कोहळा लागवड

प्रा. डॉ. वि.सु. बावसकर


कोहळा हे काकडी वर्गातील एक फळ होय, भोपळ्यासारखे दिसणारे हे फळ अंड्याच्या आकाराचे, पण साधारण २ ते ५ किलो वजनाचे असते. ताज्या फळावर पांढरी दाट लव असते. काही काळाने ही लव गळून जाते. कोहळा हिरव्या रंगाचा असतो. कोहळ्याचा वेळ असतो, पाने खरखरीप असतात. तर फुले पिवळ्या रंगाची असतात. वसंत ऋतूमध्ये फुले येतात. ग्रीष्मात फळे धरतात. ही फळे तयार होईपर्यंत शरद- हेमंत ऋतू उजाडतो.

स्वयंपाक, औषधीकरणार तर कोहळा वापरला जातोच, पण यज्ञयागादी कर्मांतही याची आवश्यकता असते. औषधात बहुधा कोहळ्याचे फळ वापरले जाते, मात्र कोहळ्याच्या बिया, पाने, मूक हे औषधी गुणधर्मांचे असते. कोवळा कोहळा खाण्यास निषिद्ध समाजला जातो. पूर्ण वाढ झालेला, तयार झालेला कोहळा वापरण्यास योग्य असतो. असा कोहळा वेलावरून काढून घेतल्यावर वर्षभर टिकू शकतो.

कोहळ्याला संस्कृत भाषेत 'कुष्मांड; असे म्हणतात, ज्याच्या बीजात किंचितही उष्णता नाही तो कुष्मांड. अर्थातच कोहळा शीतल गुणाचा असतो. याशिवाय कोहळ्याच्या वेलीला पुढीलप्रमाणे पर्यायी नवे आहेत.

महत्फला - बृहत्फल - मोठे फळ असणारी

क्षीरफला - दुधासारखा पांढरा गर असणारे फळ असणारी

स्थिरफला - जिचे फळ दिर्ध काळ टिकते ती

सोमका - शीतल गुणधर्माची

पीतपुष्पा - पिवळ्या रंगाची फुले असणारी कोहळ्याला हिंदीत पेठा, इंग्रजीत अॅश गोर्ड, गुजरातीत कोहळू म्हटले जाते, तर याचे बोटॅनिकल नाव बेनिनकासा सेरिफेर (Benincasa Cerifera ) असे आहे.

धातुपोषक, पित्तनाशक: कोहळा धातूंची ताकद वाढवतो विशेषता: शुक्रधातूला पोषक असतो. पित्तनाशक रक्तदोष दूर करणारा आणि वातसंतुलन करणारा असतो. तयार झालेला ताजा कोहळा अतिशय थंड असल्याने, पत्तिशमनास उत्तम असतो. तोच काही दिवसांनी मध्यम पिकला की प्राकृत कफाचे पोषण करतो. तर साधारण जून झाला असता पचण्यास हलका होतो. साधारण थंड असतो, चवीला गोड, क्षारयुक्त असतो, अग्नीला प्रदीप्त करतो, बस्ती (मूत्राशयाची ) शुद्धी करतो, सर्व दोषांना संतुलित करतो, पथ्यकर असतो आणि सर्व प्रकारच्या मानसिक रोगांवर उपयोगी असतो.

औषधी कोहळा :कोहळा औषध म्हणून पुढीलप्रमाणे वापरला जातो-

* कोहळा बस्तीशुद्धिकर व शीत विर्याचा असल्याने लघवी साफ होण्यास मदत करतो. त्यामुळे लघवीस जळजळ होत असल्यास, लघवी अडखळत किंवा पूर्ण होत नसल्यास व्यवस्थित तयार झालेल्या कोहळ्याच्या गारचा चार - पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जिरे पूड व चिमूटभर धने पूड टाकून घेण्याचा उपयोग होतो.

* आम्लपित्ताचा त्रास होण्याची सवय असणाऱ्यांनी सकाळी कोहळ्याचा चार - पाच चमचे रस साखरेसह घेणे चांगले असते. डोके दुखणे, मळमळणे, उलट्या होणे यासारखे त्रास बंद होतात.

* मुतखडा किंवा लघवीतून खर जाते त्या विकारावर कोहळ्याचा चार - पाच चमचे रस, त्यात चिमूटभर जवखार टाकून घेण्याचा फायदा होतो.

* लघवी अडली असल्यास किंवा पूर्ण साफ होत नसल्यास किसलेला कोहळ्याचा गर ओटीपोटावर ठेवणाचा उपयोग होतो.

* शरीरात उष्णता अति प्रमाणात वाढल्याने नाकातून रक्त येते. लघवीतून रक्त जाते किंवा शौचावाटे रक्तस्त्राव होतो. यावर चार चमचे कोहळ्याचा रस व दोन चमचे ताज्या आवळ्याचा रस हे मिश्रण खडीसाखरेसह घेण्याचा उपयोग होतो.

* तीव्र प्रकशात, संगणकावर दीर्घ काळ काम करण्याने किंवा प्रदुषणामुळे डोळ्यांची आग होणे, होळे लाल होणे, दुखणे, प्रकाश सहन न होणे, डोळ्यांतून पाणी येणे यासारख्या तक्रारींवर डोळ्यांवर कोहळ्याच्या रसाच्या घड्या ठेवण्याचा व नाकात साजूक तुपाचे थेंब टाकण्याचा उपयोग होतो.

तापामुळे हाता - पायांच्या तळव्यांची तीव्र जळजळ होते. अशा वेळी तळव्यावर कोहळ्यांच्या रसाच्या घड्या ठेवल्याने बरे वाटते.

* कोहाल्याचे बी सोलून घेऊन व्यवस्थित सुकवून ठेवता येते. हे बी दुधात शिजवून तयार झालेली खीर खाल्ल्यास धातूंची पोषण होते. शरीर भरण्यास मदत मिळते.

* वीर्यवृद्धीसाठी कोहळ्याचा पाक उत्तम असतो. शुक्राणूंची संख्या किंवा गती कमी असणे, अशक्तपण जाणवणे वगैरे त्रासांवर, तसेच कोणत्याही दीर्ध आजारपणामुळे येणारी अशक्तता दूर होण्यास शस्त्रकर्मानंतर कोहळ्यापासून तयारी केलेले धात्री रसायनासारखे रसायन घेणे उत्तम असते.

* जून कोहळा क्षारयुक्त व अग्निदीपनास मदत करणारा असल्याने, कोहळ्याचा क्षार करता येतो. हा क्षार पोटदुखीवर अत्तम असतो, पचनास मदत करतो.

* पेठा ही उत्तर भारतीतील आग्रा येथील प्रसिद्ध मिठाई कोहळ्यापासून बनविलेली असते. गुलाबाच्या अर्कासह तयार केलेला पेठा अतिशय चविष्ठ असतो. तसेच पौष्टिकही असतो.

* दक्षिण भारतात सांबार करताना त्यात कोहळा टाकण्याची पद्धत आहे. कोहळ्याचे सांडगे करून ठेवता येतात. तसेच कोहळ्याची भाजी, रायता, सूप वगैरेही बनवता येते. पथ्यकर असा कोहळा स्वयंपाकात या प्रकारे वापराला तर त्याचा आरोग्य राखण्यास निश्चित हातभार लागतो.

कोहळ्याचे पदार्थ - रायते : कोहळा धुवून त्याची साल काढून टाकवी. कापून आतल्या बिया वेगळ्या कराव्यात. बारीक तुकडे करावेत. पातेल्यात थोडेसे तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, बारीक वाटलेली मिरची टाकावी. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. शिजल्यावर वेगळ्या भांड्यात गार करायला ठेवावे. गार झाल्यावर वरून दही व कापलेली कोथिंबीर घालावी.

कोहळ्याची भाजी : कोहळा धुवून त्याची साल काढून घ्यावी. कापून आतल्या बिया काढून टाकाव्यात. गराचे साधारण दीड सेंटिमीटर लांबी - रुंदी - उंचीचे तुकडे करावेत. पातेल्यात तूप घ्यावे. गरम झाले की त्यात जिरे, हिंग, किसलेले आले टाकावे. हवे असल्यास मिरचीचे तुकडे टाकावेत. जिरे तडतडले की कोहळा टाकून, हलवून वर झाकण ठेवावे. कोहळा शिजायला फार वेळ लागता नाही. त्यामुळे फोडी फार नरम होणार नाहीत याकडे लक्ष ठेवावे. शिजताना चवीनुसार मीठ व साखर घालावी. वरून ओल्या नारळाचा कीस तसेच बारीक कापलेली कोथिंबीर घालावी. कधीतरी रुचिपालट म्हणून भाजी शिजताना मोड आलेल्या मेथ्या, हरभऱ्याची डाळ किंवा मुगाची डाळ घालता येते. या प्रकारची कोहळ्याची भाजी अतिशय पथ्यकर, रुचकर आणि पचण्यास हलकी असते. भाकरीबरोबर खाण्यास छान लागते.

कोहळ्याच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण

अन्नघटक   प्रमाण(%)   अन्नघटक   प्रमाण(%)  
पाणी   ९७   कार्बोहायड्रेट्स   २.०  
प्रोटीन्स   ०.४   कॅट्स   ०.१  
तंतुमय पदार्थ   ०.८   खनिजे   ०.३  
कॅल्शियम   ०.०३   फॉस्फरस   ०.००१  
जीवनसत्त्व 'क'   ०.००१   उष्मांक (कॅलरी)   १०  


हवामान व जमीन : कोहळ्याच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी कसदार जमीन चांगली असते. तसेच पोयट्याच्या जमिनीतदेखील लागवड करता येते. कोहळा हे पीक शेतजमिनीत, वाळूत अथवा नदीच्या पात्रातसुद्धा लावता येते. पाण्याचा उत्तम निचारा होणारी जमीन चांगली असते. या पिकाची वाढ उष्ण आणि कोरड्या हवामानात चांगली होते.

लागवडीचा हंगाम : कोहळा जास्त काळ वाढणारे पीक आहे. कोवळ्याची लागवड उन्हाळ्यात फेब्रुवारी मार्च - एप्रिल महिन्यात करतात. उष्ण व कोरड्या हवेत याची वाढ चांगली दोते. कोव्ल्याची लागवड उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यात देखील करता येते.

जाती :

१) को - १ : तामिळनाडू कृषिविद्यापीठाने विकसीत केलेली ही जात मध्यम कालावधीची असून फळे वजनाला ५ ते ६ किलोपर्यंत असतात. फळात बियांची संख्या कमी असते. एका वेलीस ६ ते ८ फळे लागतात. पिकाचा कालावधी १२० दिवसांचा असतो.

२) को - २ : १२० दिवसांत तयार होणारी जात असून एका फळाचे वजन ३ किलोपर्यंत असते. फळातील गराचा रंग फिकट हिरवा असतो. याशिवाय कोहळ्याच्या एस - १ (पंजाब) आणि मुदलीयार (तामिळनाडू) या वाणांची लागवड करण्यात येते.

बियाणे : कोवळ्याचे हेक्टरी ३ ते ४ किलो बी लागते.

लागवडीतील अंतर व लागवड पद्धती : कोहळ्यासाठी दोन ओळीतील अंतर १.५ ते २ मीटर ठेवावे आणि दोन वेलींतील अंतर १ मीटर ठेवावे. बियांना लागवड करण्यापूर्वी जर्मिनेटची बीजप्रक्रिया करावी. कोहळ्याची लागवड उन्हाळ्यात फेब्रुवारी - मार्च - एप्रिल महिन्यामध्ये करतात. तर खरीप हंगामात जून - जुलै महिन्यामध्ये करतात. फारशी थंडी नसलेल्या भागात ऑक्टोबर महिन्यातदेखील लागवड करता येते.

बीजप्रक्रिया : १ किलो बियास १ लिटर पाण्यात २५ ते ३० मिली जर्मिनेटर घेऊन या द्रावणात बियाणे ५ ते ६ तास भिजवून सावलीत सुकवून नंतर टोकावे/ लावावे.

खते आणि पाणी व्यवस्थापन : कोहळा या पिकाला हेक्टरी २५ टन शेणखत द्यावे. याच्याव्यतिरिक्त दर हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. नत्राची अर्धी मात्रा आणि स्फुरद, पालाशची पूर्ण मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी आणि उरलेली नत्राची मात्रा सलग दोन हप्त्यांत लागवड केल्यापासून ३० दिवसांनी आणि फुले येण्याच्या वेळी द्यावी किंवा कल्पतरू सेंद्रिय खत हेक्टरी ५ ते ६ बॅगा द्याव्यात. यामध्ये अर्धी मात्रा लागवडीच्यावेळी आणि उरलेली अर्धी मात्रा १ ते १॥ महिन्यांनी द्यावी. पिकास सुरुवातीस उगवण होईपर्यंत पाण्याच्या दोन पाळ्या लवकर लवकर द्याव्यात. त्यानंतर जमिनीचा मगदूर, हवामान आणि पिकाच्या वाढीनुसार पाण्याच्या पाळ्या धाव्यात. फुले येऊ लागल्यापासून फळांची वाढ पूर्ण होईल पर्यंत पाणी नियमित देणे आवश्यक आहे.

आंतरमशागत : लागवड केलेल्या शेतामधील पाट आणि आळी तणविरहीत ठेवावीत. यासाठी दोन ते तीन खुरपण्या कराव्यात. फुले आणि फळे यांचा पाण्याशी संपर्क येऊ देऊ नये. वेली दोन सऱ्यांतील मोकळ्या जागेत पसराव्यात. फळधारणा वाढविण्यासाठी हाताने परागसिंचन करावे.

महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

१) लाल भुंगे : लाल भुंगे, पीक लहान असताना पाने कुरतडून खातात, म्हणून बियांची उगवण झाल्याबरोबर या किडीचा उपद्रव सुरू होतो. ही कीड सर्वच काकडीवर्गीय पिकांवर येते. कीड पानांचा कोवळा भाग कुरतडून खाते.

या किडीच्या नियंत्रणासाठी १० लिटर पानाय्त २० मिलीलिटर मॅलेथिऑन मिसळून फवारावे. याशिवाय कार्बारिल २५ - ३० ग्रॅम किंवा रोगोर १० मिली या कीटकनाशकाची फवारणी करून किडीचे नियंत्रण करता येते. लीफ मायनर या किडीचे नियंत्रणही याच कीटनाशकांमुळे होते.

२) फळमाशी: फळमाशी ही एक महत्त्वाची कीड असून काकडीवर्गीय पिकांचे फार मोठे नुकसान करते. फळमाशी ही फळे लहान असताना फळाच्या साली खाली अंडी घालते, या अंड्यांतून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या फळातील गर खातात आणि त्यानंतर फळे सडतात.

या फळमाशीच्या नियंत्रणासाठी १० लि. पाण्यात २० मिली मॅलेथिऑन मिसळून फवारणी करावी. पीक ३० ते ४० दिवसांचे झाल्यानंतर फुले येण्यापूर्वी १ - २ फवारण्या केल्या तर या किडीचे नियंत्रणा होते. शेतातील किडकी फळे नष्ट करावीत.

महत्त्वाचे रोग व त्यांचे नियंत्रण :

काकडीवर्गीय सर्व पिकांवर पडणारे रोग आणि किडी या कमीअधिक प्रमाणात सारख्याच आहेत.

१) भुरी : भुरी हा रोग बुरशीमुले होतो. या रोगाची लागण झालायस पानांवर आणि फळांवर पांढरे डाग पडतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते, पहले वाढत नाहीत. उत्पादन घटते.

भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी हार्मोनी १.५ ते २ मिली/ लि. पाणी याप्रमाणे फवारावे. रासायनिक औषधांमध्ये कॅलिफ्झीन किंवा कॅरेथेन किंवा बाविस्टीन या बुरशीनाशकांची फवारणी करावी. १० लिटर पाण्यात १० ग्रॅम कॅरेथेन (डिनोकेप) किंवा १० ग्रॅम बाविस्टीन १० मिली कॅलिक्झीन या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. मात्र या फळभाज्यांच्या पिकांवर भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी गंधकाची धुरळणी करू नये.

२) केवडा : केवडा हा रोग आर्द्रतायुक्त दमट हवामानात मोठ्या प्रमाणात वाढतो. या रोगाचा उपदार्व झाल्यानंतर पानाच्या खालील भागावर पिवळसर डाग पडतात. पूर्ण पानावर परिणाम होऊन पाने गळून पडतात. पाने आणी खोड रोगाला बळी पडतात.

केवडा या रोगाच्या नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात हार्मोनी १५ ते २० मिली मिसळून फवारावे किंवा २५ ग्रॅम डायथेन - एम - ४५ हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.

३) करपा : करपा रोगामुळे पानावर लालसर करड्या रंगाचे डाग पडतात आणि त्यामुळे पाने सुकतात. उन्हाळ्यात पाऊस पडल्यानंतर हवेतील आर्दता वाढल्यास हा रोग बळावतो.

या रोगाच्या नियंत्रणासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनर प्रत्येकी ३० मिली आणि हार्मोन १५ मिली/ १० लि. पाण्यातून फवारणी करावी.

वरील रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच दर्जेदार, अधिक उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या खालीलप्रमाणे फवारण्या घ्याव्यात.

१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर १० ते १५ दिवसांनी ) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली.+ प्रोटेक्टंट १५० ग्रॅम + प्रिझम २०० मिली. + हार्मोनी १०० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि.पाणी.

२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर २५ ते ३५ दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ते ३०० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २०० ते २५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.

३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर ४५ ते ५५ दिवसांनी) : जर्मिनेटर ७५० मिली.+ थ्राईवर ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली. + राईपनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + न्युट्राटोन ५०० ते ६०० मिली. + हार्मोनी ३०० मिली + स्प्लेंडर ३५० मिली + २०० लि.पाणी.

४) चौथी फवारणी : (उगवणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) : थ्राईवर १ लि. + क्रॉंपशाईनर १ लि. + राईपनर ७५० मिली.+ न्युट्राटोन ७५० मिली.+ हार्मोनी ४०० ते ५०० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + २५० लि. पाणी.

काढणी आणि उत्पादन : कोहळ्यांची काढणी भाजीसाठी फळे कोवळी असताना करावी. साठवणीसाठी फळे पक्व झाल्यावर काढतात. कोहळ्याचे हेक्टरी उत्पादन १५ ते २० टन मिळते.