूध देणाऱ्या गाई १५ ते २० लि. दूध देऊ लागल्या. ५ गाईंपासून पुर्वी ५० ते ५५ लि. दूध मिळत होते. तेथे ८५ ते ९० लि. दूध मिळू लागले. शिवाय फॅटसुद्धा वाढली. (संदर्भ : कृषी विज्ञान, जून २००६, पान नं. २२)

चालूवर्षी प्रचंड दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने उन्हाळ्यात फक्त १ तास मोटर चालत होती. तेवढ्यावर १५ गुंठे अभिनव टोमॅटो, १ एकर भगवा (बहार धरलेले) डाळींब, २० गुंठे गिन्नी गवत (हत्तीघास), १० गुंठे मेथी घास ही पिके पोहच (टेक) पाण्यावर नुसती 'तग' धरून जगवली नाहीत तर चांगली वाढविली.

२ महिने पाणी नसतानाही हत्तीगवत जिवंत

पाणी पुरत नसल्याने २० गुंठे हत्ती गवताला (गिनी गवत) जर्मिनेटर २ लि. ठिबकमधून सोडले होते तर त्यानंतर २ महिने कसलेही पाणी न देताही हत्ती गवत जिवंत होते. आता पाऊस झाल्यावर त्याला नवीन फुट होऊन वाढही भरपूर झाली आहे. जर्मिनेटर ने जारवा भरपूर सुटला आहे. हे गवत डोक्याला लागत आहे. सध्या १० गाई असून काही गाभण तर काही दुधाच्या असताना सतत दररोज १०० लि. दूध डेअरीला जाते. आले फाट्यात अत्तम दर मिळतो. सतत कमी जास्त गाई दूध देत असल्या तरी गाभण गाया ७ व्या महिन्यापर्यंत दूध देतात.

भगवा डाळींब २२ महिन्यापुर्वी एक एकर लावले आहे. भगव्याची ४०० रोपे घारगाववरून १५ रू. प्रमाणे आणली होती. जमीन मुरमाड आहे. लागवड १२' x ८' वर ऑगस्ट २०११ मध्ये केली. सुरूवातीपासून भगव्याला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले. तर १८ महिन्यात पहिला बहार जानेवारी २०१३ मध्ये धरला.

बहार धरताना शेणखत २ घमेली, कल्पतरू सेंद्रिय खत १ किलो, निंबोळी पेंड अर्धा किलो, प्रोटेक्टंट २० ते २५ ग्रॅम प्रत्येक झाडास चारीबाजूने दिले आणि ठिबकच्या पाण्यासोबत जर्मिनेटर एकरी १ लि. सोडले व वरून जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी घेतली असता बहार भरपूर फुटला. फुलकलि भरपूर निघाली. प्रत्येक झाडावर ५० ते ६० अशी फुलकळी राखली. त्यापासून ३५ ते ४० फळे धरली. फळे सेंटिगसाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी केली. कळी सेंटिगवेळी हवामान ढगाळ असल्याने आणि किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून किटकनाशक फावारायचो तर त्याने फुलगळ व्हायची, म्हणून लगेच थ्राईवर, क्रॉंपशाईनर, प्रोटेक्टंट फवारायचो, म्हणजे फुलगळ जागेवर थांबायची

ड्रिपवाटे १३:०:४५, १२:३२:१६, ०:५२:३४ अशी गरजेनुसार विद्राव्य खते देत असे. फळांचे पोषण होण्यासाठी राईपनर, न्युट्राटोन २ फवारण्या केल्या. त्यामुळे फळांची साईज वाढण्यास मदत झाली. जर्मिनेटर दर महिन्याला ड्रिपवाटे सोडत होतोच. त्यामुळे झाडाची खोडे, फांद्या मजबूत झाल्या. एरवी झाडांना फळांचा भार पेलत नाही म्हणून फांद्यांना बांबुचा चारही बाजुंनी आधार द्यावा लागतो. तेथे आमची झाडे कमी वयाची असूनही सशक्त असल्यामुळे झाडांवर ३० - ४० फळे असताना झाडांना आधाराची गरज भासली नाही.

कारण खोडापासून चारी बाजूने निघालेल्या फांद्या सशक्त, दणकट, निरोगी असून अंगठ्यासारखी फांदी व पुढे करंगळीसारख्या जाड काडीस फळे लागल्याने त्यांना आधाराची गरज नव्हती. भरपूर सुर्यप्रकाश व हवा खेळती राहत असल्याने तेल्या व इतर रोगांपासून संपुर्ण बाग मुक्त आहे.

फळांचे पोषण चांगले झाले. ४०० ते ५०० पासून ७५० - ८०० ग्रॅमची फळे मिळाली. पहिला तोडा ६ जून २०१३ ला केला तर ६६ क्रेट (१३०० किलो) माल निघाला. शिवाय सालीला आकर्षक चमक, ग्लेजिंग आले. पुणे मार्केटला ९० ते १०० रू. किलो भाव मिळाला. ते व्यापारी म्हणाले पूर्ण मार्केटमध्ये एवढी चमक असलेले फळ नाही. सर्वांच्या डाग (स्पॉट) आहेत. काहींवर किडीचे स्पॉट आहेत तर काहींवर फवारणी व उन्हाचे चट्टे पडलेले आहेत. पण आपले फळ आकर्षक, चमकदार, लाल भगव्या रंगाचे एकसारखे आहे. (संदर्भसाठी कव्हरवर फोटो दिला आहे. यावेळी सरांनी मला डाळींबाचे पुस्तक व कृषी मार्गदर्शिका भेट दिली.)

आता मागील फळे पोसण्यासाठी सरांनी सुचविलेले न्युट्राटोन १॥ लि. + राईपनर १॥ लि. + क्रॉंपशाईनर २ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे फवारणार आहे.

पाणी अतिशय कमी व अधिक उष्णता तसेच विजेचा लपंडाव यामुळे मर रोगाने गेलेल्या २५ झाडांच्या जागी नवीन भगवा रोपे लावणारा आहे, असे सरांना सांगितले असता सरांनी सांगितले, अगोदरच लागवड अतिशय जवळ झाली आहे. त्यामुळे पुढे २ वर्षांनी १२ x ८ मधील ८ फुटाच्या ओळीतील एकाआड एक झाड काढावे लागेल. म्हणजे झाडांतील अंतर १२ x १६ फूट होईल. त्यावेळी अंतर वाढल्यामुळे झाडांचा घेर जरी वाढलेला असला तर हवा खेळती राहील. सुर्यप्रकाश संपुर्ण कांद्यांना मिळेल. तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.

डाळींबात मर झालेल्या जागी 'सिद्धीविनायक' मोरिंगा

फार तर आता झाडे लहान असल्याने गेलेल्या झाडांच्या जागी 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लावा. हा शेवगा ६ - ८ महिन्यात चालू होऊन वर्षात २५ झाडांपासून १० - १५ हजार रू. होतील. मग पुढे शेवगा वाढवून डाळींब कमी केले तरी उत्पादन व नफा डाळींबापेक्षाही जास्त मिळेल. असा हा नावाजलेला 'सिद्धीविनयक' शेवगा आहे. यावेळी सरांनी सटाणा तालुक्यातील श्री. केदा सोनवणे यांनी मर रोगामुळे डाळींब काढून १ हेक्टर 'सिद्धीविनायक' शेवगा लावून तो सर्व शेवगा लंडनला निर्यात केला व एकदा कुवेतला निर्यात केला, तर या शेवग्यापासून वर्षात एकरी ५॥ लाख रू. कमविल्याची शेवगा पुस्तकातील त्याची मुलाखत दाखविली. त्या प्रेरणेतून आता "सिद्धीविनायक' शेवग या डाळींबात गेलेल्या रोपांच्या जागी लावणार आहे. पुढे शेवगा वाढवून डाळींब कमी करणार, म्हणजे काही दिवसांनी डाळींब हे मुख्य पीक असताना ते दुय्यम आंतरपीक होईल, तर 'सिद्धीविनायक' शेवगा मुख्य पीक होईल. सरांनी सांगितल्याप्रमाणे बांधाने सुगंधा कढीपत्ता २५ झाडे, शबरी जांभूळ ५ - १० झाडे, सम्राट सिताफळ २५ झाडे, लाल पेरू १० झाडे लावण्यासाठी आज रोपे घेऊन जात आहे. सरांनी सांगितले खाऊ पान (मघई पान) ची काही रोपे लावा. जेथे खाऊचे पान असते तेथे समृद्धी नांदते. ही अंधश्रद्धा नसून १००% सत्य आहे. कारण तो अनेकांनी घेतलेला अनुभव आहे.

लाल कोळीसाठी 'स्प्लेंडर' प्रतिबंधक व प्रभावी

आम्ही उन्हाळी अभिनव टोमॅटोचे पीक दरवर्षी घेतो. १५ गुंठ्यातून ६०० क्रेट टोमॅटो उत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने काढले आहे. यावर्षी टोमॅटोवरील लालकोळीवर सरांनी संशोधीत केलेले नवीन औषध 'स्प्लेंडर' वापरले. तर इतर रासायनिक औषधांनी आटोक्यात न येणारा लालकोळी 'स्प्लेंडर' औषधाने जागेवर थांबून पुर्ण नियंत्रण मिळाले. दरवर्षी उन्हाळी टोमॅटोवर लाल कोळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो.

उन्हाळ्यात या किडीला खाण्यास गवत किंवा इतर पीक नसल्याने टोमॅटोच्या कोवळ्या, हिरव्यागार पानांवर ही कीड तुटून पडते. वरून कडक ऊन असल्याने ही कीड पानाच्या खालील बाजूने पानांतील रस शोषण करते व टोमॅटोचे पीक अवघ्या काही दिवसात उद्ध्वस्त होते.

पानांच्या खालच्या बाजूने या किडींचा प्रादुर्भाव होत असल्याने बाजारातील महागड्या औषधांनी देखील ही कीड आटोक्यात येत नाही. तेथे डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या 'स्प्लेंडर' या औषधामुळे लाल कोळीवर नियंत्रण मिळाल्यामुळे सप्तामृताप्रमाणे स्प्लेंडरच्या रूपाने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. शिवाय हे औषधे बाजारातील औषधांच्या तुलनेत स्वस्त असल्याने ते शेतकऱ्यांना परवडणारे आहे.

यंदा आमच्या पट्ट्यात ऊन जास्त होते. टोमॅटोवर आकसा जास्त होता. यावर सरांनी सांगितले, की जास्त ऊन असल्याने जमीन फार तापते आणि लाईट जेव्हा उपलब्ध असते, तेव्हा मोकाट किंवा ठिबकणे एकदम जास्त पाणी दिले जाते. अशा परिस्थितीत क्लोराईड, सल्फेट, कर्बोनेट, बायकर्बोनेट तत्सम क्षारांचे प्रमाण वाढल्याने येतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या नियमित फवाराण्यांनी असा आकसा आटोक्यात येतो.

उन्हाळी टोमॅटोचा सध्या खोडवा घेतला आहे. तर खोडवा पीक महिन्याभरात (१५ ऑगस्टपर्यंत) संपेल. तेव्हा त्याच मांडवावर कोणते पीक घ्यावे असे सरांना विचारले असता सरांनी सांगितले, सध्या खरबुजा ६' x १॥' वर लावले तर रमजानमध्ये चांगले पैसे होतील. त्याचे वेल खालीच पसरू द्यावेत. मांडवावर काकडी, दुधी, दोडका, घोसाळी, कारली ही पिके डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने चांगली येतील व रमजान हुकला तरी खरीपातील येणाऱ्या भाज्याअगोदर ह्या भाज्या आल्याने या आंतरपिकाचे भरपूर पैसे होतील. अभ्यासासाठी मार्गदर्शनासाठी पिकवार संदर्भ अंक, कुर्शी विज्ञान मासिकाचे अंक पहावेत. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा अनुभव घेतलेल्या शेतकऱ्यांना फोन करावा म्हणजे भरपूर मार्गदर्शन होईल.

गेली १० -१२ वर्षापासून सरांचे तंत्रज्ञान शिरसावंध वापरत आहे. त्यामुळे निर्यातक्षम दर्जास कांदा, भगवा डाळींब, टोमॅटो, फारशी घेत आहे. यातून आमची चांगली भरभराट झाली. २ मुलींची आणि एका मुलाचे लग्न असा तिन्ही लग्नाचा ६ लाख रू. खर्च, ३ लाखाची विहीर,१ लाखाचा गोठा, जनावरे धुण्याची मशीन व दूध काढण्याची मशीन ६० हजाराची, १ लाखाचे घर दुरुस्ती एवढा सर्व खर्च या तंत्रज्ञानाच्या साथीने शेतीच्या उत्पन्नातून करून आज १ रुपयाचेही कर्ज आमच्यावर नाही याचे समाधान वाटते.