२५० किलो शेवगा शेंगा - ७५०० रू.

श्री. चंद्रकांत रंगनाथ देशमाने,
मु. पो. कोरेगाव, ता.कर्जत, जि .अहमदनगर.
मोबा. ९७६६१८३०७२डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमधून जानेवारी २०१३ मध्ये "सिद्धीविनायक' शेवग्याची ५०० रोपे नेली होती. त्यांची लागवड मध्यम प्रतीच्या जमिनीत ८' x ८' वर केली. उन्हाळ्यात पाणी कमी असल्याने ठिबकवर झाडे जगविली दरम्यान दर महिन्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या आतापर्यंत ४ - ५ फवारण्या केल्या आहेत. एक एकरसाठी कल्पतरू ५० किलो वापरले आहे. उन्हाळ्यात काही रोपे मेली. सध्या ४०० झाडे आहेत. आठवड्याला ६५ - ७० किलो शेंगा मिळतात. आतापर्यंत ५ - ६ तोडे केले आहेत. शेंगा २० - २५ किलो निघाल्या की कर्जतला विकतो आणि जास्त ६० - ७५ किलो निघाल्यावर पुणे मार्केटला पाठवितो. पुण्याला ४० - ४५ रू. किलो भाव मिळाला आहे. आतापर्यंत एकूण २५० किलो शेंगा निघाल्या असोन ७५०० रू. झाले आहेत. मागे लहान शेंगा व फुलकळी भरपूर आहे.

त्यानंतर २०० झाडे शेवग्याची लावली आहेत. ती १॥ ते २ महिन्याची असून २ फूट उंचीची आहेत, आज अजून ३०० झाडे लागवडीसाठी ४ पाकिटे 'सिद्धीविनायक' शेवगा बी घेऊन जात आहे.