दिवसाआड २ ते २॥ हजार रू. ची 'सिद्धीविनायक' शेवग्याची पट्टी, लाखभर 'सिद्धीविनायक' शेवग्याने दिले

श्री. संतोष तुळशीदास माळी,
मु. पो. चिखर्डे, ता. बार्शी. जि. सोलापूर.
मोबा. ९९२२०२३७०८



आम्ही गेल्यावर्षी मोरिंगा शेवग्याची ४ एकरमध्ये ४ एकरमध्ये १०' x ६' वर लागवड केली होती. जमीन मुरमाड प्रतीची आहे. पाणी विहीरीचे असून २ एकर मोकळे भिजवतो व २ एकर ठिबक केले आहे.
दुष्काळी परिस्थितीने १॥ एकर शेवगा गेला. सध्या २॥ एकर शेवगा चालू आहे. दिवसाड ८० - ९० किलो शेंगा काढत असे. लातूर मार्केटला पाठवित होतो. २० - २२ ते २५ रू./ किलो भाव मिळत होता. ४ - ५ महिने शेवगा चांगला चालला. सध्या थोडा कमी पडला आहे. आठवड्याला ५० - ६० किलो शेंगा निघत आहेत.
दिवसाआड २२०० -२३०० रू. ची पट्टी येत असे. बाजारात शेंगा उठावदार असल्यामुळे २ - ३ रू. /किलोस भाव जादा मिळत होता. साधारण १ लाखभर रू. उत्पन्न मिळाले असल्याने यंदा नवीन लागवडीसाठी पुन्हा १६ पाकिटे 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा बी घेऊन जात आहे.