मोगऱ्याने दिला पैशाचा मनसोक्त सुगंध, सोनचाफ्यात 'सिद्धीविनयक' शेवगा

श्री. प्रकाश तानाजी मुजुमले,
मु. पो. कोंढणपूर, ता. हवेली, जि. पुणे,
मोबा. ९७६७७२३८२९आमच्याकडे २००४ पर्यंत कायम ४०० झाडे मोगरा होता. या मोगऱ्याचे आम्ही २ बहार धरत असे. उन्हाळ्यातील बहराची फुले फेब्रुवारी ते मे पर्यंत मिळायची. त्यानंतर महिनाभर ताण देऊन जून अखेरीस पाऊस झाल्यावर पंचमीचा बहार घेतो. ह्या बहाराचा माल १५ ते २० दिवसच चालतो. पण माल फुल (भरपूर) निघतो. डॉ.बावसकर तंत्रज्ञानाच्या नियमित फवारण्या घेत होतो. मोगरा दररोज तोडून २५ किलो माल तोडला जात होता. तरी तोडणीअभावी माल झाडांवर शिल्लक राहत होता. शिल्लक माल फुलल्यावर वाया जात असे. कळी अवस्थेतच मोगरा तोडावा लागतो. उन्हाळ्यातील मोगऱ्याला ४० रू. पासून १०० ते १५० रू./किलो भाव मिळतो. तर पंचमीतील फुलांना ४०० रू. /किलो भाव मिळत होता.

मजुरांच्या प्रश्नाने मोगरा काढला

डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने कळी जादा फुगते. काळी पिवळसर न पडता सफेद दुधासारखी व मोत्यासारखी चमकदार येते. पावसाळ्यात पाण्याने सडत नाही. दांडा सुकत नाही. फुलांचा सुगंध वाढतो. मात्र अलिकडे मजुरीच्या बिकट परिस्थितीमुळे मोगरा ७ - ८ वर्षापुर्वी काढला.

पुर्वी शाळेतील मुले सकाळी शाळा भेरपर्यंत मोगरा तोडायला येत असत. माझे वय ५० वर्ष आहे. आमच्या मुलांच्या बरोबरीची मुले त्याकाळी कामावर येत असत. आत उत्पन्नाचे श्रोत वाढले. आता नातवंडांच्या बरोबरीची मुले काम करीत नाहीत. त्यांच्या वडीलांचे उत्पन्न वाढल्याने त्यांना पॉकेटमनी सहज उपलब्ध होत असल्याने मुले कामाला येत नाहीत म्हणून मोगरा काढून टाकला.

३ वर्षापुर्वी ५० हापूस आंब्याची आणि २० केशर आंब्याची २५' x २५' वर लागवड केली आहे. त्यामध्ये पिवळ्या सोनचाफ्याची ७० झाडे गेल्यावर्षी लावली आहेत. कुठे - कुठे कुले लागतात, मात्र ३ वर्षांनी विक्रीयोग्य माल मिळेल. सोनचाफ्याचे १ फुल १ रू. ला जाते. १ माणूस अर्ध्यातासात १०० फुले सहज तोडतो. मोगऱ्याचे ते नाही. मोगरा एका किलोत ३ ते ३॥ हाजार कळ्या बसतात. तोडणीस मजूर महत्त्वाचे ठरतात. तोडणीस उशीर झाला तर कळी फुलून वाया जाते.

सोनचाफा चालू होईपर्यंत आंब्यात १०० मोरिंगा शेवगा लागवडीसाठी आज १ पाकिट बियाणे व जर्मिनेटर, शेवगा लागवडीचे पुस्तक घेऊन जात आहे. १०० शेवग्याला छाटणी व तोडणी घरच्या दोन माणसांवर करणे शक्य आहे. शिवाय खात्रीशीर उत्पादन व बाजारभावही चांगले असल्याने 'सिद्धीविनायक' मोरिंगा लागवडीचा हा प्रयोग.