१०० % सडलेले (लागलेले) आले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन १ एकरात २० लाख रू.

श्री. रामचंद्र व्ही.जगदाळे (मिल्ट्री रिटायर्ड),
मु. पो. आर्वी, ता. कोरेगाव, जि. सातारा,
मोबा. ९९२१३३२५७५


मी गेल्यावर्षापासून डॉ.बावसकर तंत्रज्ञान आले व कांद्याला वापरत आले. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाएवढा परिणामकारक रिझल्ट आम्हाला मार्केटमधील इतर कोणत्याच औषधांनी अद्याप मिळाला नाही.

गेल्यावर्षी १५ मे ला १ एकर सातारी आले लावले होते. बेणे ६०० किलो वापरले. मात्र पावसाळ्यात आले लागले(सडले). त्यावर बाजारातील अनेक प्रकारची औषधे वापरली, मात्र आले लागण्याचे प्रमाण वाढतच गेले. अगदी १०० % आले लागले. अशा परिस्थितीत माहिती घेत असताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती मिळाली. तेथून अडसूळ यांच्या सल्ल्याप्रमाणे जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनरच्या २ फवारण्या आणि फक्त जर्मिनेटरचे ८ - ८ दिवसाला आळवणी (ड्रेंचिंग) केले. तर एवढ्यावर १५ - २० दिवसात आले लागणे पुर्ण थांबले. त्या अनुभवावरून पुन्हा नियमित १५ दिवसाला याप्रमाणे सप्तामृताच्या एकूण १० ते १२ फवारण्या आल्याला केल्या आणि जर्मिनेटरचे ड्रेंचिंग दर महिन्याला केले, तर ११ महिन्यात आले काढणीस आले.

५० ग्रॅमच्या कुडीला ३.७५ ते ४ किलो आले गड्डा

१५ मे २०१२ ची लागवड १५ एप्रिल २०१३ ला काढणी केली असता ६०० किली बेण्यापासून ४० गाड्या म्हणजे २० टन उत्पादन मिळाले. ५० ग्रॅमच्या एका कुडीपासून काही ठिकाणी ३.७५ ते ४ किलो आल्याचा गड्डा मिळाला. म्हणजे ८० पट उत्पादन मिळाले. या आल्याला ११००० रू./क्विं. भाव मिळाला.

१००% लागलेले आले डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन २० लाख रू. मिळाले. आमच्या शेजाऱ्यांचे आले पुर्णत: गेले. माझ्या अनुभवावरून गावातील सर्व १००% लोक आल्याला जर्मिनेटर व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहेत. मी चालू वर्षीही आले लावले आहे. त्यासाठी तसेच गावातील मित्रासाठी १५ लि. जर्मिनेटर आज (५ जुलै २०१३) घेऊन जात आहे.

गरव्या कांद्याचे ४ महिन्यात २६ गुंठ्यातून १ लाख ५७ हजार

गेल्यावर्षी मी गरव्या कांद्यालादेखील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या जर्मिनेटरचा वापर केला. ८ ऑक्टोबरला २६ गुंठ्यामध्ये गरवा कांदा लावला होता. याला कोणतेच खत वापरले नाही किंवा फवारणीदेखील एकही केली नाही. फक्त जर्मिनेटर प्रत्येक पाण्याच्या पाळीला ५०० मिली पाण्यातून सोडत होतो. कांद्याला एकूण १० पाण्याच्या पाळ्या दिल्या. असे सुरुवातीस वापरलेले जर्मिनेटर धरून एकूण ७.५ लि. जर्मिनेटर वापरले. तर ८ ऑक्टोबरला लावलेला कांदा ८ फेब्रुवारीला काढला. १० टन उत्पादन मिळाले. त्याला हुबळीला (कर्नाटक) २००० रू. / क्विं. भाव मिळाला. एकून १ लाख ७४ हजार रू. ची पट्टी झाली. गाडीभाडे ९१०० रू. आले. वाहतूक व इतर सर्व खर्च जाऊन १ लाख ५७ हजार रू. हातात मिळाले.