दुष्काळावर मात करण्यासाठी लिंबास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कमी पाण्यावर येणार 'सिद्धीविनायक' शेवगा मोरिंगा

श्री. अशोक सदाशिव शितोळे,
मु. पो.पानसेंद्र, ता. जि. जालना.
मोबा ९४२२३३५५६०आम्ही १२ वर्षापुर्वी कागदी लिंबाजी लागवड २०' x २०' वर केली आहे. जमीन मध्यम प्रतीची असून पाणी विहीरीचे आहे. या लिंबाला ४ वर्षानंतर फळे चालू झाली. आमच्या भागात पाण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे उन्हाळ्यातील बहार येत नाही. हिवाळ्यातील हस्त बहार धरतो. जून महिन्याच्या सुरुवातीस कल्टीवेटर मारून जारवा तोडतो. नंतर पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट अखेरीस ते सप्टेंबरला फळे चालू झाल्यानंतर २ - ३ महिने भरपूर माल निघतो. लिंबू (फळे) हाताने तोडत नाही. सर्व माल गळ्यावर गोल करतो. तर दररोज या काळात २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते. सर्व माल औरंगाबाद मार्केटला १० ते १२ रू.किलो ने जातो. थंडी संपल्यानंतर निघणाऱ्या मालाला २५ रू./ किलो भाव मिळतो. थंडी व पावसळ्यात जास्त उत्पादन मिळते. वर्षाला १० लाख रू. या ६ एकरातून दरवर्षी मिळतात.

पावसाळ्यात व हिवाळ्यात मोकळे पाणी देतो. उन्हाळ्यात पाणी कमी पडते. तेव्हा फेब्रुवारी ते मे ह्या ४ महिन्यात झाडे ठिबकवर जगवतो. या लिंबाला कोणतीही फवारणी करीत नाही किंवा वरखते देत नाही. २ वर्षातून फक्त एकदा उन्हाळ्यात मे महिन्यात प्रत्येक झाडाला ५ - ६ घमेली (२५ किलो) शेणखत देतो . याची छाटणी खालून लिंबू वेचता येईल अशी खोडे मोकळी करतो. लिंबाना जादा छाटणी चालत नाही. एकदा दाटी जादा झाल्यामुळे (झाडे एकात एक मिसळू लागल्यामुळे) मनगटासारख्या जाडीच्या फांद्या छाटल्या तर नुकसान झाले. झाडांना शेणखत देत असल्याने खोडात जास्त ताकद होती. छाटणीमुळे वाढ थोपल्याने खोडाची साल फाटू लागली. साल फाटल्यावर नंतर त्यातून डिंक बाहेर येऊ लागला. याला 'गमॉसिस' म्हणतात. असे सरांनी सांगितले. तेव्हा लिंबाची हलकी व खोडे मोकळी होतील अशी गरजेपुरतीच छाटणी करावी. सर

गेल्या २ वर्षात मात्र दुष्काळी परिस्थितीने पुर्ण लॉस (तोटा) झाल. खर्च केल्या एवढेही उत्पन्न मिळाले नाही. त्यातच ६०० झाडांपैकी १५० झाडे दुष्काळाने वाळली आहेत. सध्या विहीरीत ३ -४ दिवसाड २ फुटत पाणी येते. लहान मुलगा १२ वीत आहे. तो आपले कृषी विज्ञान मासिक नियमित वाचतो.

डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा आज (२४ जून २०१३ ) शेवगा लागवडीसाठी घेऊन जात आहे. कमी पाण्यावर हा शेवगा आम्हाल साथ देईल असे वाटते. नंतर यावर्षी पाऊस बरा झाला की लिंबाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.